! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 27 June 2016
Friday, 24 June 2016
किल्ले पन्हाळा
महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान असणारा पन्हाळा,थंड हवेचे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय आहे .इ.स.१२व्या शतकात कोल्हापूर इथे राज्य करणाऱ्या शिलाहार राजांनी या किल्ल्याची उभारणी केली.त्यानंतर देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशाही आणि अखेरीस मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला.
इ.स.च्या १७व्या शतकापासून ते १८व्या शतकापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या किल्ल्यावर बराच काळ व्यतीत केला होता. महाराणी ताराराणी यांनी करवीर किंवा कोल्हापूर संस्थानाच्या पन्हाळा गादीची स्थापना केली.
कोल्हापूरपासून 20 कि.मी. वर असणारा हा दुर्ग अनेक राजकीय घडामोडी आणि युद्धांचा साक्षीदार आहे. कोकण व उर्वरित महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील खिंडीचा नयनरम्य देखावा पन्हाळा येथून फारच छान दिसतो.
किल्ल्यावर वास्तूंचे अनेक अवशेष असून त्यांची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत केली जाते. किल्ल्याला वर्षभर कधीही भेट देऊ शकतो पण पावसामुळे खुलणारी दाट हिरवाई आणि दाट धुक्यामुळे निर्माण होणारे गूढ, रोमांचक वातावरण अनुभवण्यासाठी पावसाळ्यात नक्कीच भेट द्यायला हवी. पन्हाळा येथे अनेक हॉटेल्स आहेत. तेथे अस्सल कोल्हापुरी जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.
पन्हाळ्यावर प्रवेश करताच आपण वीर शिवा काशीद यांच्या समाधीपाशी येतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केल्यास आपण पराशर गुंफेजवळ येऊन पोहोचतो. ही बौद्ध गुंफा आहे. पुढे लागणाऱ्या भव्य चौकात वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा दिसतो. येथून एक रस्ता तीन मजली अंधारबाव, तीन दरवाजा आणि तटबंदीला लागून असणाऱ्या कोकण दरवाजाकडे जातो. दुसरा रस्ता इब्राहिम आदिलशहा याने गडाच्या खालील भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या सज्जा कोठी या इमारतीकडे जातो. तिसरा रस्ता सोमेश्वर किंवा सोमाळे तलावाकडे जातो. या तळ्याचा उल्लेख करवीर माहात्म्य या मध्ययुगीन ग्रंथात आढळतो. गडाच्या मध्यावर अंबारखाना किंवा धान्यकोठार आहे. विजापूर शैलीत बांधलेल्या ह्या तीन इमारती आहेत. त्याव्यतिरिक्त नायकिणीचा सज्जा, धर्मकोठी, वाघ दरवाजा आणि राजदिंडी ही ठिकाणेही पाहायलाच हवीत. संभाजीराजांचे स्मारक, अंबाबाई, महाकाली आणि सोमेश्वर ही मंदिरे तसेच संभाजीराजे (द्वितीय) यांच्या पत्नी जिजाबाई यांची समाधी, रामचंद्रपंत अमात्य आणि प्रसिद्ध कवी मोरोपंत यांच्याही समाध्या आहेत.
मुंबईपासून अंतर :३७४ कि.मी.
कसे जाल?
विमान
सर्वात जवळचा विमानतळ पुणे येथे आहे.कोल्हापूर येथे देशांतर्गत विमान वाहतुकीचा (domestic) विमानतळ आहे मात्र इथे नियमित उड्डाणे नसतात.
रेल्वे
सर्व मोठ्या शहरांशी कोल्हापूर उत्तमप्रकारे जोडलेले आहे. मिरज हे मोठे रेल्वे जंक्शन कोल्हापूरपासून एका तासाच्या अंतरावर आहे.
रस्ता
सर्व मोठ्या शहरांशी कोल्हापूर उत्तमप्रकारे जोडलेले आहे.पुणे-बेंगळूरू महामार्गावरच कोल्हापूर शहर आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी राज्यमार्ग परिवहन म्हणजेच एस.टी.बसेस तसेच खासगी बसेसची सेवा नियमितपणे उपलब्ध आहे.
(((( किल्ले )))))
किल्ले
शतकानुशतके आपल्या जबरदस्त पाषाणी सामर्थ्याने जमीन आणि समुद्रावर दरारा निर्माण करणारे किल्ले हे मराठी साम्राज्याचे फार मोठे आधारस्तंभ होते. महाराष्ट्राची ही भूमी जवळजवळ ३५० हून अधिक किल्ल्यांनी समृद्ध आहे.
भारताच्या कोणत्याही प्रांताला हे एवढे दुर्गवैभव लाभलेले नाही. याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची तेजाने तळपणारी तलवार अत्यंत दिमाखात अधिराज्य गाजवत होती. एकेकाळचे मराठी सैन्याचे संरक्षक असलेले हे किल्ले आज आपल्या उज्ज्वल इतिहासाची मूक साक्ष देत अभिमानाने उभे आहेत. पंचमहाभुतांच्या सततच्या माऱ्यामुळे पडझड, फूट झालेले किल्ले. आज जरी त्यांच्या भिंती ढासळू लागल्या असल्या आणि छप्पर उडून गेले असले तरी हे किल्ले, सामर्थ्यशाली मराठी साम्राज्याचा दरारा आणि रुबाब या बद्दल सतत प्रेरणा देतात. हे किल्ले दूरदृष्टी आणि सामर्थ्य यावर नक्कीच भाष्य करतात. सागरी असोत किंवा एखाद्या डोंगरावर वसलेले असोत, महाराष्ट्रातले हे किल्ले कोणत्याही ऋतूमध्ये तुम्हाला साद घालत असतात.
Wednesday, 22 June 2016
(( दिवेआगर (Ratnagiri) ))
00
शुभ्र पांढऱ्या पुळणीवर निवांतपणे पडून सागराच्या एकामागून एक रोरावत येणाऱ्या लाटांची मजा अनुभवायची असेल तर दिवेआगरला जाण्यावाचून पर्याय नाही. जवळजवळ ५ किलोमीटर लांब पसरलेला नितांत रमणीय सागरकिनारा, किनाऱ्यावर असलेली माडा-पोफळीची वाडी पर्यटकांची वाट पाहते आहे. कोकणातल्या अनेक सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेल्या दिवेआगरला समृद्ध कोकणी जीवन आणि कोकणी संस्कृतीची झलक अनुभवता येते.
दिवेआगरबद्दल एक दंतकथा प्रसिद्ध आहे. त्यानुसार कोणे एके काळी खोल समुद्रात एक जहाज वादळामध्ये दिशा भरकटले. अर्थातच त्या जहाजावरील खलाशी आणि इतर लोक भयभीत झाले आणि सुटकेसाठी देवाची प्रार्थना करू लागले. नेमका तेंव्हाच त्यांना दूरवर एक दिवा तेवताना दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्यांनी आपले जहाज हाकारले आणि ते सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले. ते ज्या ठिकाणी येऊन पो(( हर्णै-मुरुड (Ratnagiri) ))
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची एक सुरेख मालिकाच पाहायला मिळते. हर्णै मुरुड ह्या गावचा समुद्रकिनारा सुंदर आहेच परंतु या गावांना ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग आणि गोवा अशा सागरी किल्ल्यांचे अस्तित्व या गावांना आहे पण त्याच बरोबर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले दोन सुपुत्र या गावांनी देशाला दिलेले आहेत.
हर्णै हे एक अरबी समुद्रावरील प्राचीन बंदर होय. हे एक लहानसे टुमदार खेडे असून इथून सुवर्णदुर्ग या जलदुर्गाला भेट देता येते. तसेच इथून पाज गावातील पूल ओलांडून आंजर्ले या निसर्गरम्य गावाला भेट देता येते. आंजर्ले इथला कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. कनकदुर्ग आणि गोवा हे समुद्री किल्ले इथे किनाऱ्यावर वसलेले आहेत.
(( महाराष्ट्र समुद्रकिनारे ))
समुद्रकिनारे
पाहताच क्षणी प्रेमात पडावा असा अत्यंत रमणीय समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राची ही पश्चिम किनारपट्टी ७०० किमी. इतकी लांब आहे. अरबी समुद्राच्या असंख्य मनोहारी छटांप्रमाणेच इथले समुद्रकिनारे ही असंख्य आहेत. पांढऱ्या पुळणीशी हळूच सलगी करणारे कोकणातले अनेक समुद्रकिनाऱ्यावरचे नितळ पाणी, साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असे श्रीवर्धनचे निळेशार पाणी अशी या समुद्राची अनेक मनमोहक रूपे आहेत. पावसाळ्यात प्रसंगी रौद्र रूप धारण करून विध्वंस करणारे मुंबईचे समुद्रकिनारे एरव्ही मात्र इथल्या जागांच्या किमती वधारण्यासाठी कारणीभूत ठरतात.
संस्कृती महाराष्ट्राची
संस्कृती महाराष्ट्राची
- संस्कृत भाषेत
- संस्कृत भाषेत ज्याचा अर्थ “महान राष्ट्र” असा होतो आणि खरोखरच ह्या नावाला साजेल अशीच संस्कृती असणारा महाराष्ट्र म्हणजे,शूर-वीरांची भूमी.आपल्या मुशीतून त्याने वविधरंगी संस्कृती प्रवाहांना सामावून घेतले आहे.भारतीय स्त्रीवादी चळवळीचा उगम जिथे झाला,ती भूमी आजच्या आधुनिक लोकशाहीचे माहेरघर आणि जगातील सर्वात मोठी चित्रपट नगरी असा लौकिक बाळगून आहे. खरोखरीच,आत्मविश्वास आणि आत्मसंयमाने “महाराष्ट्र” आपले नाव सार्थ करणारे “महान राष्ट्र”आहे.
सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्राचा देशाच्या औद्योगिक उत्पादनात २५% वाट आहे.तर दरडोई उत्पनाच्या २३% वाट आहे.
आधुनिकतेची कास धरलेल्या महाराष्ट्रातील लोकांची मने मात्र अजूनही आपल्या प्राचीन परंपरा, संस्कृती यांचा संपन्न वारसा जपत आपल्या मुळांशी घट्ट जोडलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती हि उभ्या महाराष्ट्राची दैवतेही आणि नाजूक, हळवे कोपरेही; पण सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्राचा पिंड मात्र पुरोगामी,सहनशील आणि उत्साही असाच आहे.
८०% हिंदू लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात वारसा स्थळांच्या रूपाने मौल्यवान खजिनाच दडलेला आहे.हि सर्व वारसास्थळे इथे नांदणाऱ्या जैन,बौद्ध,ख्रिश्चन परमपरांच्या मनोहर रंगछटांची जणू साक्षच देतात.मग ती कोकणपट्ट्यात असणारया अष्टविनायकाची यात्रा असो कि औरंगाबाद जवळील ख्रिस्तपूर्व काळातील अजिंठा वेरूळ असो.अथवा माहीमचे मदर मेरी चर्च असो किंवा हाजी अलीची मुंबई येथील मशीद असो. कलेविषयी उच्च अभिरुची आणि ओढ असणाऱ्या जाणकाराला खिळवून ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी इथे आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ल्यांचे असाधारण महत्त्व आहे.महाराष्ट्राच्या कठीण खडकाळ भूप्रदेशात शत्रूला रोखण्यासाठी आवश्यक असणारा भक्कम आधार ह्या किल्ल्यानीच दिला. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणारे आणि स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय स्थान जपणारे हे बरेचसे किल्ले साधारणत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळखंडात बांधले गेले.ह्यापैकी प्रत्येक किल्ला आपल्याला व्यूहरचना, युधाकौशाल्या आणि गुप्त खलबते यांच्या आधारे मिळवलेल्या वैभवशाली विजयगाथा सांगतो.त्यातून राज्यशास्त्र संरक्षणात्मक व्युह्तंत्र आणि व्यवस्थापन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप काही आहे.
सर्वसामान्य जनतेच्या पाठींब्याने आणि आपल्या दूरदृष्टीने दख्खनच्या क्षितिजावर नवस्वराज्याची स्थापना करणारा हा भारतातील एक महान राजा कसा घडला, याची कहाणी आपल्याला प्रत्येक किल्ला सांगतो. शिवाजी महाराजांच्या विजयाच्या कथांमाधून विवध किल्ले आणि त्यांवरील लढायांमधून महाराजांनी दाखवलेल्या शौर्याची गाथा पोवाडयानधून ऐकायला मिळते.
महाराष्ट्र पर्यटन
महाराष्ट्रात आपले स्वागत. महाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत. इथले विविधरंगी सांस्कृतिक आविष्कार म्हणजे जणू बहुरंगी आकर्षक गालिचा. इथले उत्सव हजारो लाखो मरगळलेली मने उल्हसित करतात-गतिमान करतात. इथले मैलोन् मैल पसरलेले रुपेरी, शुभ्र वाळूचे मनाला भुरळ पाडणारे किनारे, अथांग सागर महाराष्ट्राचे सौंदर्य खुलवितात. चला, आता एका सर्वंकष सहलीद्वारे तुम्ही महाराष्ट्राच्या अस्सल, जिवंत आणि अलौकिक भूमीचे प्रत्यक्ष दर्शन घ्या. महाराष्ट्रात आपले स्वागत. एक अनाघ्रात, रमणीय, विस्तीर्ण भूमी...महाराष्ट्र!
पश्चिमेला अरबी समुद्र,वायव्येला(उत्तर-पश्चिम) गुजरात आणि दादरा नगर हवेली हा कें
Subscribe to:
Posts (Atom)