निसर्गावर असंख्य जणानी कविता लिहिल्या असतील...अगदी पाला पाचोळ्या एवढ्याबेसुमार...त्यातलेच हे एक छोटे पान...फरक एवढाच की ही कविता कोकण रेल्वेत बसून , निसर्गाला साक्षठेवून - रेल्वे तिकिटाच्या मागच्या बाजूवर लिहिलेली...
हिरवळिच्या चौकोनात उमटले वर्तुळ पाण्याचे
ओले सप्तसुर निनादले जल-धारांच्या गाण्याचे
आभाळाला लटकती उंच नारळाच्या पेंडया
ढग खाली वाकून ओढती डोंगराच्या शेंड्या
गवताच्या तलवारीवर जडले पाण्याचे मोती
झाडे रांगती न्हाउनी, धरणीची पिल्ले छोटी
वारयाची शर्यत वेळेशी, प्रकाशाला धुक्याचे कोंदण
नदीची वळणे नागमोडी, कातळाला झरयाचे गोंदण
लाल तांबड्या मातीत, निळे थेंब झिरपले
हिरव्या रंगात हरवूनी, मन वेडे हरपले.