! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Saturday, 24 February 2018

गोंधळ

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा !
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
. .
माळ कवड्यांची घातली गं..
आग डोळ्यात दाटली गं..
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला… आई राजा उधं उधं उधं..
उधं..उधं..
उधं..उधं.. तुळजापूर तुळजाभवानी आईचा
उधं..उधं..
माहुरी गडी रेणुका देवीचा
उधं..उधं..
आई अंबाबाईचा
उधं..उधं..
देवी सप्तशृंगीचा
उधं..उधं..
बा सकलकला अधिपती गणपती धाव
गोंधळाला याव
पंढरपूर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं
गाज भजनाची येऊ दे गं
झांज सुजनाची वाजु दे
पत्थरातून फुटलं टाहो
या प्रपाताचा
चित्रकार - मोहन जाधव