! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Monday, 9 February 2015

!!! " शिवजन्मोऊत्सव महणजे आपली शिवजयंती " !!!

राजं...
आहे तूमची जगभर ख्याती
थाटामाटात होते शिवजयंती

तो तूमचा मावळा...
सांगतोय सार्या जगाला
आतूर झालाय तूमच्या स्वागताला,

राजं
सजली अवघी धरती
पाहण्या तूमची किर्ती
तूम्ही येणार म्हटल्यानं
नसानसात फुललंय चैतन्य

राजं
आता मनात एकच ध्यास
फक्त 19 फेब्रुवारीचीच आस

राजं
आम्ही तूमचे मावळे
सदैव करू तूमचेच सोहळे
तूम्हा आठविता मिळते स्फूर्ती
येत आहे आमची शिवजयंती

राजं
रागोंळी सजली दारी
तोरण लागले घरी
मिठाई वाटली नगरी
येत आहे 19 फेब्रुवारी

राजं
तूमचे स्वराज्याचे धोरण
बांधू घरावरती तोरण
गाजली गनिमीकाव्याची निती
येत आहे आमची शिवजयंती...

राजं
गुलामीत पडलेल्या रयतेला
तूमच्या शिवाय कोण तारी
म्हणूनचं
छाती ठोकून सांगतो
33 कोटीला भारी
19 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी....

No comments:

Post a Comment