! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 22 September 2014

! " चला इतिहास घडवूया " !

झालेल्या इतिहासाची आठवण करण्यापेक्षा आपण एक संकल्प करूयात की ज्या शिवरायांनी पूण॔ आयुष्य या मराठी मातीसाठी खच॔ केलं त्या शिवरायांचं अखंड महाराष्ट्राचे सप्न पूण॔ करूया .
     त्या शिवाय आपणाला या महाराष्ट्रात कोणी खाणार नाही , या महाराष्ट्रात परकिय लोक ईतक्या प्रमाणात झाले अहेत की , आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या हाताला कामधंदा सूधा भेटणे मूशकिल झाले आहे म्हणूनच म्हणतो चला ऊठा आणि घडवा महाराष्ट्र महाराजां च्या सप्नातला


! " जय भवानी " !
! " जय शिवाजी " !
! " जय महाराष्ट्र " !

! " शिवरायांचा दरारा " !


शिवरायांचा दरारा- संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत.
"शिवरायांचा दरारा"
संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला
मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे….
ते पत्र :-

Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey

हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे….
शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या..
उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता

फक्त बीजे

! " भगव्याला मान हाच आमचा स्वाभिमान " !

कोणाच्या बापाला
अपला मुलगा इंजिनियर करायचा
कोणाला डाँक्टर
कोणाला इंसपेक्टर करायचा
कोणाला कलेक्टर
कोणाला काँन्ट्राक्टर करायचा
आम्हाला तर आमच्या बापाने
एकच मंत्र शिकवला
काहीही कर
कसाही जग
पण
लढं भगव्यासाठी
मरं भगव्यासाठी


! " किल्ले पूरंदर छायाचित्रे " !

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ प्रयागजी प्रभू " !

अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू
८ डिसेंबर १६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढवा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली. २ मार्च १७०० रोजी छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मृत्यु झाला. या बातमीने मोगली गोटात आनंदाचे वातावरण पसरले. त्यांना वाटले आता मराठे शरण येतील आणि मग आपला उत्तरेतला मार्ग मोकळा. पण कसले काय, जरी या बातमीने मराठे खचले होते तरी सुद्धा त्यांनी किल्ला तसाच लढ़वायचा ठरविले. आता त्यांना एक नवे नेतृत्व मिळाले होते, ताराराणीच्या रुपात साक्षात् भवानी माताच मोगलांचा विनाश करण्यास सरसावली होती.राजाराम राजे जाऊन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे. मोगलांनि किल्ल्याच्या तटा खाली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ लायजी पाटील " !

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिलकोकण किनारपट्टीवर फिरंग्यांसोबत मराठ्यांचा अजुन एक शत्रु अजगरा सारखा विळखा घालून बसला होता. अगदी महाराजांच्या शब्दात वर्णन करायचे तर "जैसा घरास उंदीर, तैसाच राज्यास सिद्दी." या सिद्दीचा अम्मल दंडाराजपुरीवर होता, तो स्वराज्यवर हल्ले करुन लूट घेउन पुन्हा आपल्या मुल्खात पसार होत असे. शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , कान्होजी आंग्रे , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते. त्यातीलच एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू. महाराजांनी सिद्दीचा मुलुख तर काबिज केलि पण त्याचा बुलंद जंजिरा मात्र त्यांना प्रत्येक वेळेस हुलकावणी देत राहिला. १६५७ ते १६७८ पर्यंत किमान ८ वेळेस महाराजांनी जंजिरा काबिज करण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही. अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ' आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. ' मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते. लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ? मरणच. लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता. किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही. पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ' प्रभात ' होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ' प्रभात ' हाच शब्द वापरलेला आहे.) अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी. अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन् लायजीची करामत पाण्यात विरघळली.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे कोंडाजी फज॔द " !

कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकार्यांनना ही सल बोलून दाखविली.यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता. फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ रामजी पांगेरा " !

रामजी पांगेरा

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हास्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तोआपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ' मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळीबांगडी ' असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच... वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की , मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.    कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठावमाहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे. आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही आज.कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल. अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ कान्होजी आंग्रे " !

कान्होजी आंग्रे-समुद्रावरचा शिवाजी

सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमार प्रमुख’!स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले.कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर  मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना  ‘सरखेल’ हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्‍याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्‍या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्‍यावर एक दबदबा निर्माण केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक ! दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ फिरंगोजी नरसाळा " !

फिरंगोजी नरसाळा

शाहित्येखानाने स्वराज्यावर आक्रमण केल्यावर पुण्यात लालमहालात मुक्काम ठोकला.शाहित्येखानाच्या फौजा संग्रामदुर्गावर(चाकणचा भूईकोट किल्ला)चालून गेल्या.संग्रामदुर्गाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता.फिरंगोजी महापराक्रमी वीर होता.किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.मुघलांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला.पण किल्या काही दाद देत नव्हता.मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते.अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवसलढविला.मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला.किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले.कारण महाराज म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा.माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.'फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे कान्होजी जेधे " !

कान्होजी जेधे

कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.ही देशमुखी त्यांना अदिलशाहने दिली होती.शिवाजीराजेंच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अदिलशाहने फत्तेखान या सरदारामार्फत सन १६४८ साली शहाजीराजेंना अटक केली होती,तेव्हा कान्होजी व दादाजी लोहोकरे शहाजीराजेंसोबत होते.पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजें अदिलशाहाच्या हुकूमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागीरीच्या ठिकाणी निघाले असता त्यांनी कान्होजींना शिवाजीराजेंकडे पाठविले. शहाजीराजें त्यांना बोलिले,"मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा,राजश्री सिवाजी राजेपण आहेत.त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो.तेथे इमाने शेवा करावी कालकला(बिकट प्रसंगी)तरी जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे(मरण पत्करावे)तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहा.तुमचा भरोसा मानून रवाना करतो(जेधे करीना)शहाजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजीं शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले,"महाराजांनी(शहाजी)शफत घेऊन साहेबांचे शेवेसी पाठविले.तो इमान आपला खरा आहे.खासा व पाच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ."(जेधे करीना)याच सुमारास सन १६४९ साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व अदिलशाहाच्या  वतनदारांना फर्मान धाडिले व आपणा सोबत येण्यास सांगितले.खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले.फलटणचे निंबाळकर पूर्वीपासून अदिलशाहसोबत होते.पण कान्होजीं जेधे आपले पाच पुत्रासह,सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले,"यापुढे खस्त होऊ(मरण पत्करू)तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही."यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजीं कारी या आपल्या गावी आले,व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले.कान्होजी समस्त देशमुखांना म्हटले,"अफजलखान बेईमान आहे.कार्य जालियावरी नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे मर्हाडष्ट राज्य आहे.अवघियांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री..स्वामी सांनिध राहोन येकनिष्ठेने शेवा करावी यैश्या हिमतीच्या गोष्टी सांगितल्या."यावर सर्व देशमुखांनी राजेंकडे जाऊन आपले इमान व्यक्त केले.अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजींनी करून राजांस मोठी मदत केली.प्रतापगडाच्या लढाईत कान्होंजीचा पुत्र बाजी याने जीव महालासोबत राहून महाराजांचे प्राण वाचविले तर खानाचा पाडाव झाल्यावर कान्होजी आपल्या सहकार्यांेसोबत खानाच्या सैन्यावर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौबती, नगारे, बिशादी, खजाना मिळविला.शिवाजीराजेंनी सन १६५५-५६ साली जावळीच्या मोर्यांास शासन केले,त्यावेळी कान्होजी,बांदल,सिलिंबकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले.शाहित्येखानाविरूध्द लढण्यासाठी बाजी व चंदाजी हे कान्होजीचे दोन पुत्र राजेंसोबत लालमहालात गेले होते.राजें तोरणा,राजगडच्या बांधणीत गुंतले असताना,विजापुरी सरदार फत्तेखान याने अचानक पुणे परिसरावर हल्ला केला.राजे तातडीने कान्होजीस पुरंदर किल्ल्यावर आले.मराठ्यांचे गनिमाबरोबर धारोंधर युध्द जाहाले,अनेक मावळे मृत्युमुखी पडले,पराभव झाल्यास मराठ्यांचा ध्वज शत्रुच्या हाती लागू नये म्हणून बाजीने काही गनिमास यमसदनास धाडून ध्वज घेऊन पुरंदरावर आला.तेव्हा राजे निशाण सांभाळून आणले म्हणोन खूष जाहाले व त्यास सर्जाराई असा किताब दिला.पुढे बाजी,सर्जेराव या नावाने ओळखू लागला.पुढे छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेरावने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले.स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓सुर्यराव काकडे " !

सुर्यराव काकडे

सुर्यराव हे,छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते.रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.शिवाजीने 'सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.'असा मोर्यारच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे.शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला,नि म्हणाला,' काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे 'तेव्हा पातशहाने 'शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही'असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले 'तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.'हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे'अशी पत्रे पाठविली.त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव,सुर्यराव तर दुसरीकडून पेशवे,उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल,पठाण,रजपूत,तोफांचे,हत्ती,उंट आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की,तीन कोश औरस चौरस,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले.सहा हजार घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच खजिना,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून पडले.'सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.'विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे, आनंदराव,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले.हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले.'खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते.आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही.'असे बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली. सुर्यराव काकडे समाधीवरील चंद्रसुर्यचंद्रसूर्य असेपर्यंत तुमची किर्ती दिगंतात राहील असा त्याचा अर्थ आहे.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे हिरोजी इंदूलकर " !

हिरोजी इंदलकर

    शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ..मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही .शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठामाणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....विश्वास दिला राज्यानी"आपल राज्य उभा करायचा"मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती ....हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यान कडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला ..आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे .किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली.बायकोसह रायगडावर आला..पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले . राज्याभिषे काच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ..राज्याभिषे काच्या वेळी शिवाजी म्हणाले,"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय."त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,"महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...."महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया .महाराजाना कलेणा हे कसल मागण..पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????आणि हिरोंजी उत्तर देतात,"राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच् या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्य ा वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."

! " शिवरायांचे पराक्रमी माधळ॓ यसाजी कंक " !

येसाजी कंक

           येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

! " शिवरायांचे मावळ॓ बहिर्जी नाईक-" !

बहिर्जी नाईक-

    बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.         बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजारगुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणा‍‍र्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वा‍र्‍याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आजकुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जीनाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांनामाहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहितीपुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत. शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्यादिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशेगुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभागअसायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनीशत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.ब‍र्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातंतयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.