! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 1 October 2014

! " शेर शिवा का छावा था " !



शेर शिवा का छावा था (
देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।।

तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही । दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।

दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही । हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।।

जिव्हा काटी खून बहाया, धरम का सौदा किया नही । शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नही ।।

रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।। गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से

! Happy Daserra to You and Family in Advance.." !

दसरा, या दिवशी म्हणे सोनं वाटतात.
एवढा मी श्रीमंत नाही.
पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा, या शुभेच्छा...

Happy Daserra to You and Family in Advance...



! " महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त " !

आज लालबहादूर शास्त्री आणि
गांधी जयंती निमित्त पूज्य बापूना आदरांजली
तसेच देशात आजपासुन स्वच्छता अभियान सूरू
झाले आहे यामध्ये भाग घ्या आणि आपला देशाला
स्वच्छता करून पूढे नेऊया
जय हिंद
जय भारत


! " किल्ले प्रचितगढ " !



प्रचितगड
 हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.

गडावर जाण्याच्या वाटा

शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते.कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते.नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते.सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती इंटरनेटवर असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात.

महत्वाची सुचना

चांदोली अभयारण्यातून वाट काढत जाण्यासाठी सोबत वाटाडे असणे महत्त्वाचे आहे. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटले पाहिजे.

वैशिष्ट्य

रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांची हद्द पार करून प्रचितगडावर पोहोचता येते व हा एक धाडसी अनुभव ठरतो.

पाहण्यासारखी ठिकाणे




चांदोली राष्ट्रीय उद्यानचांदोली धरणकंधार डोह

! " किल्ले जिवधन " !

जीवधन
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.जीवधनजीवधननावजीवधनउंची३७५४मी.प्रकारगिरिदुर्गचढाईची श्रेणीकठीणठिकाणपुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारतजवळचे गावघाटघरडोंगररांगनाणेघाटसध्याची अवस्थास्थापना{{{स्थापना}}}घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय!

इतिहास

शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.[ अपूर्ण वाक्य] १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.

गडावरील ठिकाणे



पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.आयताकार असणार्‍या या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

१. कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेऊन चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकून उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे.२. जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.राहण्याची सोयः नाही.जेवणाची - पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर - घाटघर मार्गे - अंदाजे २ तास.