॥ अर्थतज्ञ्ज्ञ शिवराय ॥
स्वराज्याची आर्थिक घडी बसविताना महाराजांना लष्करी आघाडीवर मोगल, आदिलशाही, सिध्दी यांच्याशी लढावे लागले तर व्यापारविषयक आघाडीवर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज,डच अशा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांच्यामागे त्यांचे अख्खे देश पूर्ण ताकदीनिशी उभे होते अशा बलाढयांशी स्पर्धा करून व्यापार- उद्दीम वाढवावा लागला आणि एकवेळ अशी आणली की जगाकडून जकात घेणारया पोर्तुगीजांना सुध्दा महाराजांना जकात दयावी लागली आणि इंग्रजांच्या तर महाराजांनी मुसक्याच आवळल्या होत्या हे इंग्रजांचे वकील सारखे महाराजांशी बोलणी करायला यायचे यावरून कळते.आर्थिक आघाडीवर दुर्लक्ष करून २२ वर्षे शहाजहान ताजमहल बांधत बसला आणि कर्जबाजारी झाला.महाराजांनी याबाबतीत अत्यंत जागरुक राहून व्यक्तिगत खर्च खुप कमी ठेवून प्रचंड बचत करून तेच पैसे स्वराजच्या भांडवल निर्मितीसाठी गुंतवणूक केले.आयुष्यात केवळ उत्पादक गोष्टीवर गुंतवणूककरीत किल्लेबांधले पण खर्चाची अनावश्यक बाब म्हणून राजमहल बांधणे टाळले.आर्थिक शहाणपण नव्हते म्हणूनच औरंगजेब कायम लढाया करण्यात गुतंलेला होता. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत बादशहा मराठ्यांचा सामना करता करता बाद झाला आणि सर्वात छोटे असलेले स्वराज्य वाढत गेले.महाराज आशियातील सर्वात श्रीमंत राजे झाले. ते याच आर्थिक शाहणपणातून,त्यामुळेच आज ३५० वर्षानंतरही रयत महाराजांना विसरु शकली नाही,ती त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळेच. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराज अमर झालेत ते केवळ लढाया जिंकल्या म्हणून नाही तर आर्थिक आघाडीवर महाराजांनी प्रचंड यश मिळवले. १०,००० कोटींच्या सिंहासनावर बसणारे आणि २१ कोटी ६० लाखांच्या तलवारी बाळगणारे तरीही साधेपणाने राहणारे शिवाजी महाराज खरच महान होते.त्यांचा श्रीमंतांना गरीब करणारा समाजवाद नव्हे तर गरिबाला श्रीमंत करणारा समतावाद होता
No comments:
Post a Comment