! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 23 June 2017

आंबोली धबधबा

निसर्गरम्य आंबोली बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे
हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत
असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्या टेकड्या, बाराही महिने
हिरव्यागार असणार्या दर्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या
दर्या अधिकच सुंदर दिसतात. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र
सपाटीपासून ६९० मीटर उंचीवर
असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.

सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्या खोर्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद
सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य
पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो.

आंबोलीचे मुंबईपासूनच अंतर ५४९
कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर ३९० कि.मी. तर
रत्नागिरी- आंबोली २१५ कि.
मी. आहे. सावंतवाडी हे
आंबोलीच्या जवळ २६ कि.मी
अंतरावर असणारे रेल्वे स्टेशन आहे.
येथून बेळगांव ६४ कि.मी. तर दाभोली (गोवा) १४० कि.मी. आहे.
असे हे आंबोली आता उत्कृष्ट
पर्यटन स्थळ म्हणून विकसित
झालेले असून, दरवर्षी हजारो
पर्यटक येथे येत असतात.
पावसाळ्यात तर फेसाळणार्या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा
मनमुराद आनंद लुटण्यासाठी
पर्यटकांची झुंबड उडालेली असते.

आकाशभेदी कलावंतीणीचा सुळका!

रायगड जिल्ह्यात विराजमान असणारे गडकिल्ले हे विविधतेने नटलेले आहेत. सागरी दुर्गापासून ते डोंगरी किल्ल्यांपर्यंत सर्वामध्येच वेगळेपण सामावलेलं आपल्याला दिसते. जी गोष्ट गडकिल्ल्यांची तीच इथल्या विविध डोंगरशिखरांची! या सर्वाचं दर्शनसुद्धा तेवढंच मोहक आणि आल्हाददायक ठरते. असाच एक विलोभनीय दुर्ग सुळका म्हणजे कलावंतीणीचा सुळका!

पुण्या-मुंबईतून दर वीकेंडला हौशी ट्रेकर्स दाही दिशांनी सह्याद्रीला जणू वेढाच घालत असतात. अशा लोकांसाठी एका दिवसांत बघण्यासारखी अशी अनेक ठिकाणे या जिल्ह्यात कितीतरी आहेत. या कुतूहलमिश्रित यादीत कलावंतीण सुळक्याचं नाव आपल्यासमोर येतं, तेव्हा साहजिकच आपली उत्सुकता चाळवली जाऊन कधी एकदा तिथे पाऊल टाकतोय असं वाटू लागतं आणि याच उत्सुकतेत बेत ठरवला जातो.
सह्याद्रीच्या विविध आकाररूपांनी सजलेल्या डोंगररांगावर जितकं कवित्व करू तितके ते थोडेच आहे. या डोंगररांगेवर अभेद्य गिरीदुर्ग तर आहेतच तसंच भयाण द-यादेखील आहेत. या प्रत्येकाने स्वत:चे असे खास वैशिष्टय़ जपले आहे. यांचे आकार देखील भुरळ पाडणारे असतात. काही दुर्गाच्या वास्तुस्थापत्याने नटलेल्या कलाकृती भान हरपून टाकणा-या असतात. किंबहुना अशा आकाराच्या मोहापायीच आपली पावले या डोंगरवाटांवर घुटमळत असतात. या आकारांमध्ये विशेष लक्षात राहणारे काही डोंगरांचे सुळके हे मात्र भटकंतीच्या विश्वात मानाचं स्थान घेऊन उभे आहेत. काही सरळ आभाळात घुसलेले तर काही पठारावर आडव्या िभतीसारखे वर आलेले. उदाहरणच द्यायचे झालं तर मांगी-तुंगी, तैलबैला, मिच्छद्रगडाचा सुळका इ. अशी ही यादी वाढतच जाणारी आहे. या पंक्तीतच पनवेलजवळच्या कलावंतीणीच्या सुळक्याने देखील असेच आपले स्थान भटक्यांच्या मनात पटकावले आहे.
तसं पाहिलं तर कलावंतीण हा काही दुर्ग नव्हेच. एका डोंगराच्या निमुळत्या उंच होत गेलेल्या शिखराचे टोकच म्हणायला हवे. या सुळक्याला दुर्ग म्हणण्याचा मोह तुम्हा-आम्हासारख्या भटक्यांचाच. याचा इतिहासात काही संदर्भ सापडत नाही. केवळ एका काल्पनिक गोष्टीचा आधार घेतला जातो. ती म्हणजे एका कलावंतीणीचा महाल या सुळक्यावर होता म्हणूनच हे नामकरण झालं. एवढीच या सुळक्याची ओळख. बाकी भूगोलाच्या चष्म्याने या सुळक्याकडे पाहिले की मात्र याची उंची कुतूहल वाढवते. प्रसिद्ध प्रबळगडाच्या शेजारीच अगदी हातात हात घालून हा सुळका त्याचे वेगळं अस्तित्व राखत आणि वैशिष्टय़ जपत मोठय़ा दिमाखात उभा आहे. त्यामुळे प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्याची सफारी अनेक दुर्गपेमी एकत्रितपणे करत असतात. यासाठी मात्र दोन दिवस हाताशी हवेत. एका दिवसासाठी कलावंतीणीचा पर्याय निवडायचा अन् याच्याकडे कुच करायचे.
कलावंतीणीच्या सुळक्याकडे येण्यासाठी पनवेल-पुणे रस्त्यावरील शेडुंग गावच्या फाटय़ावरून थेट ठाकूरवाडी हे गाव गाठायचे. येथपर्यंत प्रवास हा वाहनाने होतो. पुढचा प्रवास मात्र पायीच करावा लागतो. तासाभराचं अंतर पार करून आपण प्रबळमाची या पायथ्याच्या वाडीपाशी येतो. प्रबळमाची हे प्रबळगडाचं आणि कलावंतीण सुळक्याचं पायथ्याचं सामायिक वस्ती असलेलं गाव. या माचीवर २०-२५ घरांची वस्ती आहे. या ठिकाणी पर्यटकांची राहण्याची, जेवणाची अतिशय सुंदर सोय होऊ शकते. आदल्या रात्री अन् तेही पौर्णिमेच्या दुधाळ रात्री हा योग जर जुळवून आणलाच तर ही भटकंती वेगळाच आनंद देऊन जाईल. असो. माचीवरून प्रबळगड अन् कलावंतीण या दोघांचं दर्शन मोठं विलोभनीय दिसते. डावीकडे आकाशात घुसण्याच्या तयारीत असलेला कलावंतीणीचा दिलखेचक सुळका आणि उजव्या बाजूला अवाढव्य, आडवं पसरत गेलेलं प्रबळगडाचं पठार आणि दोघांच्या मधील इंग्रजी ‘व्ही’ आकाराची खाच. हे दृष्य बघताक्षणीच भुरळ घालणारं असतं. या खाचेतूनच वर सुळक्यासाठी वाट गेली आहे. माचीवरून या खाचेकडे प्रयाण करायचं व दाट झाडीतूनच वीस मिनिटांत या दोघांना जोडणा-या िखडीपाशी यायचं. या िखडीत उभे राहिल्यानंतर दिसणारं निसर्गाचं रूप हे केवळ आणि केवळ अनुभवावं असंच.. दोन्ही बाजूच्या कातळकडय़ांचं रौद्ररूप हे छातीची धडधड वाढवत असतानाच सुळक्यावर जाण्यासाठीच्या पाय-या आपल्याला नजरेत येतात. आणि भटकंतीचा दुसरा स्वप्नवत टप्पा सुरू होतो.
कातळात कोरलेल्या या पाय-या म्हणजे या भटकंतीची जणू गोळाबेरीजच म्हटली पाहिजे. कातळकोरीव पाय-यांचं जेवढं कौतुक करावं तितकं ते थोडंच आहे. आकर्षक व तितक्याच रेखीव पाय-यांची वर जाणारी शिडी पाहून आपण विस्मयचकितच होतो. या पाय-यांवर पाऊल ठेवायच्या अगोदर नकळतपणे हातच फिरवले जातात. यातच सर्व आले. जेव्हा या वळणावळणाच्या, नागमोडी आकाराच्या पाय-यांनी जसं जसं आपण वर जाऊ लागतो तसं तसं हा प्रवास अधिकच रोमांचित होऊ लागतो. या सुबक पाय-यांवर पडणारे प्रत्येक पाऊल हे स्थापत्याच्या या कलासौंदर्यात चिंब भिजूनच बाहेर येत असतं. खरोखरच अशा पाय-यांची अदाकारी फारच थोडय़ा ठिकाणी पाहायला मिळते. पाय-यांचा हा स्वप्नवत टप्पा पार करून आपण एका छोटय़ा रॉक-पॅचपाशी येतो. येथे सोपे प्रस्तरारोहण करूनच माथ्यावर यावे लागते.
माथ्यावर ठेवलेल्या पहिल्या पावलातच आपण या सुळक्याचेच होऊन जातो. या ठिकाणाहून इरशाळगड, पेठ हे साद घालताना दिसतात तर दूरवर दिसणारे माथेरानचे पॉइंट्स हे भुरळ घालतात. पण या सर्वात भारदस्त वाटतो तो या सुळक्याचा सख्खा शेजारी प्रबळगडच! हे सारे पाहतानाच निरोपाची घडी जवळ येत असते. अवघ्या एका दिवसात होणारी कलावंतीण सुळक्याची ही सफर ही मन ताजतवानं करणारी ठरते. या उंच सुळक्याची चढाई ही मनस्वी आनंद तर देतेच; पण त्याहीपेक्षा कातळात कोरलेल्या नितांत सुंदर पाय-यांच्या स्थापत्यशास्त्रात मन अगदी भिजवून सोडते.