#मेंढा तोफ देवगिरी किल्ल्यावर #चिनी महालापासुन जवळच एका #बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. #चारही दिशांना फिरू शकणाऱ्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा #तोफ असे नाव पडले. #मुस्लिम शासक हिला ’तोप किला शिकन’ म्हणजे ’किल्ला तोडणारी तोफ’ म्हणतात. या तोफेवर दोन उल्लेख आहे, #संपूर्ण खिताबासहीत एक #औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे.