कलाल बांगडी या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.[ वादळ ]
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 27 December 2017
Wednesday, 20 December 2017
राजधानी रायगडचे वर्णन
राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स
23 मे 1673 रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो-
"सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठिकाणी पायरया तयार केल्या होत्या आणि पुढे दरवाज्या जवळ गेलो असता तेथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे 24 फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन 40 फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे.
जर शत्रुने पहिली भिंत पार केली तर तर त्यांना हकलुन लावान्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. अशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्गम बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.”
—थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल
सौजन्य : शिवरायांचा शिलेदार
फुलात न्हाली पहाट ओली,
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!
Monday, 4 December 2017
श्री शिवरायांची पूजा.
सांगलीकरांकडून दररोज होते किल्ले श्री रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची पूजा.
लेख आवर्जुन वाचा
रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पाऊस -वारा यांची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
दर दोन दिवसांनी शहरातील दोन शिवभक्त स्वखर्चाने सांगली ते रायगड असा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून ‘रोप वे’चा उपयोग न करता पायी चालत गडावर जातात.
या उपक्रमास शिवभक्त ॥ श्री रायगड व्रत ॥ असे म्हणतात.
यामध्ये एकादिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणताही उपक्रम अव्याहत चालविणे ही अशक्य गोष्ट असल्याचा सर्वसाधारण समज आहे, परंतु सांगलीतील शिवभक्तांनी रायगड व्रताच्या माध्यमातून या संकल्पनेलाछेद दिला आहे.
१४ जानेवारी १९९१ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान चे संस्थापक श्री संभाजीराव भिडे (गुरूजी) यांनी प्रारंभ केला.
प्रारंभापासूनच प्रत्येकाने स्वखर्चाने गडावर जायचे आणि पूजा करायची, हा दंडक शिवभक्तांनी जपला आहे.
बहुतांशजण एसटी बसनेच प्रवास करतात. शिवभक्त सांगलीहून कऱ्हाड, तेथून महाडमार्गे रायगडावर पोहोचतात. तेथे गेल्यावर रात्री गडावरील धर्मशाळेत मुक्काम करतात.
पहाटे उठून गडावरील छत्रपती श्री शिवरायांची समाधी, महाराजांचे सिंहासन, होळीच्या माळावरील महाराजांची मूर्ती, श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री शिरकाई देवीची मूर्ती आणि गडाच्या पायथ्याशी पाचड येथील राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी या सहा ठिकाणी पूजा करण्यात येते.
दुपारी श्री शिवचरित्राचे वाचन करण्यात येते. रात्री पुन्हा गडावरच मुक्काम करून पहाटे पुन्हा सहा ठिकाणी पूजा करून दोघे शिवभक्त सांगलीकडे रवाना होतात.
त्याच दिवशी दुपारी सांगलीहून दुसरे दोघेजण रायगडाकडे जाण्यासाठी निघतात.
रायगडला जाऊन पुन्हा सांगलीत येईपर्यंत कोणीही हॉटेलमध्ये जेवण करीत नाही. जातानाच दोन दिवसांची शिदोरी बांधून नेण्यात येते.
या उपक्रमात खंड पडू नये यासाठी वर्षाच्या प्रारंभीच १८३ दिवसांकरिता शहरातील ३६६ शिवभक्तांचे वेळापत्रक शिवप्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात येते.
त्यामध्ये बदल होत नाही. काही अडचण निर्माण झाली, तर संबंधित शिवभक्तच दुसऱ्या दोघांची सोय करून देतात.
प्रत्येक शिवभक्ताला सरासरी ८०० रुपये प्रवास खर्च येतो.
सांगलीहून रायगडावर जाऊन पूजा करण्यापेक्षा तेथे रोजच्याकरिता पगारी माणूस नेमण्याचा सल्ला काहींनी दिला होता, परंतु तो सल्ला सर्वच शिवभक्तांनी नाकारला.
तेथे जाऊन पूजा केल्यानंतर वेगळीच अनुभूती येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला. भारतीय परंपरा, रुढी, सण यांचे रक्षण छत्रपती श्री शिवरायांनी केले. त्यामुळे देवांचाही देव असलेल्या शिवरायांच्या समाधीची पूजाकरणे हे कर्तव्यच असल्याची शिवभक्तांची भावना आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळणे, वेळेत बस न मिळणे अशा अडचणी येतात. असे असले तरीही रायगड व्रतामध्ये खंड पडत नाही.
तीस रुपयांत बारा हार
ज्यावेळी रायगड व्रतास प्रारंभ झाला,त्यावेळी सांगलीतील श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीसमोरच्या जाधव बंधूंनी गडावरील दोन दिवसांच्या पूजेसाठी बारा हार तीस रुपयांना दिलेहोते.
त्यावेळेपासून आजअखेर त्यांनी हारांची रक्कम वाढविलेली नाही ! आजही शहरातून जाणाऱ्या शिवभक्तांना जाधव बंधू तीस रुपयांमध्येच बारा हार देतात.
श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान
कोंडाजी फर्जंद
कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १६७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.
Saturday, 2 December 2017
शिवरायांची धोरणी नजर
शिवरायांची धोरणी नजर मावळातील एका कोणे एके काळापासुन उभ्या असलेल्या डोंगरावर पडली अन त्या पुराणपुरुषाच रुपांतर दुर्गपुरुषात झाल. तोच तो इतिहासाच्या पानापानांनी गौरवलेला गडांचा राजा आणि राजांचा गड-किल्ले राजगड!
गुंजवणी,कानद आणि नीरा नदीच्या बेचक्यातील गुंजण मावळातील हा डोंगर तापसांना फार आधीपासुन माहित असावा.ब्रम्हर्षी ऋषींच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारा हा डोंगर "बिरमदेवाचा डोंगर" ह्या नावाने मावळाला माहीत होता.यादव आणि बहमनी पुढे आदिलशाही-निजामशाही कालखंडामधे एक दुर्लक्षित ठाण एवढेच ’बिरमदेवगडाला’ मह्त्व होत. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करीद्रुष्ट्या असलेल मह्त्वपुर्ण स्थान,तीन दिशांना असलेला विस्तार अचूक जाणून घेत त्याला तटबंदीचा साज चढवून डोंगरावर उभारलेल्या जगातील एका सर्वोत्क्रुष्ट राजधानीत रुपांतर केलं. राजगड हा एक आदर्श डोंगरी किल्ला आहे.घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही आदर्श डोंगरी किल्ल्याबाबतीत आढळणारी सर्व वैशिष्ट्ये राजगडासंदर्भात आढळतात.