! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 17 August 2016

रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

माझ्या आठवणीतला रक्षाबंधन..


माझ्या आठवणीतला रक्षाबंधन !!!!!

सकाळी लवकर उठून

अंघोळीला केलेली घाई

माझ्या आधीच उठलेली

नटून बसलेली माझी ताई...

दादा आवर ना लवकर

म्हणणारी आमची छोटी

माझीच पहिली राखी हं

हाच शब्द तिच्या ओठी ......

रांगोळीने सजल्या पाटावरती

जणू बसला होता तो बाहुला

पेढे मिठाई कुठे गरीबांच्यात

तो गोडवा साखरेवर भागवला ......

बांधली राखी मनगटावर

तोऱ्यात दिला एक रुपाया

तरी रुसून ताई म्हणाली

कायरे आईकडचाच हा रुपाया ....

मलाच समजेना झाले क्षणाला

काय कसे समजावे या वेडीला

तरी समजूत काढत बोललो

मोठा झाल्यावर साडी घेईन तुला .....

काहीच समजत न्हवते तेंव्हा

बंधनातला हा धागा कशाला

सगळेच बांधतात म्हणून बांधायचो

चमचमणाऱ्या पाकळ्या हाताला ...

.

रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

रक्षाबंधन....

नात हे प्रेमच तुझ आणि माझ 

हरवलेले ते गोड दिवस , त्यांच्या मधुर आठवणी 

आज सार सार आठवलाय 

हातातल्या राखी सोबतच .

भाव मनी दाटतोय ..

बंध हे प्रेमाचे नात आहे 

ताई  तुझ आणि माझ नात जन्मो जन्मीचे आहे 

रक्षाबंधन

नात आपलं नितळ प्रेमाचं 
बांधून ठेवलंय या राखीने, 
जीवनात यश मी साधु शकलो 
ताई तुझाच तर साथीने

गावाकडची माती.....!!!!

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं
ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्यालाच ठाव असतं

तांबडी लाल माती नि हिरवी गार शेतं
कौलारू घरांची शाकारलेली छतं

कुठल्याश्या घरातून एक म्हातारी बोलावते
ओळखीचे कोणी नाही, हे पाहून तिची पापणी ओलावते

"कोणाची गं पोर तू? ये आत ये", म्हणते
वाकून भाकरी वाढताना जराशी कण्हते

तिच्या हातची चटणी- भाकरी लागते इतकी गोड
कारण त्यात असते माया नि आपुलकीची ओढ

भाकर खाताना माय पाठीवरून हात फिरवते
टचकन डोळ्यांत पाणी येतं नि आईची आठवण येते

बाहेर खाटल्यावर असतो एक म्हातारा
चीपटं- मापटं शरीर नि डोळ्यांपुढे अंधार सारा

जायची वेळ आल्यावर पाय निघता निघत नाही
आपण वळून पाहिलं नाही, तरी गाव पाहत राही 

गाव सोडलं तरी मन गावीच राहतं
त्याच्या डोळ्यांनी ते सारं गाव पाहतं

प्रत्येकालाच गावी राहिलेले दिवस परत यावेसे वाटतात
गावची नुसती आठवण झाली तरी डोळ्यांत अश्रू दाटतात