! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 17 November 2014

" कोल्हापूर शहर "

कोल्हापूर शहर हे कलेचे माहेरघर व मराठी सत्तेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराला संपन्न संस्कृतीचा वारसा लाभला आहे.
पद्यपुराण व स्कंदपुराणामध्ये या शहरास करवीर किंवा दक्षिण काशी असे संबोधिले आहे. कोल्हापूर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आहे. कोल्हापूरच्या भूतकाळाकडे वळून पाहिल्यास असे लक्षात यईले की कोल्हापूरावर पौराणिक काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक राजांनी राज्य केले. हिदु युग सन १३४७ मध्ये संपले व त्यानंतर मुस्लिम शासन आले व हे शासन सन १३४७ ते १७०० पर्यंत राहिले. सुंदर महाल, मंदिरे कोल्हापूरात राजे सातवाहन शिलाहार यांच्या वैभवशाली साम्राज्यात बांधण्यात आली होती. मराठ्यांनी आपले नियंत्रण या शहरावर सुमारे १७०० ते १८४९ पर्यंत ठेवले होते. सन १८४९ मध्ये ब्रिटीशांनी कोल्हापूर शहर काबीज केले व छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूरचे शासक म्हणून नियुक्ती केली.
छत्रपती शाहू महाराजांच्या शासन काळात प्रगतीशील विचार लाभले व त्यामुळे नाट्य, चलत्‌चित्र, संगीत, चित्रकला, शिल्पकला, कुस्ती व हस्तकलांना प्रोत्साहन मिळाले. परिणामत: ह्या शहराला मौल्यवान सांस्कृतिक परंपरा लाभली. सन १९४५ साली पंचगंगा नदीच्या जवळच्या डोंगरावर करण्यात आलेल्या पुरातत्व उत्खननामध्ये रोमनकाळाच्या एका प्राचीन शहराचा अवशेष सापडला.
आजचे कोल्हापूर म्हणजे प्राचीन कलात्मक परंपरा आणि आधुनिक गतिशील औद्योगिक वर्तमान यांचा सुरेख समन्वय आहे.

No comments:

Post a Comment