! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 9 October 2014

|| 350 वर्षांपासून जपलेली ललितापंचमीची परंपरा ||



|| किल्ले प्रतापगड ||

पश्चिम घाटातल्या जावळीच्या खोऱ्यातला किल्ले प्रतापगड हा शिवप्रतापाचं एक महत्वाचं स्थान. अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी इथेच बाहेर काढला आणि प्रतापगड इतिहासात अजरामर झाला.  तो शिवप्रताप हा गड आजही अभिमानाने मिरवतो. या प्रतापगडाने काही शिवकालीन परंपराही आज साडेतीनशे वर्षांनंतरही जोपासल्या आहेत, वृद्धिंगत केल्या आहेत. त्यातील एक परंपरा म्हणजेच, नवरात्राच्या परंपरेमध्येच मिसळलेला एक अनोखा उत्सव शिवकालापासून महाराष्ट्रात आहे तो म्हणजे प्रतापगडावरचा ललितापंचमीचा उत्सव. रात्री या उत्सवात जावळी खोऱ्यातील महाराजांचा हा गड शेकडो मशालींनी दर वर्षी आजपण उजळून निघतो.   नवरात्रातल्या या गडावरच्या उत्सवाच्या परंपरेला शिवकालापासून, म्हणजे मंदिराच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे.म्हणूनच आजचा दिवस त्याच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच आजपण राज्यभरातून  शेकडो शिवभक्त  ही रात्र जागवायला गडावर येतात., कारण नवरात्रातल्या या पंचमीला ज्या भवानीदेवीची स्थापना शिवरायांनी इथं केली तिची पालखी निघते. त्या उत्सवाइतकीच भव्य असते या पंचमीच्या आधीची रात्र. ही संपूर्ण रात्र जागरण गोंधळाने जागून काढली जाते आणि शेकडो मशालींनी हा गड उजळून निघतो. जावळीचं खोरं जसं अंधारात बुडून जातं, तसं या रात्री प्रतापगडावरच्या भवानीच्या मंदिरातून संबळीचा आवाज यायला सुरु होतो. देवीची पूजा होते. देवीचा गोंधळ सुरु होतो.आणि मग प्रत्येक जण या संबळीच्या तालावर ठेका धरतो. प्रत्येक जण देवीचा भुत्या बनतो.  गोंधळ संपतो आणि मग जे या रात्रीचं आकर्षण असतं त्याला सुरुवात होते.प्रतापगडाच्या शरीराचं वैशिष्ट्य असणाऱ्या आकाशात घुसलेल्या टेहळणी बुरुजाच्या चिलखती तटबंदीने एकेक मशाल पेटत जाते. हळूहळू रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात या बुरूजाचा आकार पेटून उठतो. त्याच्या प्रकाशात गड उजळून निघतो.  पाहता पाहता हजारो मशाली पेट घेतात. जावळीच्या खोऱ्याच्या कोणत्याही दिशेने पाहिलत तर जमिनीच्या पोटातून लाव्हा उसळावा तसा अंधारात उजळलेला प्रतापगड दिसायला लागतो.  काही हौशी तरूण विस्तवाला खेळवत धाडसी खेळ करतात.   असा हा गड रात्रभर उजळत राहतो.या रात्रभराच्या जागरणानंतर,  देवीची पालखी गडावरून निघते. नाचत नाचत खोऱ्यात फ़िरते.राजघराण्यातले सारे कुटुंबीय उपस्थित असतात आणि शेकडो वर्षं चाललेल्या या शिवकालीन परंपरेला मोठ्या उत्साहात अजून एक वर्षं जोडलं जातं. 

! स्वराज्याचा शिलेदार !



स्वराज्याची गौरवगाथास्वराज्याचा श्रीगणेशा .........रायरेश ्वरया रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.राजकारणामुळे रायरेश्वर सारख्या शिवकालातील महत्त्वाच्या स्थानाची झालेली उपेक्षा त्यांच्या देहबोलीतून वारंवार व्यक्त होत ,..रायरेश्वर म्हटले की, ‘स्वराज्याची स्थापना’ हा इतिहासातील रोमांचकारी प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतोछत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी या रायरेश्वराचीच निवड केली... त्या दिवशी कुणालाहीचाहूल लागू न देता शिवबा आणि त्यांचे मावळे इथे एकेक करत जमले. कोण होते यामध्ये? दादाजी नरसप्रभू गुप्ते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सोनोपंत डबीर असे स्वराज्यनिर्मित ीतील बिनीचे शिलेदार! सारे एकेक करत जमले आणि या रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.रायरेश्वराच्या पूजाअचेर्ला शिवा जंगम नावाच्या कर्नाटकातील पुजाऱ्याची नियुक्ती झाली होती. त्यांची पस्तीस एक कुटुंबे मंदिराच्या परिसरात आहेतकोट्यावधी रुपये खर्चून मंुबईच्या समुदात शिवाजीमहाराजांच ा भव्य पुतळा बसवण्याचीयोजना साकारत आहे. मात्र शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेली सह्यादीच्या कडेकपारीतील अनेक महत्त्वाची ठिकाणं अद्यापही दुर्लक्षीत आहेत,भोर, पेशव्यांचे पंत सचिव शंकरजी नारायण यांचे वैभवशाली संस्थान. सह्यादीच्याडोंगररांगांनी वेढलेला तालुका. लागूनच सातारा आणि रायगड जिल्हा.रायरेश्वर ४५८९ फूट उंच असून पूर्व-पश्चिम असा १६ किलोमीटर पसरला आहे. रायरेश्वर सुरू झालेली ही डोंगररांग शंभू महादेव रांग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतु मंदिराची अवस्था पाहून इतिहास जनत करून ठेवण्याच्यावृत्तीचा आपल्यामध्ये असलेला अभाव सातत्याने जाणवतराहतो. हवा स्वच्छ असेल तर भोवतालचे १२ किल्ले आणि चार धरणांचे विहंगम दृश्यसहज दृष्टीस पडतेएक ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनहीया डोंगराचा विकास होऊ शकतो. महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याला आता डोंगर किल्ल्यांची आठवण झाली आहे. नाहीतर कोरीगडासारखा हा डोंगरही एखादा खाजगी विकासक केव्हा ताब्यात घेईल हे कळणारही नाही.- जय भवानी जय शिवाजी ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++छायाचित्रे रायरेस्वर मंदिर ( फक्त बीजे )

! " छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड ) " !

" छोटा व मनमोहक धबधबा " ( किल्ले सिंहगड )
मी आणि गॅरी ( अनिल )आम्ही सहज ऐकेदिवशी पूणेला गेलो . गॅरी त्याच्या भावाकडे गेला .आणि मी माझ्या भावाकडे अतूलकडे गेलो, आम्ही मूकामी काञजला राहिलो . अतूल मणाला बालूभाऊ आपण ऊद्या सिंहगडला जाऊ त्याने असे म्हण ला माझा आनंद गगणात मावेना एकदाची सकाळ झाली आणि मी, अविनाश, अतूल निगालो  सिंहगड च्या दिशेने तेवढ्यात गॅरीचा फोन आला की, मी आणि माझा भाऊ सिंहगड ला जात आहोत. योगायोग बघा मी त्याला मणालो आम्ही पण जातोय. तेव्हा ते आमच्या मागेच होते.
     मग काय झाला आमचा ग्रूप मोठा मग खूप इनजाॅय चालू झाला मोटारसायकल ऐकमेकाच्या पूढे पळवायची रेस चालू झाली. मग पोहचलो ऐकदाच त्या वीर " तानाजी मालूसरे " यांच्या कतृत गाजवलेलया किल्ले सिंहगड च्या पायथ्याशी मग कोणी मणत गाढीने डायरेक्ट वरी जाऊ पण मी मणालो , नाही चालत जाऊ होय नको , होय नको मणून झाले ऐकदाचैे तयार चालत जाण्यासाठी  आणि सूरू झाला आमचा प्रवास . रस्ता तसा एकदमच विचित्र दगड झाडे अडचण आम्ही चाला चालता थकायचो थाबायचो . तितक्यात कोणी तरी मणायचे गाढीने वरी गेलो असतो तर बरे झाले असते. पण त्याची समजूत काढून आम्ही पूनहा चालायला लागलो .  आता आम्ही आध॔ रस्ता पार केला तेवढ्यात आम्हाला जे दिसले ते पाहूण आम्ही सगळे जण थक्क झालो .ते महणजे छोटासा पण मनाला वेड लावणारा धबधबा आणि आम्ही सगळयांनी लगेच आपल्या आपल्या मोबाईल ने फोटोकाढायला सूरूवात केली . तितक्यात मी मणालो ग्रुप फोटो PLZ..

     तो धबधबा पाहून पूढे जाण्याची ईच्छा होत नव्हत . तो ऊचावून पडणारा धबधबा आणि तितकीच ती खोल दरी  ते दृष्य पाहून मी अतिशय मनमोहक त्या धबधब्यांच्या प्रेमात पडलो .

धन्यवाद

          फक्त बीजे

! " भगवा " !

भगवा हातात धरणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे, त्यासाठी ह्रदयात आग लागते, मनगटात अब्जावधी हत्तींच बळ लागते, ह्रदयात छत्रपती शिवराय लागतात आणि मुखातून

।। जय भवानी
।। जय शिवराय ।। ची गर्जना करावी लागते....!!!