संस्कृत भाषेत ज्याचा अर्थ “महान राष्ट्र” असा होतो आणि खरोखरच ह्या नावाला साजेल अशीच संस्कृती असणारा महाराष्ट्र म्हणजे,शूर-वीरांची भूमी.आपल्या मुशीतून त्याने वविधरंगी संस्कृती प्रवाहांना सामावून घेतले आहे.भारतीय स्त्रीवादी चळवळीचा उगम जिथे झाला,ती भूमी आजच्या आधुनिक लोकशाहीचे माहेरघर आणि जगातील सर्वात मोठी चित्रपट नगरी असा लौकिक बाळगून आहे. खरोखरीच,आत्मविश्वास आणि आत्मसंयमाने “महाराष्ट्र” आपले नाव सार्थ करणारे “महान राष्ट्र”आहे.
सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्राचा देशाच्या औद्योगिक उत्पादनात २५% वाट आहे.तर दरडोई उत्पनाच्या २३% वाट आहे.
आधुनिकतेची कास धरलेल्या महाराष्ट्रातील लोकांची मने मात्र अजूनही आपल्या प्राचीन परंपरा, संस्कृती यांचा संपन्न वारसा जपत आपल्या मुळांशी घट्ट जोडलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती हि उभ्या महाराष्ट्राची दैवतेही आणि नाजूक, हळवे कोपरेही; पण सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्राचा पिंड मात्र पुरोगामी,सहनशील आणि उत्साही असाच आहे.
८०% हिंदू लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात वारसा स्थळांच्या रूपाने मौल्यवान खजिनाच दडलेला आहे.हि सर्व वारसास्थळे इथे नांदणाऱ्या जैन,बौद्ध,ख्रिश्चन परमपरांच्या मनोहर रंगछटांची जणू साक्षच देतात.मग ती कोकणपट्ट्यात असणारया अष्टविनायकाची यात्रा असो कि औरंगाबाद जवळील ख्रिस्तपूर्व काळातील अजिंठा वेरूळ असो.अथवा माहीमचे मदर मेरी चर्च असो किंवा हाजी अलीची मुंबई येथील मशीद असो. कलेविषयी उच्च अभिरुची आणि ओढ असणाऱ्या जाणकाराला खिळवून ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी इथे आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ल्यांचे असाधारण महत्त्व आहे.महाराष्ट्राच्या कठीण खडकाळ भूप्रदेशात शत्रूला रोखण्यासाठी आवश्यक असणारा भक्कम आधार ह्या किल्ल्यानीच दिला. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणारे आणि स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय स्थान जपणारे हे बरेचसे किल्ले साधारणत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळखंडात बांधले गेले.ह्यापैकी प्रत्येक किल्ला आपल्याला व्यूहरचना, युधाकौशाल्या आणि गुप्त खलबते यांच्या आधारे मिळवलेल्या वैभवशाली विजयगाथा सांगतो.त्यातून राज्यशास्त्र संरक्षणात्मक व्युह्तंत्र आणि व्यवस्थापन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप काही आहे.
सर्वसामान्य जनतेच्या पाठींब्याने आणि आपल्या दूरदृष्टीने दख्खनच्या क्षितिजावर नवस्वराज्याची स्थापना करणारा हा भारतातील एक महान राजा कसा घडला, याची कहाणी आपल्याला प्रत्येक किल्ला सांगतो. शिवाजी महाराजांच्या विजयाच्या कथांमाधून विवध किल्ले आणि त्यांवरील लढायांमधून महाराजांनी दाखवलेल्या शौर्याची गाथा पोवाडयानधून ऐकायला मिळते.
No comments:
Post a Comment