! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 24 September 2014

! " किल्ले पूरंदरचा आणि मूरारबाजीचा इतिहास " !

मुरारबाजीचा पराक्रम    

अभिप्रायदिलेरखानने वज्रगडावर मोठ्या तोफा चढवल्या. तिथून पुरंदरचा कंदकडा ह्या तोफांच्या टप्प्यात येत होता. जवळपास सगळी पुरंदर माची आता मुघलांच्या ताब्यात होती. त्याने पाच हजार कडवे पठाण गोळा करुन पुरंदरच्या सर दरवाज्यावर मोठा हल्ला केला. शत्रु सैन्यावर मुरारबाजी लक्ष ठेवून होता. पठाणांची फौज सर दरवाज्याकडे येताना त्याने पाहिली व सुलतानढवा करण्याचा दिलेरखानचा मनसुबा ओळखला. त्याने गडावरचे सातशे शूर मावळे घेतले. त्यांच्यासमोर पाच हजार पठाणांचे लक्ष ठेवून त्यांना मुघलांचा हल्ला मोडून काढायला त्याने प्रेरित केले. सर दरवाजा उघडला व सातशे वीरांची लाट गडगडत पुरंदर माचीकडे जाऊ लागली. खाली जाताच पठाणांच्या समुद्रावर प्रचंड आवेशात आदळली. मराठे त्या सैन्य सागरात भगदाड करून पुढे पुढे सरकू लागले. मुरारबाजी तर न भूतो न भविष्यती असा लढत होता. पठाणांच्या बचावाला कापत पुढे जात तो दिलेरखानाकडे सरकू लागला. इतक्या कडव्या रेट्याची दिलेरखानलाही बहुदा कल्पना केली नव्हती. मुरारबाजीच्या व मराठ्यांच्या धडकेमुळे त्याला थोडे मागे हटावे लागले. मुरारबाजीच्या तलवारीवर तर तो बेहद खुष झाला. त्याने त्या गदारोळातच मुरारबाजीला थांबवले व मुघलांकडे येण्याचे आमंत्रण दिले. सोबत मोठ्या पदाचे व सन्मानाचे लालुचही दाखवले. दिलेरखानाच्या बोलण्याने मुरारबाजी आणखी संतापला व त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला. दिलेरखानाकडे सरकत तो त्यावर वार करणार इतक्यात दिलेरखानचा बाण त्याच्या मानेला लागला व तो घोड्यावरुन कोसळला. मुरारबाजी पडला. मुर्तीमंत वीरता पुरंदरसाठी लढता लढता गतप्राण झाली. त्याचे रणांगणावरचे तेज इतके होते की दिलेरखानलाही त्याच्या मृत्यूबद्दल वाईट वाटले असेल. मुरारबाजीच्या प्रतिहल्ल्याचे उद्दिष्ट त्याच्या वीरमरणाने पूर्ण झाले होते. उरलेले मावळे त्याचे पार्थिव घेऊन गडावर पसार झाले. स्वतंत्रतेच्या देवतेला पुरंदरवर आणखी एक अनमोल आहुती वाहिली होती. मुरारबाजी पडल्यावरही उरलेल्या मराठ्यांनी गड भांडता ठेवला. आम्ही सगळे मुरारबाजीच आहोत अशा आवेशात ते भांडत होते. त्यांच्या शौर्याला काही सीमाच नव्हती.

No comments:

Post a Comment