रायगडावरील राज्याभिषेक समारंभनंतर काही दिवसातच, म्हणजे १७ जून १६७४ रोजी शिवाजीती आई जिजाबाई हिचा वृद्धापकालाने मृत्यू झाला. समारंभानंतरचे दिवस ती पाचाडच्या कोटात राहिली होती. राज्यरोहणानंतर काहीच दिवसात घडलेली ही दुखद घटना हा शिवाजीसाठी मोठा मानसिक धक्काच होता.
जिजाबाईशी असलेले शिवाजीचे जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा होदेगिरीला शाहजीचा अकाली मृत्यू झाला होता तेव्हा जिजाबाई सती जायच्या तयारीत होती. शिवाजी सुरतेहून परतत असताना त्याला ही दुखद बातमी कळली होती. त्याने तत्काल वेगात परत येऊन जिजाबाईची मनधरणी केली होती व तिला सती जाण्यापासून थांबवले होते. संकटकाळी जिजाबाई ही त्याचा भक्कम आधार होती. तो आधार आज त्याला पारखा झाला होता.
जिजाबाईच्या पार्थिवावर पाचाडला अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच जागी आज तिची समाधी बांधली आहे.
पाचाड ( रायगढ ) येथील जिजामाता यांची समाधी तसेच समाधी वरिल सिलालेख