! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Wednesday, 25 January 2017

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

🇮🇳🇮🇳उत्सव तीन रंगाचा ,अभाड़ी आज सजला ,🇮🇳🇮🇳
      नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ,
🇮🇳   उद्या होणाऱ्या      🇮🇳      प्रजासत्ताकदिनाच्या  आत्तापासूनच  सर्वांना 💐हार्दिक शुभेच्छा 💐

Monday, 16 January 2017

*१६ जानेवारी १६८१*

*१६ जानेवारी १६८१*

हा दिवस म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा एक दिवस...
कारण याच दिवशी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे पुत्र तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचे नातू थोरल्या महाराणी सईबाईसाहेब भोसले यांचे चिरंजीव शिवपुत्र संभाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक दिन....

दिवस उगवला सोन्याचा सजला सह्याद्रीचा माथा इतिहास गौरवे शंभुराजांच्या राज्याभिषेकाची गौरवगाथा..🚩🚩

मराठ्यांचा धाकलं धनी स्वराज्याचं दुसरं छञपती संभाजी महाराजांचा दिन राजधानी रायगड किल्ले येथे सोहळाला पारंपारीक रांगोळ्या, ढोल ताश्यानच्या गजरात भगवे झेंडेच्या नगरात पार पडला...

*छत्रपति संभाजी महाराज राज्याभिषेक दीन चिरायु होवो.....*
_____/\_____

*जय शंभूराजे....🚩🚩*

*छत्रपति शंभुराज्याभिषेक सोहळा....*
*राजधानी रायगड....*

Sunday, 15 January 2017

||धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा |

||धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा ||छत्रपती शिवरायांच्या अकाली निधनानंतर आलेले जुलमी परकीय सत्तांचे वादळ स्वतःच्या निधड्या छातीवर पेलुन रयतेला न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी देणारे स्वराज्य वृद्धिंगत करणाऱ्या राष्ट्रनिष्ठ बुधभुषणकार महानसंस्कृतपंडित अजिंक्ययोद्धा शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या इतिहासाचा पुनर्जागर करण्यासाठी त्यांचा दिमाखदार नेत्रदिपक असा🚩 ३३७वा राज्याभिषेक सोहळा 🚩 🙏🚩धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🚩🙏

🚩जय भवानी 🚩जय शिवाजी🚩जय जिजाऊ🚩जय महाराष्ट्र🚩

छत्रपती संभाजी महाराज राज्यअभिषेक दिनाच्या झकास शुभेच्छा ||

|| छत्रपती संभाजी महाराज राज्यअभिषेक दिनाच्या झकास शुभेच्छा ||
<3 त्रिवार मुजरा धाकले धनी <3

Friday, 13 January 2017

"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
        या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
        उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
          चोहिकडे शिंपावे,...!!
         सुखाचे मंगल क्षण
          आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

Thursday, 12 January 2017

राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ

शिवनेरीच्या पायऱ्या रडतील
तुमच्या आठवणीने,
जिथे जन्म दिला वाघाला एका वाघीनीने
कासावीस होईल रायगड तुमच्या भेटी साठी,
दाखवीला शिवबांना जिथे तुच स्वप्न मोठी
पाचाडचाही जिव होईल थोडाथोडा तुमच्या मायेपोटी..
सह्याद्रीही हिरमुसेल जो होता तुमच्या अखंड पाठी
भगवा तुमच्या सन्मानासाठी थोडा वाकेल
तुमच्यापुढे मुजऱ्याला अखंड महाराष्ट्र झुकेल...
तमाम महाराष्ट्राला
राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ
यांच्या
जयंती निमित्त
हार्दिक शिवशुभेच्छा💐💐💐💐💐💐

Sunday, 8 January 2017

भगवा देव तो माझा,

भगवा देव तो माझा,
मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे
स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा
माझा.....
जय शिवराय
ओढ़ 19 फेब्रुवारीची
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Saturday, 7 January 2017

शिवभक्तचा नाद ...!!!

"फुकटचा माज"अन्"शिवभक्त "नाद"
कधीच नाय करायचा...!!!!!
"मैदान कोणत ही असो"हवा"तर #भगव्याचिच_____!! होणार"!!🚩🚩🚩🚩जय शिवराय||🚩🚩🚩🚩🚩🚩

Thursday, 5 January 2017

मेणा दरवाजा किल्ले रायगड

 : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

टकमक टोक रायगड

 : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.

जगदीश्वर मंदिर किल्ले रायगड

 : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

Wednesday, 4 January 2017

महाराजांची समाधी

 : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

Tuesday, 3 January 2017

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणिनारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.

गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई,पुणेकोल्हापूरनाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ(M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.

गणपतीपुळे

गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे मंदिराचे प्रवेशद्वार

गणपतीपुळे मंदिराची प्रदक्षिणा

गणपतीपुळे हे मुबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे आहे. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे.

गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवीकेशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे. गणपतीपुळेलगतच भंडारपुळे हे गाव आहे. जितका गणपतीपुळे इथला आहे तितकाच भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे.. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.