! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 4 December 2017

श्री शिवरायांची पूजा.

सांगलीकरांकडून दररोज होते किल्ले श्री रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची पूजा.

लेख आवर्जुन वाचा

रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पाऊस -वारा यांची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
दर दोन दिवसांनी शहरातील दोन शिवभक्त स्वखर्चाने सांगली ते रायगड असा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून ‘रोप वे’चा उपयोग न करता पायी चालत गडावर जातात.
या उपक्रमास शिवभक्त ॥ श्री रायगड व्रत ॥ असे म्हणतात.
यामध्ये एकादिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणताही उपक्रम अव्याहत चालविणे ही अशक्य गोष्ट असल्याचा सर्वसाधारण समज आहे, परंतु सांगलीतील शिवभक्तांनी रायगड व्रताच्या माध्यमातून या संकल्पनेलाछेद दिला आहे.
१४ जानेवारी १९९१ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान चे संस्थापक श्री संभाजीराव भिडे (गुरूजी) यांनी प्रारंभ केला.
प्रारंभापासूनच प्रत्येकाने स्वखर्चाने गडावर जायचे आणि पूजा करायची, हा दंडक शिवभक्तांनी जपला आहे.
बहुतांशजण एसटी बसनेच प्रवास करतात. शिवभक्त सांगलीहून कऱ्हाड, तेथून महाडमार्गे रायगडावर पोहोचतात. तेथे गेल्यावर रात्री गडावरील धर्मशाळेत मुक्काम करतात.
पहाटे उठून गडावरील छत्रपती श्री शिवरायांची समाधी, महाराजांचे सिंहासन, होळीच्या माळावरील महाराजांची मूर्ती, श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री शिरकाई देवीची मूर्ती आणि गडाच्या पायथ्याशी पाचड येथील राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी या सहा ठिकाणी पूजा करण्यात येते.
दुपारी श्री शिवचरित्राचे वाचन करण्यात येते. रात्री पुन्हा गडावरच मुक्काम करून पहाटे पुन्हा सहा ठिकाणी पूजा करून दोघे शिवभक्त सांगलीकडे रवाना होतात.
त्याच दिवशी दुपारी सांगलीहून दुसरे दोघेजण रायगडाकडे जाण्यासाठी निघतात.
रायगडला जाऊन पुन्हा सांगलीत येईपर्यंत कोणीही हॉटेलमध्ये जेवण करीत नाही. जातानाच दोन दिवसांची शिदोरी बांधून नेण्यात येते.
या उपक्रमात खंड पडू नये यासाठी वर्षाच्या प्रारंभीच १८३ दिवसांकरिता शहरातील ३६६ शिवभक्तांचे वेळापत्रक शिवप्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात येते.
त्यामध्ये बदल होत नाही. काही अडचण निर्माण झाली, तर संबंधित शिवभक्तच दुसऱ्या दोघांची सोय करून देतात.
प्रत्येक शिवभक्ताला सरासरी ८०० रुपये प्रवास खर्च येतो.
सांगलीहून रायगडावर जाऊन पूजा करण्यापेक्षा तेथे रोजच्याकरिता पगारी माणूस नेमण्याचा सल्ला काहींनी दिला होता, परंतु तो सल्ला सर्वच शिवभक्तांनी नाकारला.
तेथे जाऊन पूजा केल्यानंतर वेगळीच अनुभूती येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला. भारतीय परंपरा, रुढी, सण यांचे रक्षण छत्रपती श्री शिवरायांनी केले. त्यामुळे देवांचाही देव असलेल्या शिवरायांच्या समाधीची पूजाकरणे हे कर्तव्यच असल्याची शिवभक्तांची भावना आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळणे, वेळेत बस न मिळणे अशा अडचणी येतात. असे असले तरीही रायगड व्रतामध्ये खंड पडत नाही.
तीस रुपयांत बारा हार
ज्यावेळी रायगड व्रतास प्रारंभ झाला,त्यावेळी सांगलीतील श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीसमोरच्या जाधव बंधूंनी गडावरील दोन दिवसांच्या पूजेसाठी बारा हार तीस रुपयांना दिलेहोते.
त्यावेळेपासून आजअखेर त्यांनी हारांची रक्कम वाढविलेली नाही ! आजही शहरातून जाणाऱ्या शिवभक्तांना जाधव बंधू तीस रुपयांमध्येच बारा हार देतात.

श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान

No comments:

Post a Comment