! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 27 February 2017

शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती..........

       ६ जुन १६७४, जेष्ठ शुद्ध त्रियोदशी, शनिवार ये दिवशी शिवाजी महाराज “सिंहासनाधीश्वर” झाले. रायगडावर आनंदी-आनंद झाला होता,आज एक “मराठा राजा” सिंहासनाधीष्टीत नृपती झाला होता. सभासदाच्या तोंडून पडलेले ते उद्गार या सर्वाची साक्ष देउन जातात, सभासद म्हणतो “ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा येवढा मर्हाटा पातशाहा “छत्रपति” जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही” यांचे वरील वर्णन महाराजांच्या दैदिप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची यथोचित माहिती देते….
      या दिवशी राज्याभिषेक सोहळ्याला “हेन्री आक्झिंडेन” नावाचा इंग्रज अधिकारी देखिल उपस्थित होता,त्या दिवशी त्याने शिवाजी महाराजांना विविध २० मागन्या केल्या होत्या, त्यातील एक मागनी होती की “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”, त्या २० मागन्यांपैकी महाराजांनी १९ मागन्या मान्य करुन एक मागनी मात्र अमान्य केली ती म्हणजे “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”,त्याला प्रतीउत्तर म्हणून महाराजांनी त्यांना सांगीतलं कि “इंग्रजी शिक्क्याचे रुपये वा पैसे वा मोरा या मुलुकात चालणार नाहीत !!!”……………..

इ.स.१६७४ पासुन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरु केलं असावं,ज्याला आपणं “शिवराई” म्हणतो तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे “होणं” देखिल सुरु केले,तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत   पाडलेली स्वतःची “नाणी” ही एक दुरगामी व क्रांतीकारी घटना होती. बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते.तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदु धर्माचा रास्त अभिमान होता असे यावरून दिसते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले.त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे लिहीलेले असे.

Sunday, 26 February 2017

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

💐💐दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!

आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
मराठी  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!💐💐💐
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
🚩
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Tuesday, 21 February 2017

किल्ले सिंधुदूर्ग


किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग                                                                                                               श्रेणी - सोपी 

जिल्हा - सिंधुदूर्ग

                            सागरी प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी छ. शिवाजी महाराजांना जलदुर्ग उभारण्याची निकड जाणवू लागली. यासाठी त्यांनी मालवण शेजारील "कुरटे' बेटाची निवड केली. महाराजांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली हजारो मजूरांनी सलग 3 वर्षे मेहनत घेऊन सिंधुदर्गची निर्मिती केली. याकामी सुमारे एक कोटी होन खर्ची पडले.( १ होन = ४ रू.)

                                                  

इतिहास -

                        सिंधुदुर्गच्या उभारणीस 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरवात झाली. सलग 3 वर्षे हे काम चालू होते. सिंधुदुर्ग हा 48 एकर परसलेला आहे आणि तटबंदी 2 मैल (3 कि.मी.) आहे. सिंधुदुर्गच्या तटाच्या भिंतीची उंची सुमारे 30 फूट (9.1 मी) तर रुंदी 12 फूट (3.7 मी) आहे. सागरी लाटांपासून तसेच परकीय आक्रमणापासून संरक्षणासाठी या प्रचंड भिंती उभारलेल्या आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या तसेच छ. संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

                          होडीतून किल्ल्यामध्ये पायउतार झाल्यावर महाद्वारातून आत प्रवेश करावा. किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर दगडी पायऱ्यांनी नगारखान्यात प्रवेश करता येतो. नगारखान्याच्या डाव्या बाजूला दोन घुमट्या आढळतात. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना त्याच्यी पाहणी करण्यासाठी महाराज आले होते. त्यावेळी चुन्याच्या ओल्या गिलव्यावरून महाराज चालत गेले. महाराजांच्या डाव्या पायाच्या व उजव्या हाताचा ठसा तेथे उमटला. आज त्या जागेवर घुमट्या बांधून त्याचे जतन केले आहे. इथून पुढे गडाच्या तटफेरीला सुरवात करावी, भल्यामोठ्या बुरूजांचे व नागमोडी तटबंदीचे निरीक्षण करीत चालत रहावे. किल्ल्यावर एकूण 42 बुरूज आहेत. तटामध्ये पहारेऱ्यांसाठी असणारे शौचकप आहेत. एका बुरूजाच्या बाजूने बाहेर समुद्राकडे जाण्यासाठी दरवाज आहे. तथील पळण आपले लक्ष वेधून घेते, याला "राणीच्या वेळा' असे म्हणतात. राणी जलक्रीडा करण्यासाठी याचा वापर करीत. तटफेरी पूर्ण करून शिवराजेश्‍वर मंदिराकडे चालू लागायचं. शिवराजेश्‍वर मंदिर हे राजाराम महाराजांनी बांधलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली शिवछत्रपतींची मूर्ती आहे. दररोज भल्या पहाटे मुर्तीला अभिषेक घातला जातो. त्यानंतर चांदीचा मुखवटा, जिरेटोप आणि वस्त्रे चढविली जातात. समोर एक तलवार ठेवण्यात येते. महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदीर आहे. पुढे महादेवाचे मंदीर आहे. पुढे भवानी मातेचे मंदीर लागते. गडावर दहीबाव, साखरबाव, दुधबाव अशा नावांच्या विहीरी आढळतात. वाड्याचे पडके अवशेष पाहत निशाणकाठी बुरूजावर यावे, तेथून गडाची तटबंदी तसेच गडाचा विस्तृत प्रदेश नजरेस पडतो.

संपूर्ण गड पाहण्यास 2-3 तास लागतात.

Saturday, 18 February 2017

सर्वांना शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा

✌नव्हते संविंधान , नव्हते आरक्षण , नव्हता कायदा , नव्हते संरक्षण नव्हते आमदार नव्हते खासदार .
तरी  आत्ता पेक्षा दहा पटीने  सुखी होती माझी प्रजा कारण राज्य करत होता
  🚩 *शिवाजी  राजा*🚩
         🙏🏻 सर्वांना शिवजयंतीच्या  भरभरून शुभेच्छा

शिवजयंती च्या भगव्या शुभेच्छा*

*माझ्या तमाम शिवभक्तांना ⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳ 🐅छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या भगव्या शुभेच्छा*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏�🙏�🙏�🙏

Sunday, 12 February 2017

शिवरायाचा मृत्यु कि खून ?

संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :- 

१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत. 

२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.

३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ? 

शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

 हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज ) 
  
 तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला. 

दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. 

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली. 
  
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही. 


शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--

१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य. 
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह. 
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण. 
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ? 
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते 

               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. 

सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.  कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :-- 

पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते. 


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा " 

                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता. 




आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----

१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले." 

चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते. 

जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो. 
  
बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला. 


याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत

राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. 

कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !




तात्पर्य :-

                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल.म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.

Sunday, 5 February 2017

एकच देव

एकच देव
माझा...
ईतिहासाचा बाप
श्री छत्रपति शिवाजी राजा....
एकच दैवत माझे ...
कर्तृत्वान महाराज शहाजी राजे....
एकच माझी माता....
संस्काराचा सागर आउसाहेब
जिजाऊ राजमाता....
एकच आदर्श माझा.....
पराक्रमाच आभाळ शंभु माझा....
एकच माझे निशान....
गनिम थरथर कापे पाहुन त्या
भगव्याचा अभिमान.....
एकच माझे राज्य.....
लाखो मावळ्यांच्या बलीदानान उभ
राहिलेल स्वराज्य.....
एकच देश माझा.....
त्या हिंदुस्थानावर तख्तावर बसेल
फक्त
शिवबा माझा....
जय जिजाउ….!!
जय शिवराय….!!
जय शभुंराजे….!!