कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या मूर्तीला आज मावळत्या सूर्यकिरणांनी स्पर्श केला. सूर्याची किरणं अंबाबाई मूर्तीच्या मानेपर्यंत जाऊन लुप्त झाली.
सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण सुरु असताना सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर पडतात. हेमाडपंथी बांधकामातील अंबाबाई मंदिरातील भौगोलिक अविष्कार पाहण्यासाठी देशभरातून भाविक मंदिरात येतात.
दरवर्षी 9,10 आणि 11 नोव्हेंबर तसंच 31 जानेवारी 1 आणि 2 फेब्रुवारी या काळात हा नेत्रदीपक सोहळा पाहायला मिळतो.
No comments:
Post a Comment