! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 5 November 2017

ऐतिहासिक रायरेश्वर पठार

ऐतिहासिक रायरेश्वर पठार पावसाळ्यानंतर निसर्गाच्या विविधरंगी कारागिरीनं सजतं. इथले परंपरागत पुजारी असणाऱ्या जंगम वस्तीमुळे रायरेश्वर पठाराला भेट देणं, म्हणजे इतिहास आणि दुर्गम निसर्गपुत्रांचं जगणं जाणून घेण्याची संधीच. जंगमवस्तीत कोणाकडेही निवास आणि जेवणाची छान व्यवस्था होते. रायरेश्वर ते नाखिंद टोक असा ट्रेकही करता येतो. इथल्या ऐतिहासिक मंदिराला भेट देऊन दोन दिवस रायरेश्वराचा मुक्काम छान इतिहासाची उजळणी करण्याची संधी देईल आणि एक छान ठिकाण पाहिल्याचं समाधानही.