ठोसेघर धबधबा
साताऱ्याची तुलना कोणाशी करायची झाल्यास ती फक्त साताऱ्याशीच होऊ शकते
ठोसेघर धबधबा ! सातारा , thoseghar waterfall ! satara
'ठोसेघर' चा धबधबा तसा साता-याशी निगडीत सर्व लोकांना नक्कीच ठाऊक असेल.
सर्व सातारकरांना विनंती कि फोटो share करून साऱ्या जगाला दाखवा
आणि सातारा पर्यटन वाढीस चालना द्या …
सातारा शहरापासून तासाभराच्या अंतरावर हा धबधबा आहे.
पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे.
विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.
'धबाबा आदळे तोय' या समर्थ रामदास स्वामींच्या पक्तींचा अनुभव
रामदासस्वामींच्याच सज्जनगडापासून जवळ असणाऱ्या ठोसेघर धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांना येणार आहे
पावसाळा सुरू झाला की ठोसेघरचा प्रसिद्ध धबधबा पर्यटकांना जणू मोहिनी घालतो.
म्हणूनच यंदा ठोसेघर ग्रामपंचातीने पर्यटकांच्या स्वागतासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
धबधब्याचा जलप्रपात पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन
झुणका-भाकरची मऱ्हाटमोळी झणझणीत मेजवानी दिली जाणार आहे.