! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 29 December 2015

! " मंगेश पाडगावकर " !

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी मंगेश पाडगावकर यांना बीजे कडून आखेरचा भगवा मुजरा....!!!!

Sunday, 27 December 2015

! " ऐतिहासिक विहिर " !

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,

या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.

ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.

अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.

या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.

इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!


Friday, 25 December 2015

! " शुभ सकाळ " !


पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र
जरूर बघतो…
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त
नाती
पण आहेत ती मनापासून
जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी
स्वत:पेक्षा जास्त प्रेम
करतो..
।। शुभ सकाळ ।।

Wednesday, 23 December 2015

! " बाजीराव पेशवे " !

 थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

बाळाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले[ संदर्भ हवा ]. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
: बाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली[ संदर्भ हवा ]. 

[
: बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले
[08:59, 24/12/2015] बीजे: बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
         बाजीरावाने पेशवे
बाजीराव पेशवे यांची समाधी स्थळ

! " : मस्तानीची समाधी आणि अमर प्रेमवेली " !

बीजे


पुणे जिल्हा हा ऐतिहासिक घडामोडीचे एक प्रमुख केंद्र आहे.. छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महात्मा गांधीच्या वास्तव्यापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार असलेला जिल्हा म्हणून इतिहासांच्या पानात नोंद आहे.. असंच एक इतिहासातलं पान नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘पाबळ’ या गावी जाऊन उलगडता आलं...


पाबळ गावी मस्तानीची समाधी पाहण्याचा योग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात आला. त्या समाधीला पाहून ज्या भावना मनात उमटल्या त्या तुम्हालाही कळाव्यात आणि मस्तानीच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून टाकलेला हा प्रकाश..
पुणे जिल्हा हा ऐतिहासिक घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे.. छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते महात्मा गांधीच्या वास्तव्यापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार असलेला जिल्हा म्हणून इतिहासाच्या पानात नोंद आहे.. असंच एक इतिहासातलं पान नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘पाबळ’ या गावी जाऊन उलगडता आलं.. काय आहे या पानात..?
इतिहासाच्या दृष्टीने हे पान काहीसं दुर्लक्षित होतं आणि आहे.. ते आजही प्रकर्षांने जाणवते.. हे इतिहासातील पात्र काही वाहिन्यांनी कथानक म्हणून निवडलं त्याला चांगला टीआरपीही घेतला.. पण प्रत्यक्षात या पात्राची उपेक्षा मृत्यूनंतरही जवळजवळ तीन शतकांनंतरही कायम आहे. का झाली उपेक्षा.. काय गुन्हा केला होता.. तो तीन शतकांनंतरही पुसला जात नाही.. तो गुन्हा होता एका जिगरबाज योद्धय़ावर भरभरून प्रेम केल्याचा.. आता तुम्हाला उकल झाली असेल मी कोण्या ऐतिहासिक पात्रासंदर्भात बोलतोय ते.. हो.. तेच.. बाजीरावावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मस्तानीवर..!
मला इतिहासात काय झाले हे पुन्हा तुम्हाला सांगायची गरज नाही.. ते ठिकाण बघून मन पिळवटून गेलं.. घालमेल झाली ते व्यक्त करण्यासाठी या माझ्या भावना आ�
[22:42, 23/12/2015] बीजे: आहेत. माझं मन त्या इतिहासातील घटनांचा अंदाज बांधत थेट शनिवारवाडय़ात गेलं. मस्तानी दरवाज्याच्या कोपऱ्यात येऊन थांबलं.. आरासपानी सौंदर्याची मालकीण या वाडय़ाच्या कोपऱ्यात आपला गुदमरलेला श्वास घेऊन का राहिली असेल..
काय करावें तें आतां ! झालें न येसें बोलता !!
नाहीं दोघांचिये हाती ! गांठी घालावी एकांती !!
या अभंगाच्या ओळी तिच्या मन:स्थितीचे भान टिपण्यासाठी अतिशय चपखल बसतात.

माझं मन त्या इतिहासातील घटनांचा अंदाज बांधत थेट शनिवारवाडय़ात गेलं. मस्तानी दरवाज्याच्या कोपऱ्यात येऊन थांबलं.. आरासपानी सौंदर्याची मालकीण या वाडय़ाच्या कोपऱ्यात आपला गुदमरलेला श्वास घेऊन का राहिली असेल.

तो एकांतवास मिळवण्यासाठी दोघांनाही किती यत्न करावे लागले असतील.. निरपेक्ष प्रेमाला समाजाच्या विखारी नजरांसमोर जावे लागले असेल.. त्यातूनच बाजीरावांनी मस्तानीला पाबळ या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. पाबळ हे गाव भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ भागात मोडते.. पुण्यापासून जवळपास ५० ते ६० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पाण्याची वानवा असलेला (आज ती परिस्थिती नाही) भाग असल्यामुळे त्याकाळी फार मोठी लोकवस्ती त्या ठिकाणी असण्याची शक्यता फारच कमी वाटते. त्यामुळेच इथे दोघांना एकांतवास मिळेल म्हणून हे ठिकाण निवडले असावे.. पाबळ गावच्या वेशीपासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा भव्य वाडा बांधल्याच्या आज फक्त खुणा दिसतायत. आता तो भग्न अवस्थेतील वाडा आपल्या शेवटच्या घटका मोजताना दिसतो आहे.
हिर-रांझा.. लला- मजनू.. यांचा प्रेम इतिहास गौरवाने सांगितला जातो.. थोडय़ाफार प्रमाणात साम्य असलेल्या या प्रेमाला मात्र इतिहासातही ‘एक ठेवलेली बाई’ अशा अतिशय हिनकसपणे रंगवलं जातं. खरं तर एक क्रांतिकारी प्रेमकहानी म्हणून हे इतिहासातील सोनेरी पान म्हणून आपण जपून ठेवावे असेच आहे. जोधा-अकबरच्या प्रेमाला
[22:44, 23/12/2015] बीजे:  प्रेमाला इतिहासाने जसे स्वीकारले तसे बाजीराव-मस्तानीला इतिहास आणि आजचं समाजमनही स्वीकारत नाही.. हे त्या जीर्ण झालेल्या ऐतिहासिक स्थानाकडे बघून वाटतं...

मस्तानीच्या स्मृतीला एक रोमांचक इतिहास म्हणून महत्त्व मिळेल अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. म्हणतात ना जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो.

मस्तानीने गिळलेला हिरा आणि चोर
मस्तानीच्या समाधीस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला समाधीतील काही चिरे पुन्हा नव्याने सांधलेले दिसतील.. मी त्याबाबत काही जणांना छेडले असता जी माहिती मिळाली ती (खरी की खोटी हे काळच जाणे ) खरंच फार चमत्कारी आहे. मस्तानीची समाधी आतापर्यंत एकूण तीन वेळा चोरांनी खोदण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील दोन वेळा समाधीपासून अंदाजे चार ते पाच फूट अंतरावर खोल खड्डा करून समाधीच्या आतपर्यंत बोगदा पाडला होता. तर एक वेळा समाधीवरील दगड काढून खाली खोदण्याचा प्रयत्न केला होता. पण तत्कालीन बांधकामशास्त्र कमिशनवर चालत नसल्यामुळे अतिशय मजबूत होते. त्यामुळे दोन थरांच्या पुढे चोरांना जात आले नाही.. ते तसेच टाकून चोर पळून गेले.. हा खटाटोप कशासाठी केला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ऐका.. मस्तानीने मृत्यूपूर्वी एक मौल्यवान हिरा गिळला होता म्हणे..तो मिळावा म्हणून हा चोरांचा उपद्व्याप होता. हे कळले.. मला फार आश्चर्य वाटले; तुम्हालाही वाटले ना आश्चर्य !
[22:44, 23/12/2015] बीजे: एकेकाळी केवळ एकांतवास मिळावा म्हणून निवडलेलं स्थळ आज मात्र एकांताचीच भीती वाटावी असं झालं आहे. आम्ही मस्तानीची समाधी पाहण्यापूर्वी त्या गावातील इतर स्थळं पाहिली त्यात भव्य भरवनाथ मंदिर आणि जैन मंदिर पाहिले. दोन्ही मंदिरं गावाच्या वैभवात भर पाडणारे आहेत. मात्र ज्या मस्तानीच्या समाधीचे स्थान म्हणून मागच्या तीन शतकापासून जगभरातील इतिहासांच्या अभ्यासकांना खुणवणाऱ्या या गावात ही समाधी मात्र भग्न अवस्थेत पाहून काय दुर्दैवी होती ही सौंदर्याची सम्राज्ञी.. असंच वाटून जातं. िहदूंनी ‘ठेवलेली बाई’ म्हणून झटकले तर मुस्लीम समाजाला ती आपली वाटली नाही. मस्तानीच्या मृत्यूनंतर त्यावर जो चबुतरा बांधला आहे त्याची रचना समाधीसारखी आहे.. पण आज ती कबर म्हणून ओळखली जाते. दहा बाय पाच लांबी-रुंदी असलेल्या या समाधीवर एक फुलाची वेली आहे. ती वेली कधीही सुकत नाही असे जाणकार सांगतात. माझे प्रेम हे अमर होते आणि आहे अशीच कबुली या अमर वेलीच्या रूपात मस्तानी देत तर नसावी ना! असं त्या न सुकणाऱ्या वेलीकडे बघून क्षणभरासाठी वाटले. दिल्लीपर्यंत आपल्या मनगटाच्या बळावर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या या योद्धय़ाच्या मनावर राज्य करणाऱ्या मस्तानीला समाजाने मात्र स्वीकारले नाही हे मात्र भूतकाळ, वर्तमानाने सिद्ध केलं आहे.
पश्चिम राष्ट्रांनी स्वत:च्या इतिहासाचे संवर्धन करून इतरांचाही इतिहास आपल्या संशोधनासाठी जवळ
[22:45, 23/12/2015] बीजे: बाळगला. इतिहासाचे महत्त्व त्या लोकांना कळते. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची तलवार, कोहिनूर आणि तुलनेने अलीकडच्या गांधीजींच्या वस्तू संग्रही ठेवल्या. त्या मिळवण्यासाठी आपण आज प्रयत्न करतो आहोत. या सर्व गोष्टींचा बोध घेऊन आपणही भविष्यात कदाचित हे शिकू.. त्यानंतर मस्तानीच्या स्मृतीला एक रोमांचक इतिहास म्हणून महत्त्व मिळेल अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही. म्हणतात ना जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. ते आपल्या बाबतीतही व्हावे ही आशा (कदाचित वेडी) बाळगून मस्तानीच्या समाधीला आणि तिच्या अपार प्रेमाला सलाम करून मी थांबतो. आपणही अवश्य जा आणि वेलीला हात लावून सांगा.. इतिहासाने तुला बदनाम केले. आम्ही मात्र निदान तुझ्या प्रेमाचा तरी गौरव करू..!!

Tuesday, 22 December 2015

! " श्री सप्तश्रृंगी गड " !

श्री सप्तश्रृंगी गड

श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’’ मानले जाते.देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे.या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘’सप्तश्रृंग’’ हया शब्दाचा अर्थ ‘’सातशिखरे’’ असा आहे.गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत.गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे.हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते.या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.

Monday, 21 December 2015

! " कैलास मठ / भक्तीधाम " !



हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असुन यास ‘’भक्तीधाम ‘’असे देखील म्हणले जाते.या ठिकाणी विविध देवतांची मंदीरे आहेत. "कैलास मठ" हा जुना आश्रम असुन या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सदयस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.


BJ

" ! रामकुंड " !

रामकुंड

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.


Bj













! " श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर " !

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर

श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे.त्रयंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्रयंबकेश्वर मंदिर हे ट्रस्टकडुन केले जाते. ट्रस्टकडुन भक्तांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.



Bj

! " गोंदेश्वर - हेमाडपंथी मंदीर " !

गोंदेश्वर - हेमाडपंथी मंदीर

हे मंदीर नाशिक पासुन 40 कि.मि. अंतरावर सिन्नर जवळ स्थित आहे. येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासुन 32 कि.मि.अंतरावर आहे. भगवान महादेवाचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा नमुना असलेले हे मंदीर असुन सदयस्थितीत हया शैलीतील चांगल्या स्थितीत असलेल्या काही मंदीरांपैकी एक आहे.



Bj

! " मांगी तुगी मंदीर " !

 नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते. मांगी मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे. तुंगी तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत  




Bj

! " काळाराम मंदिर नाशिक " !

काळाराम मंदीर नशिक शहरात पंचवटी भागात स्थित आहे. हे मंदीर मध्यवर्ती बस स्थानका पासुन 3 कि.मि.अंतरावर आहे. मंदिरात जाणेसाठी नाशिक शहरातुन विविध ठिकाणाहुन शहर बस सेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.।




बीजे

Saturday, 19 December 2015

!! रतनगड !!



‘रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. ४३०० फुट उंच असलेला हा गड समुद्रसपाटीपासून ३५२३ फुट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या रतनवाडीहून जाता येते. रतनवाडीला संगमनेरहुन-अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.

   हा किल्ला कोळी सरदार जावजी यांनी १७६३ साली ताब्यात घेतल्याची सरकार दप्तरी नोंद असून हा किल्ला म्हणजे एक महत्वाचे ठाणे मानले जाई. १८२० साली कॅप्टन गॉर्डनने किल्ला ताब्यात घेतल्या नंतर १८२४ साली आदिवासी सेनानी रामोजी भांगरेंनी पुन्हा ताब्यात घेतला.

हा गड अतिशय प्रेक्षणीय असून पूर्ण गड चढण्यासाठी अनेक ठिकाणी साहस आणि धैर्य अंगी असणे महत्वाचे आहे.

किल्ल्यावर गणेश दरवाजा, रत्नादेवीची गुहा, मुक्कामाची गुहा, देवीदेवतांची शिल्पे कोरलेला प्रमुख दरवाजा, गडावरील जुन्या इमारतींचे अवशेष ज्याला इमारतींचे जोतेही म्हणतात, कडेलोट स्थळ, राणीचा हुडा म्हणून ओळखला जाणारा भग्न बुरुज, प्रवरा नदीचे उगमस्थान, मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज, अंधारकोठी आणि त्यातील पिण्यास योग्य असलेले मधुर पाण्याचे तळे, खडकाला आरपार भगदाड असलेले गडावरील अत्युच्च ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले जाते आणि कल्याण दरवाजा हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

गडावर राहण्याच्या सोयीसाठी दोन गुहा असून ३०-३५ लोक मुक्काम करू शकतात आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे. खाण्याची व्यवस्था मात्र गडावर नाही. गडावर जाण्यासाठी रतनवाडी, कुमशेतच्या शिवकालीन मार्गाने किंवा साम्रदहून जाता येते.

मुंबई किंवा नाशिकहून इगतपुरी-घोटीmargeमार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनगडला पोहोचता येते. रतनवाडीहून गड तीन तासांच्या अंतरावर आहे.

Friday, 18 December 2015

छत्रपती शाहू महाराजांची समाधी ( माहुली ), कास तलाव

छत्रपती शाहू महाराजांची समाधी ( माहुली ), कास तलाव
सातारा
शहराजवळील माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांचा संगम असून येथे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे. सातार्‍यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील कास तलाव हे ठिकाणदेखील अलीकडच्या काळात नैसर्गिक सुंदरता व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.





SHIVBHAKAT BJ....!!!!