शिवनेरीच्या पायऱ्या रडतील
तुमच्या आठवणीने,
जिथे जन्म दिला वाघाला एका वाघीनीने
कासावीस होईल रायगड तुमच्या भेटी साठी,
दाखवीला शिवबांना जिथे तुच स्वप्न मोठी
पाचाडचाही जिव होईल थोडाथोडा तुमच्या मायेपोटी..
सह्याद्रीही हिरमुसेल जो होता तुमच्या अखंड पाठी
भगवा तुमच्या सन्मानासाठी थोडा वाकेल
तुमच्यापुढे मुजऱ्याला अखंड महाराष्ट्र झुकेल...
तमाम महाराष्ट्राला
राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ
यांच्या
जयंती निमित्त
हार्दिक शिवशुभेच्छा💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment