! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 24 September 2014

! " शिवरायांच्या दश॔नाला रायगढवारी " !

! वाचण्यासारखे येथे !

बरिच माहिती शिवरायांची घेतल्या नंतर आता माञ मला वेढ लागले होते ते " शिवछञपतींच्या " भेटीचे
मग भेटीसाठी रायगढाला जायला हवे पण सोबतीला कौनी तरी हवे आसा विचार करत दोन महिने यातच गेले. मग ऐक दिवशी निश्चय केला जायचय रायगढा च्या भेटीला योगायोगाने अनिल सोबतीला भेटला आणि माझी अट होती ती महणजे मोटारसायकल ने जायचे . मग निघालो माझ्या घरापासून रायगढ 400 की.मी पण मूकामाची व्यवस्था नसल्याने ऐकयाच दिवशी जायचे , आणि परत यायचे पण हे तिथ गेल्यावर कळले की, अंतर खूप दूर आहे मग महाडला मूकाम केला . पण राञभर झोप आलीच नाही ???, कारण मनात एकच विचार सकाळ केंव्हा होते आणि मी राजाच्या पायावर माथा केंव्हा ठेवतो .मग सकाळी 5 वाजता ऊठून आम्ही निगालो. सकाळ चे ते पहिलेसूय॔ किरण रायगढावर पडायच्या आधी रायगढ चढायला सूरूवात केली . मिञहो रायगड हा किल्ले भव्य , पाहण्या सारखा आणि राज्याची राजधानी खूप काही पाहून झाल्यावरज्याचे मनांपासून वेड होते ते शिवरायांच्या समाधी दश॔नाचे जाऊन त्या राजाच्या पायावर माथा टेकून मी धन्य झालो . आणि आता माझे सप्न आहे की याच देही याच डोळा शिवरायांचा राज्यअभिषेक पाहणे तो 6 जून तूम्ही पण नक्की जा आणि पहा माझ्या राजाच्या दश॔नाला अवघा महाराष्ट्र त्या दिवशी रायगढावर पाण्याच्या लाटासारखा पसरलेला असतो 

धन्यवाद

! "  मी फक्त बीजे " !
! वाचण्यासारखे येथे !

! " माघार घेणे मराठयांच्या रक्ततातच नाही " !

मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही. "
ll जय भवानी ll ll जय
शिवराय ll माघार घेणे हे
मावळ्यांच्या रक्तात नाही.

! " शिवरायांचे फक्त नावच पूरे " !

शिवविचार
  एक लहान मुलगा घरि आला अन आइला म्हणाला आइ एक विचारु? आइ म्हणालि विचार ना बाळा.त्यावर मुलगा म्हणाला आमचे सर आज शाळेत म्हनाले रोज सकाळि उठुन देवाच दर्शन घ्या आपल मन शुद्ध राहत.पण आइ नेमका आपला देव कोणता? त्यावर आइ मुला देवघरात घेउन गिलि अन भिंति वर लावलेल्या एकेक फोटो दाखवत देवांचि नावे सांगत मुलाला पाया पड म्हनत.तितक्यात आइ हात पुढच्या फोटो कडे गेला ति काहि सांगन्याच्या आत मुलाने पटकन हात जोडुन आपला माथा त्या फोटोतिल चरनावर ठेवला.आइला लहान मुलाचे नवलच वाटले.तिने कारे बाळा मि काहि सांगायच्या आत तु या फोटो कडे बघुन लागलिच हात जोडले तुला माहित आहेत का हे कोण आहेत? मुलगा लगेच म्हनाला हो! हा माझा राजा राजे छत्रपति शिवाजि महाराज.
       बघा माझ्या राजच वैभव ज्याला सागायचि गरज नाहि हा कोण? दिसति प्रतिबिंब माझ्या राजाचे आपोअप कर जुळति अवघ्या बहुजनांचे.

     
@ बीजे ऐक वादाळ @

! " किल्ले पूरंदर येथे काढलेले काही अप्रतिम छायाचित्रे " !

! फक्त बीजे  !











! " तूळजा भवानी तूळजापूर " !

उद्यापासून सुरू होणा-या
दुर्गामहोत्सवाच्या तुम्हाला व
तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा...
आई भवानी आपणा सर्वांना सुख,
समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद
देवो,अशी तीच्या चरणी प्रार्थना.....


! " किल्ले पूरंदरचा आणि मूरारबाजीचा इतिहास " !

मुरारबाजीचा पराक्रम    

अभिप्रायदिलेरखानने वज्रगडावर मोठ्या तोफा चढवल्या. तिथून पुरंदरचा कंदकडा ह्या तोफांच्या टप्प्यात येत होता. जवळपास सगळी पुरंदर माची आता मुघलांच्या ताब्यात होती. त्याने पाच हजार कडवे पठाण गोळा करुन पुरंदरच्या सर दरवाज्यावर मोठा हल्ला केला. शत्रु सैन्यावर मुरारबाजी लक्ष ठेवून होता. पठाणांची फौज सर दरवाज्याकडे येताना त्याने पाहिली व सुलतानढवा करण्याचा दिलेरखानचा मनसुबा ओळखला. त्याने गडावरचे सातशे शूर मावळे घेतले. त्यांच्यासमोर पाच हजार पठाणांचे लक्ष ठेवून त्यांना मुघलांचा हल्ला मोडून काढायला त्याने प्रेरित केले. सर दरवाजा उघडला व सातशे वीरांची लाट गडगडत पुरंदर माचीकडे जाऊ लागली. खाली जाताच पठाणांच्या समुद्रावर प्रचंड आवेशात आदळली. मराठे त्या सैन्य सागरात भगदाड करून पुढे पुढे सरकू लागले. मुरारबाजी तर न भूतो न भविष्यती असा लढत होता. पठाणांच्या बचावाला कापत पुढे जात तो दिलेरखानाकडे सरकू लागला. इतक्या कडव्या रेट्याची दिलेरखानलाही बहुदा कल्पना केली नव्हती. मुरारबाजीच्या व मराठ्यांच्या धडकेमुळे त्याला थोडे मागे हटावे लागले. मुरारबाजीच्या तलवारीवर तर तो बेहद खुष झाला. त्याने त्या गदारोळातच मुरारबाजीला थांबवले व मुघलांकडे येण्याचे आमंत्रण दिले. सोबत मोठ्या पदाचे व सन्मानाचे लालुचही दाखवले. दिलेरखानाच्या बोलण्याने मुरारबाजी आणखी संतापला व त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला. दिलेरखानाकडे सरकत तो त्यावर वार करणार इतक्यात दिलेरखानचा बाण त्याच्या मानेला लागला व तो घोड्यावरुन कोसळला. मुरारबाजी पडला. मुर्तीमंत वीरता पुरंदरसाठी लढता लढता गतप्राण झाली. त्याचे रणांगणावरचे तेज इतके होते की दिलेरखानलाही त्याच्या मृत्यूबद्दल वाईट वाटले असेल. मुरारबाजीच्या प्रतिहल्ल्याचे उद्दिष्ट त्याच्या वीरमरणाने पूर्ण झाले होते. उरलेले मावळे त्याचे पार्थिव घेऊन गडावर पसार झाले. स्वतंत्रतेच्या देवतेला पुरंदरवर आणखी एक अनमोल आहुती वाहिली होती. मुरारबाजी पडल्यावरही उरलेल्या मराठ्यांनी गड भांडता ठेवला. आम्ही सगळे मुरारबाजीच आहोत अशा आवेशात ते भांडत होते. त्यांच्या शौर्याला काही सीमाच नव्हती.