! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 22 January 2016

! " पांडवलेणी, नाशिक " !



नाशिक येथील पांडव लेण्यांना त्रिरश्मी लेणी असेही संबोधले जाते.












 पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[१] सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.


[पांडवलेणी]
स्वरूप संपादन करा
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.


[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]

पांडवलेणे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार - सकाळचे दृश्य
काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते.

अधिक माहिती संपादन करा
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते. या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.


[नाशिक शहराचे विहंगम दृश्य]
पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.

चित्र:पांडवलेणे नाशिक येथील पायऱ्या.JPG
[पांडवलेणे, नाशिक येथील पायऱ्या]न
वाहतूक व्यवस्था संपादन करा
पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून नाशिक बौद्घ लेण्यासाठी बसेस सुटतात. अंबडला जाणाऱ्या बसनेही येथे उतरता येते. तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.

! " त्रंबकेश्वर मंदिर " !


निसर्गरम्य परिसर - त्रंबकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेले नयनरम्य स्थान आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पाचूच्या बेटासारखे हे चिमुकले गाव दिसते. मध्यभागी गंगासागर कुंड आहे. गावाचा पाणीपुरवठा येथून होतो. कुशावर्त कुंड तर तीर्थांचे तीर्थ म्हणून समजले जाते. ब्रम्हगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर्स (४२४६ फुट ) उंच आहे. अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून मान्यवर येत असतात. येथे क्षेत्रस्थ ब्राहमणांनी आपल्या यजमान घराण्याच्या पुरातन वंशावली जपल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक ऐतिहासिक मान्यवरांचे हस्ताक्षर आहे.
भगवान शंकराचे हे भव्य मंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला. १७४५ ते १७७५ च्या दरम्यान पेशव्यांनी हे पवित्र कार्य केले. मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात आहे. कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर भव्य आणि पवित्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा भिंत आहे, तर परिसर दगडांनी बांधलेला आहे, आत भक्तांना स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत व पावित्राने आणि मांगल्याने भरलेला आहे. शिवलिग हे स्वयंभू आहे. पिडीत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन होते. दर सोमवारी पालखी निघते. मंदिराचा कळस सोन्याचा आहे.





! " रायगढ महोत्सव " !

खूशखबर ....!!!        खुशखबर ....!!!!!       खूशखबर ....!!!!!

तमाम शिवभक्त आणि शिवप्रेमी मित्र मंडळींना कळवणयात अत्यंत आनंद होतो
की,  सध्या किल्ले शरायगढावर शिवकालीन रायगढ बघण्याचा योग जुळून आला
आहे कारण रायगढावर दि.21/01/2016 ते दि. 24/01/2016 या दिवसांत 
रायगढ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे जसे त्या काळात होते ते हूबेहूब
तर याची देहि याच डोळा बघण्याची संधी तूम्ही सोडू नये म्हणून आपल्या माहिती
साठी हे पोस्ट .... 

धन्यवाद ...!!!!!

आपलेच बीजे