सिद्ध असे झुंजीस सदा
हि रणमर्दाची छाती,
प्राणांहुनी प्रिय मानीतो
माय मराठी माती..!!
इथल्या गडकोटांशी आमुची
शतजन्माची नाती,
सदैव तेवत असती येथे,
बलिदानाच्या वाती..!!
कोण भितो मरणास..?
जंन्मलो वाघाच्या काती,
खडे कापती गणिमाला
ह्या तलवारींची पाती..!!
मानीत नसतो कदापी आम्ही
धर्म, पंथ ना जाती,
स्मरतो केवळ ह्रदयामधुनी
हिंदवी स्वराज्याची नाती..!!
शिवशंभुचे स्वराज्य नांदो
ध्यास हा दिनराती,
दाही दिशांतुनी नाद गुंजतो
राजे शिवछञपती..!!
राजे शिवछञपती..!!
हि रणमर्दाची छाती,
प्राणांहुनी प्रिय मानीतो
माय मराठी माती..!!
इथल्या गडकोटांशी आमुची
शतजन्माची नाती,
सदैव तेवत असती येथे,
बलिदानाच्या वाती..!!
कोण भितो मरणास..?
जंन्मलो वाघाच्या काती,
खडे कापती गणिमाला
ह्या तलवारींची पाती..!!
मानीत नसतो कदापी आम्ही
धर्म, पंथ ना जाती,
स्मरतो केवळ ह्रदयामधुनी
हिंदवी स्वराज्याची नाती..!!
शिवशंभुचे स्वराज्य नांदो
ध्यास हा दिनराती,
दाही दिशांतुनी नाद गुंजतो
राजे शिवछञपती..!!
राजे शिवछञपती..!!
No comments:
Post a Comment