! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 4 September 2016

📌भारतातील महत्वाचे धबधबे

📌भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
----------------------------

🙏सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🙏

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना

सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”

🚩गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया🚩

सईबाई निंबाळकर समाधी स्थळ...

माथ्यावर छत्र नाही, चरणावर फुल नाही कि दिव्याचा मिणमिणता उजेड नाही... मित्रानो हे कोणते ठिकाण आहे माहित आहे का...?

हे आहे छत्रपती शिवरायांच्या बरोबरीने रयतेसाठी हयातभर खस्ता खात रयतेच्या स्वराज्याची स्वप्न पाहणाऱ्या आई जिजाऊच्या लाडक्या स्नुषा, छत्रपती शिवरायांची प्रिय अर्धांगिनी, छत्रपती संभाजीराजे यांच्या वंदनीय मातोश्री व स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाईसाहेब महाराज यांची किल्ले राजगडावरती उघड्यावरती आहे

आज ज्या राज्यात न पावणाऱ्या देवाला सोन्याचे सिंहासन मिळते..हाती तलवार हि न धरलेल्या शेंबड्या वीरांची महाकाय स्मारके उभारली जातात..कुडमुड्या लेखक व कवींची स्मृतिस्थळे जोपासली जातात..भ्रष्टाचारने बरबटलेल्या नेत्यांच्या महाकाय समाध्या उभ्या केल्या जातात..औरंजेबाच्या व आफ्झुल्याच्या समाधीला पंचतारांकित सुविधा मिळतात..त्याच राज्यात आज छत्रपती शिवरायांना कायम स्फुर्तीस्थानी असलेल्या व छत्रपती संभाजी महाराज नावाच्या तुफानाला जन्म देणाऱ्या ह्या स्वराज्याचा आध्य महाराणींच्या समाधीला मात्र वनवासच लाभत आहे हे पाहून कुठल्याही मराठी माणसाच्या काळजाला भोके पडली पाहिजेत दुर्दैवाने पण तसे होताना मात्र दिसत नाही..ज्यांची पाऊले आपण वंदन केली पाहिजेत त्याच सईबाईसाहेबाची हि अवहेलना होत आहे ह्याहून आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते..?

आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी अखंड लक्ष्मी अलंकृत सखल सौभाग्यामंडीत महाराणीसरकार सईबाईसाहेब यांची 358 वी पुण्यतिथी त्यानिमित्त आपल्या मराठी माणसांना त्यांची एक आठवण...

नको तिथे लख्ख दिवे अन गरज तिथे काजवे. सरकार आपले खिसे भरण्यात मग्न आहे.