! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Saturday, 4 October 2014
! " कविता मला कळत नाही " !
मला कळत नाही !
सत्य कळत नाही, मला सत्व कळत नाही
हे रुपेरी जगा मला तुझे रंग कळत नाहीत !
देशासाठी स्वतःचे, व स्वहिता साठी देश-बांधवांचे
रक्त वहावणारे दोघे ही, राजनेता कसे?
मला कळत नाही !
दोस्तासाठी जीव देतात तेच खरे दोस्त
पण स्पर्धेसाठी , दोस्ता चा गळा कापणारे दोस्त!
मला कळत नाही !
कळतात मला एकमेकांचे होण्याची इच्छा बाळगणारे प्रेमी;
पण, एकमेकांना , नेहेमीसाठी विसरणारे प्रेमी!
मला कळत नाही !
गोजिरवाण्या कन्यारत्नाचे खरे तर लाड़ करते आई
पण उमलताक्षणी, त्या कळीला कुसकरणारी आई!
मला कळत नाही !
खरे त्तर दुःख स्वजनांचे आणतात डोळ्यात अश्रु,
पण त्यांच्या आनंदात ही का येतात हर्षाश्रु!

! "इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह" !
पुरंदराचा तह
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमूळे स्वराज्या धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडनचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदारला वेढा घातला.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नवे अशी,
१. किल्ले पुरंदर
२. रुद्रमाळ
३. कोंढाणा (सिंहगड)
४. रोहिडा
५. लोहगड
६. विसापूर
७. तुंग
८. तिकोना
९. प्रबळगड - मुरंजन
१०. माहुलीगड
११. मनरंजन
१२. कोहोज
१३. कर्नाळा
१४. सोनगड
१५. पळसगड
१६. भंडारगड
१७. नरदुर्ग
१८. मार्गगड
१९. वसंतगड
२०. नंगगड
२१.अंकोला
२२. खिरदुर्ग (सागरगड)
२३. मानगड

! "महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार" !
Fakt BJ:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी...
सिद्दी हिलाल
घोडदळातील सेनापती सहाय्यक
पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले.
उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.
सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र)
घोडदळातील सरदार
सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद.
सिद्दी इब्राहिम
शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली.
सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.
नूरखान बेग
स्वराज्याचा पहिला सरनोबत
२१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला.
दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.
मदारी मेहतर
विश्वासू सेवक
आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.
काझी हैदर
शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव
१६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले.
खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.
शमाखान
सरदार
कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली.
सिद्दी अंबर वहाब
हवालदार
जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला
हुसेनखान मियाना
लष्करातील अधिकारी
मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला.
बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च 1679) जिंकले
रुस्तमेजनमा
शिवाजी महाराजांचा खास मित्र
विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले.
हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली.
नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली.
सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले.
दर्यासारंग
आरमाराचा पहिला सुभेदार
खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला.
बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.
इब्राहीम खान
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला.
दौलतखान
आरमाराचा प्रमुख (सुभेदार)
उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०)
खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८)
सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४)
सिद्दी मिस्त्री
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.
सुलतान खान
आरमाराचा सुभेदार
शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.
दाऊतखान
आरमाराचा सुभेदार
अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला.
सुलतान खान नंतर सुभेदार झाला.
पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.
इब्राहिम खान
तोफखान्याचा प्रमुख
स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख.
डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण
पायदळ आणि घोडदळ
१६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही.
घोडदळातील चार मोगली पथके
घोडदळातील सरदार आणि सैनिक
मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.

! " प्रतापगढाची लढाई " !
प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.
पार्श्वभूमी
शिवाजींनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधु संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना इस्लामच्या प्रथे प्रमाणे तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. तसेच खानाचा विजय व्हावा म्हणून वाईच्या ब्राम्हणांनी खानाकडून दक्षिणा घेउन मोठा होमयाग केला. शिवाजींनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.
सैन्यबळ
अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्याय. अफजलखानाने जंजिर्याच्या सिद्दीशी हातमि़ळ्वणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले
शिवाजी-अफजलखान भेट व व्दंद
शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्धकरायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली.भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. वाटेत शिवाजींना खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांने अडवले व वार केला परंतु शिवाजींनी त्याला ठार मारले. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले.शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.
लढाई
मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्यांवर आक्रमण केले. दुसर्या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्य सैन्याची वाताहत झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वा खाली मराठा घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली.
लढाईनंतर
आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुक्सान झाले. शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूर ला पाठवण्यात आले.पुढील १५ दिवसातच शिवाजी महाराजांनी शिवाजीमहाराजांनी यानंतर सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळीलपन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजींचा भारतभर लष्करी दरारा वाढला.

Subscribe to:
Posts (Atom)