! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 21 December 2015

! " कैलास मठ / भक्तीधाम " !



हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असुन यास ‘’भक्तीधाम ‘’असे देखील म्हणले जाते.या ठिकाणी विविध देवतांची मंदीरे आहेत. "कैलास मठ" हा जुना आश्रम असुन या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सदयस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.


BJ

" ! रामकुंड " !

रामकुंड

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.


Bj













! " श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर " !

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर

श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे.त्रयंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्रयंबकेश्वर मंदिर हे ट्रस्टकडुन केले जाते. ट्रस्टकडुन भक्तांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.



Bj

! " गोंदेश्वर - हेमाडपंथी मंदीर " !

गोंदेश्वर - हेमाडपंथी मंदीर

हे मंदीर नाशिक पासुन 40 कि.मि. अंतरावर सिन्नर जवळ स्थित आहे. येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासुन 32 कि.मि.अंतरावर आहे. भगवान महादेवाचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा नमुना असलेले हे मंदीर असुन सदयस्थितीत हया शैलीतील चांगल्या स्थितीत असलेल्या काही मंदीरांपैकी एक आहे.



Bj

! " मांगी तुगी मंदीर " !

 नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते. मांगी मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे. तुंगी तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत  




Bj

! " काळाराम मंदिर नाशिक " !

काळाराम मंदीर नशिक शहरात पंचवटी भागात स्थित आहे. हे मंदीर मध्यवर्ती बस स्थानका पासुन 3 कि.मि.अंतरावर आहे. मंदिरात जाणेसाठी नाशिक शहरातुन विविध ठिकाणाहुन शहर बस सेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.।




बीजे