! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 5 October 2014

! " शिवरायांचा मृत्यु कि खून ? " !

शिवरायाचा मृत्यु कि खून ?

संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-
 १. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.
२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.
३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले .


तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ? शिवरायांचा खून  का व  कसा झाला :-- हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )    तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला. दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.   जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.

शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... यदहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते                संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.  कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]


आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :-- पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते. सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "                  

शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.

आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----
१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले." चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते. जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.   बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला. याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत. राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात. शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला.


!तात्पर्य :-                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.

! " वंदन माझे त्या सांत विरांना " !

इतिहास:      

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर. यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले. बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला. शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल. महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता.मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं.
१) विसाजी बल्लाळ
२) दिपाजी राउतराव
 ३) विठ्ठल पिलाजी अत्रे
४) कृष्णाजी भास्कर
५) सिद्धी हिलाल
६)  विठोटजी
७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर .
पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं. प्रतापराव आणि त्यांच्या त्या सहा वीरांना मानाचा मुजरा. -

! " वेडात मराठे वीर दौडले सात " !

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात!

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात!

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्‍ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात!