पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिध्द आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांमुळे कोल्हापूरने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरला पन्हाळा गड, रंकाळा तलाव, राधानगरी धरण,खासबाग मैदान, शालिनी पॅलेस या ठिकाणांनी वैभवसंपन्न बनविले आहे. या सर्व ऐतिहासिक ठिकाणांसोबत कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे तो शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसने!कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालखंडामध्ये हा नवा राजवाडा उभारणीस १८७७ साली सुरवात झाली व न्यू पॅलेस इ.स. १८८४ मध्ये बांधून पूर्ण झाले. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. राजवाडा परिसरात तलाव, तलावाकाठी राखीव जंगल व जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत. न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे.३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आला. यामध्ये वेगवेगळी प्रेक्षणीय दालने आहेत. या प्रत्येक दालनामध्ये प्राचिन काळातील महाराजांच्या कालखंडात वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. म्युझिअमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमत: दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे घोडयावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र, यानंतर आपण म्युझिअममधील वेगवेगळया दालनात प्रवेश करतो. या म्युझिअममध्ये हत्तीचे दालन, फर्निचरचे दालन,राजश्री छत्रपती शाहू दालन,शस्त्रास्त्र दालन, दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत.हत्तीच्या दालनामध्ये आपणस प्रथम दर्शनी दिसतो तो विविध आभूषणाने सजलेला बैठक स्वरूपातील हत्ती. हत्तीला सजविण्यासाठी असणाऱ्या विविध आभूषणामध्ये हत्तीवरील भरजरी झूल (घाशा), जरी पटका तसेच चांदीची लहान तोफ, प्राचीन काळातील दुमिर्ळ नाणी आपणास या दालनामध्ये पहावयास मिळतात. त्यानंतर येते ते फर्निचर दालन, या दालनात आपणास शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये वापरत असलेले विविध साहित्य पाहता येते.विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत आकर्षक पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजाचे फोटो या दालनात आपणास पाहावयास मिळतात.यानंतर आपण प्रवेश करतो राजश्री शाहू हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराजांची संक्षिप्त ओळख करून देणारे हे दालन खऱ्या अर्थाने आपणास छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना व जीवनपट छायाचित्राच्या स्वरूपात याठिकाणी पहावयास मिळतात. महाराजांच्या बालपणीची छायाचित्रे, छत्रपती शाहू महाराज यांचे अधिकार ग्रहण केलेल्या प्रसंगाचे छायाचित्र, ऑफिसमधील तसेच दिल्ली दरबारात वापरत असलेली खुर्ची , पुर्वीच्या काळातील पितळी खलबत्ता, गिडी जग, तोटी असलेला पितळी तांब्या ठेवण्यात आलेला आहे. शाहू महाराज (पहिले) यांच्या वापरातील कपडे, महाराणी व्हिक्टोरिया यांनी छत्रपती शिवाजी (४ थे) यांना दिलेला करवीर 'राजचिन्हाचा ध्वज' ठेवण्यात आलेला आहे.शाहू कुस्ती मैदान येथे भरवण्यात आलेले कुस्ती मैदान पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचे छायाचित्र तसेच शिकारीचे विविध प्रकार पहावयास मिळतात. जसजसे आपण पुढे पाहत जातो तसे इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा मिळतो. याच दालनामध्ये इतिहास प्रसिध्द घराण्याच्या वंशावळींची ओळख करुन देणारा माहिती फलक पहावयास मिळतो. त्यामध्ये करवीर छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष, पवार छत्रपती घराण्याची वंशावळ, भोसले घराणे शाखेची वंशावळ, कागलकर घाटगे सर्जेराव घराण्यांची वंशावळ अधोरेखीत करण्यात आली आहे.या दालनातील आणखी एक वैशिष्टये म्हणजे शिकारलेल्या निरनिराळ्या प्राण्यांच्या अवशेषापासून बनविलेल्या नाविन्यपूर्ण व विविध उपयोगी वस्तू पाहताना आपण भारावून जातो. सांबराचे शिंग व गेंड्याच्या पायापासून तयार केलेले टी पॉय,गव्याच्या पायापासून तयार करण्यात आलेले पेटी स्टँड, वाघाच्या शेपटीतील मणक्यापासून बनविलेली छडी, वाघाच्या व गव्याच्या पायापासून बनविलेला ऍ़श ट्रे, डुकराच्या दातापासून तयार केलेली फुलदाणी, शहामृगाच्या पायापासून बनविलेले मेणबत्तीचे स्टँड, वाघाच्या कवटीपासून तयार केलेली सिगारेट केस व ऍ़श ट्रे हे सर्व पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. शस्त्रास्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे या ठिकाणी पहावयास मिळतात. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी करण्यासाठी तयार करुन घेतलेली विविध प्रकारची हत्त्यारे, इ. स. १८७० मध्ये श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज (पहिले) इंग्लंडला गेले असता त्यांनी खास ऑर्डर देऊन मागितलेली सोन्याचा मुलामा चढवलेली बंदुक, विविध नमुन्यातील बंदुका तसेच दहा फुटी आकर्षक पुनी गन या ठिकाणी सर्वाचे लक्ष वेधून घेते. जुन्या काळातील ढंका, नौबत, नगारे, चौघडे तसेच डुकराची शिकार करणेसाठी वापरण्यात येणाऱ्या भाल्याची ओळख या शस्त्रास्त्र दालनात होते. यानंतर आपण प्रवेश करतो ते न्यू पॅलेसचा मुख्य भाग असलेला दरबार हॉल. अतिशय प्रशस्त व कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पहावयास मिळतो. दरबार हॉलचे हे भव्य विलोभणीय दृश्य पाहताना पूर्वीच्या काळातील राजे महाराजांचे वैभव आवाक् करुन टाकते. दरबार हॉलमध्ये महाराजांसाठी असलेले कलाकुसरीने भरगच्च सजलेले 'राजसिंहासन' सर्वांचे लक्ष वेधून घेते. तसेच या हॉलमध्ये पुूर्वी जसा दरबार भरायचा तशीच मांडणी अजून ठेवलेली आहे. हॉलमधील छताकडे नजर टाकली असता त्याकाळी कलाकारांनी केलेले नक्षीदार कोरीव काम पाहीले की डोळयाचे पारणे फिटते. हॉलच्या दोन्ही बाजूस खिडकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने बेल्जीअम ग्लासवर अतिशय दुर्मिळ आकर्षक रंगचित्राव्दारे चित्तारलेली आहेत. आपण पुढे जातो ते भारतासह विविध देशातील हिंस्त्र प्राणी, पशू आणि पक्षी यांची शिकार केलेले प्राणी आपणास पाहावयास मिळतात.महाराजा शहाजी छत्रपती (दुसरे) यांनी मारलेला आफ्रिकन गेंडा पाहावयास मिळतो, हिमालयातील खोकड, बर्फाळ प्रदेशातील अस्वल, हिमालयातील काळे अस्वल लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. वेगाने धावणारे चित्त्तळ ( रायबाग), पाहताना त्याच्या नजरेतील धार लक्षात येते हॉलच्या मध्यभागी सर्वाचे लक्ष वेधून घेतो तो वाघांचा कळप, सांबर, चौसिंगा, दुर्मिळ असे कस्तुरी मांजर व खवल्या मांजर, तसेच बुलबुल, बदक,लाव्हऱ्या, कोकीळ, मलबारी खार, हरिचल, ब्लड फेजंन्ट असे विविध प्रकारचे पशू , पक्षी व प्राणी पाहून त्याकाळी महाराजांनी केलेल्या शिकारी डोळयासमोर येऊन उभे राहतात.आपण म्युझिअमच्या बाहेर येतो बाहेरील सर्व भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. म्युझिअमच्या समोर हिरवेगार लॉन आहे. विविध प्रकारच्या वृक्षांमुळे सर्व परिसर निर्सगरम्य वाटतो. बाहेरील आवारामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज तसेच इतर महाराजाचे पुतळे पहावयास मिळतात. पुढील बाजूस प्राणी संग्रहालय व विस्तृत असे जलाशय आहे.या जलाशयामध्ये विविध प्रकारचे प्राणी तसेच दुर्मिळ पक्षी आपणास पहावयास मिळतात. या प्राणी संग्रहालयातील खास वैशिष्टय म्हणजे मध्य भारत येथून प्रत्येक वर्षी साधारणत: जानेवारी महिन्यामध्ये या जलाशयामध्ये स्थलांतरीत होणारा पक्षी म्हणजे चित्रबलाक. हा दुर्मिळ पक्षी इतर कोणत्याही ठिकाणी आपणास पाहावयास मिळत नाही. तसेच जलाशयाच्या मध्यभागी असणाऱ्या झाडावर काळया रंगाचे दुमिर्ळ असा कांडेसर पक्षी झाडाच्या फांदीवर बसलेला आपणास पहावयास मिळतो. जलाशयाच्या कडेला आपण अगदी बारकाईने पाहिले असता आपणास हॉर्न बील डक्स व कासव ही आपल्या मनाला भुरळ घालतात.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 14 June 2015
! " वीर बाजीप्रभु देशपांडे स्मारक किल्ले पन्हं ळा " !
पुणे जिल्ह्यातील भोरतालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदारम्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजातदेशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्या बांदलांचेबाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हेपराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी,स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी नपडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातील२०-२२ तास काम करूनही न थकणार्या बाजींचा पूर्णमावळ पट्टयात मोठा दबदबा होता. त्यांचेप्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहूनछत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलूव्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले.बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठाशिवरायांच्या चरणी वाहिली.महाराजांपेक्षा वयानेमोठ्या असणार्या बाजीप्रभूंच्या मनातमहाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभावहोता आणि वडीलकीच्या नात्यानेकाळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूनेवेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातूनसुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंतपोहोचवण्याची व्यवस्था करणेया भूमिका निभावतांना बाजीप्रभूंनी आपले केवळशौर्यच नव्हे, तर प्राण पणाला लावले.ही घटना स्फुरण चढवणारी,स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही)आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे.बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षितराहण्यासाठी आपला देह अर्पण केला.त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातीलपुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातूनसुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडेनिघाले होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली हेलक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करतहोते. पुढचा धोका लक्षात घेऊनचवडीलकीच्या अधिकारानेबाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्याससांगितले. बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधूगजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत)सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले.सहस्रोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखलेहोते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीतअसतांनाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्याहिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली.पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील(पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते.सिद्धी मसूदचे सैन्य अडवतांना कामी आलेलेमराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी,जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भानबाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूपपोहोचलेयाचा इशारा देणार्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचेकान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हाताततलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारप्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावरकर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.(ही घटना दिनांक २३ जुलै, १६६०या दिवशी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानेआणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्ररक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नावपावनखिंड झाले. बाजी-फुलाजी बंधूंवर विशाळगडावर,महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.बाजीप्रभू आणि फुलाजी यांची समाधी विशाळगडावरआहे. तसेच पन्हाळगडावरबाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजसुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत:मृत्यूला सामोरेजायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजीदेशपांडेंसारख्या सरदारांमुळेस्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतुही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडूनगेलेली पाहतांना महाराजांना काय वाटत असेल हेसांगणे कठीणच.
Subscribe to:
Posts (Atom)