! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 2 October 2014

! " विजयादशमीच्या हार्दिक शूभेच्छा " !


उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लूटण्याचा......

नवे-जूने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा......

तोरण बांधून दारी,
घालू रांगोळी अंगणी..........

करू उधळण सोण्याची,
जपू नाती मना-मनाची.........


    तूमच्या सहपरिवांरास
        माझ्या कडून    
 विजयादशमीच्या हार्दिक
           शूभेच्छा

! "पुन्हा माणुसम्हणुन जन्माला आलो तर मला फक्त छत्रपतींचा मावळा म्हणुनच येऊ दे." !

वार झालो तर
भवानी तलवार
होवु दे,
वाघ
नको वाघ
नखे होऊ दे,
मंदीर नको
जगदेश्वराची पायरी होवु दे,
आणि पुन्हा माणुस
म्हणुनच
जन्माला आलो तर
फक्त
आणि फक्त
छत्रपतींचा मावळा म्हणुनच येऊ दे.
राजाधिराज, कर्तव्यदक्ष
छत्रपती शिवराय दुर्गपती,
गजअश्वपती, भूपती, प्रजापती,
सुवर्णरत्नंश्रीपती, अष्टावधानजागृत,
अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत,
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस, सिँहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत पुण्यश्लोकश्री
श्री छ. शिवाजी महाराज की जय||

! "अशी एक पहाट असावी जी भगव्या रंगाने भरलेली असावी .." !

अशी एक पहाट
असावी जी भगव्या रंगाने
भरलेली असावी ..
तिचा तो प्रकाश पाहुन
प्रत्येकाला
स्वातंञ्य मिळल्याची जाणीव
असावी ..
अशी एक राञ असावी जिणे
भरकटलेल्या पाखरांना घरची
वाट दाखवावी ..
त्या वाटेवरुन
जातांना नव्या स्वप्नांची आस
धरावी ..
पुन्हा ती शक्ती प्रकट व्हावी
ज्यातुन प्रत्येक मराठ्यांनी
गुलामीची बेडी तोडावावी ..
मराठ्यांच्या त्या हुंकाराने
पुन्हा ती भगवी क्रांती
जन्मास यावी ..
.
.
जय जिजाऊ ..
जय शिवराय..
जय शंभुराजे

! " शिवरायांची राज्यकारभाराची ऊभारणी " !

राज्यकारभाराची घडी बसवली

राज्यकारभाराची घडी : शिवरायांनी जीवाचे रान करून स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले.स्वराज्यातील प्रजा सुखी होती.देव –देवळे सुरक्षित होती.त्याच प्रमाणे इतर धर्मांचीही प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिली होती, मात्र स्वराज्यावर अनेक संकटे येत होती.या संकटांतून पार पडून स्वराज्य कायम टिकावे ,अशी शिवरायांची इच्छा होती.राज्य कायम टिकवायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे असेल, तर त्यासाठी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवावी लागते.ती शिवरायांनी बसवली.राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे,म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची आठ खात्यांत विभागणी केली. प्रत्येक खात्यावर एकेक प्रधान नेमला.प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले.हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ.प्रधानाचे नाव -पद -काम १.मोरो त्रिंबक पिंगळे –प्रधान - राज्यकारभार चालवले.
२.रामचंद्र नीलकंठ मुजुमदार -अमात्य – राज्याचा जमाखर्च पाहणे.
३.हंबीरराव मोहिते - सेनापती –सैन्याचे नेतृत्व करणे.
४.मोरेश्वर पंडितराव – पंडितराव –धर्माची कामे पाहणे.
५.निराजी रावजी –न्यायाधीश –न्यायदान करणे.
६.अण्णाजी दत्तो –सचिव –सरकारी आज्ञापत्रे पाठवणे.
७.दत्ताजी त्रिंबक वाकनीस –मंत्री –पत्रव्यवहार सांभाळणे .
८.रामचंद्र त्रिंबक डबीर –सुमंत –परराज्यांशी संबंध ठेवणे.
प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाणा अष्टप्रधानी शिवमुख्य राणा !!या चार ओळीत शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले आहेत.यांतील पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे लागत , म्हणजे रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई द्यावी लागे.शिवरायांना माणसांच्या गुणांची पारख होती.एखाद्या जवाहिरया एकेक मोती पारखून तोलून घेतो व त्या मोत्यांचा हार गुंफतो, तशी कसून पारख करून शिवरायांनी आपल्या अष्टप्रधानांची निवड केली होती.त्यांनी प्रधानांना इनामे,वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत;रोख पगार मात्र भरपूर दिला.शिवरायांची सरंक्षण –व्यवस्था : शिवरायांचे सैन्य : शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते.तसेच आरमारदल हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला होता.शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी व घाटावरील मावळे यांचा भरणा असे.सैन्यातील घोडदळतही दोन विभाग होते.एक विभाग बारगीरांचा होता.त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत.बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत.बारगीरांना मासिक पगार देत.घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा .शिलेदारांकडे स्वत:चा घोडा आणि व स्वत : ची हत्यारे असत.शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत .या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाई.शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळ ही मोठे होते,पायदळांच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत .पायदळात हवालदार ,जुमलेदार हजारी ,पंचहजारी असे अधिकारी असत.शिवरायांच्या सैन्याची शिस्त कडक होती.त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत.त्यामुळे स्त्रियांचे रक्षणकर्ते म्हणून म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती.सैनिकांनी दारू पिऊ नये,रयतेला त्रास देऊ नये,रयतेची लुट करू नये ,अशी सैनिकांनी त्यांची सक्त ताकीद होती.सैनिकांचा पगार वेळच्या वेळी मिळे .मराठ्यांचे आरमार : आरमार म्हणजे युद्धानौकांचे तोंड .मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू .त्यांना शिवरायांनी जेरीस आणले,पण सिद्दी ,पोर्तुगीज व इंग्रज हे समुद्रावरील नवीन शत्रू निर्माण झाले.शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टी आरमारदल उभारले .मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात.शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या.सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यांसारखे समुद्रकिल्ले बांधले.युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिम काढल्या .शिवरायांच्या आरमाराचा सागरी शत्रूंवर वचक बसला.त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्लांचा फार उपयोग होई .शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते.किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त होता.प्रत्येक किल्ल्यावर किलेदार,सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत.शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेरखाते होते .बहिर्जी नाईक त्यांच्या हेरखात्याचा प्रमुख होता.शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानखडा माहिती काढून आणत.कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि चढाईचा बेत आखत .मुलकी व्यवस्था : राज्यातील मुलकी व्यवस्थाही शिवरायांनी चोख ठेवली होती.स्वराज्यात बारा सुभे म्हणजे प्रांत .सुभ्यावर सुभेदार हा अंमलदार असे .सुभ्याचे काही विभाग असत,त्यांना परगणा म्हणत .परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत .एका परगण्यात अनेक गावे असत . प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत.राज्याच्या कारभार शिवराय स्वत:बघत.अधिकाऱ्यांचा नेमणुका ते स्वत: करत.प्रधानांना कामे नेमून देत.स्वराज्याचा खजिना द्रव्याने भरलेला असे.राज्यकारभारात हिंदू,मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही.त्यांनी गुणी माणसांना जवळ केले.त्यांना स्वराज्याच्या कार्याला लावले.त्यांचा स्वराज्याच्या कामी करून घेतला.स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही .फितुरांना त्यांनी कडक शिक्षा केल्या .मग तो आपला असो किंवा परका असो.अशा प्रकारे शिवरायांचा राज्यकारभार अतिशय चोख होता.

! " शिवकालीन अष्टप्रधानमंडळ " !

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते.याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत.अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजीच्या राज्याभिषेकासंबंधी उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान अष्टदिक्स्थानापन्न झाले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभा राहिलेला होता. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभा राहिला होता. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दधिदुग्ध पूर्ण तांब्याचा कलश घेऊन उभा राहिला होता. उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितरावमधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभा राहिला होता. यांच्या जवळ मृन्मय कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला अण्णाजी दत्तो पंडित सचिव छत्र घेऊन उभा राहिला होता, नैर्ॠत्यला जनार्दन पंडित सुमंत व्यजन घेऊन उभा राहिला होता, वायव्यस दत्तो त्रिमल मंत्री चामर घेऊन उभा होता व ईशान्यला बाळाजी पंडित न्यायाधीश दुसरे चामर घेऊन उभा राहिला होता.राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.प्रधानमंत्री (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. प्रधानमंत्रीला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.“प्रधान अमात्य सचीव मंत्री,सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,सेनापती त्यात असे सुजाणा,अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता.