! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 28 October 2016

एक पणती माझ्या *स्वराज्याची*

एक पणती माझ्या *स्वराज्याची*
एक पणती माझ्या *राजमाता जिजाऊंची*
एक पणती *माझ्या धनी शिवरायांची*
एक पणती माझ्या *सर्जा शंभूरायाची*
एक पणती ह्या *मातीसाठी रक्त सांडलेल्या मावळ्याची*
एक पणती *अभेद्य बुलंद आमच्या गडकोटांची*
एक पणती *माझं स्वराज्य रक्षिलेल्या त्या प्रत्येक चिर्याची*
एक पणती *माझ्या राजा पुढं झुकलेल्या त्या सागरी लाटांची*
एक पणती *बाजीची, तानाची, जीवाची*
एक पणती *थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची*
एक पणती *त्या अफाट बेलाग सह्याद्रीची*
एक पणती *उरी दाटलेल्या अभिमानाची*
एक पणती *प्रेम वात्सल्य मायेची*
एक पणती *अभिमान, शौर्य, राष्ट्रप्रेमाची*
एक पणती *माझ्या स्वराज्याच्या थाटाची*
एक पणती *राजं तव चरणी माझ्या परिवाराची!!*

*~दिवाळीच्या आपणांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा*

No comments:

Post a Comment