धुक्याची चादर घेऊन
पहाट यावी .
कोकिळेच्या भूपाळीने
जाग यावी .
ऊगवत्या नारायणाची
लाली न्याहाळावी .
गोठ्यातील कपिलेची
धार चाखावी.
तुक्याची एक तरी
ओवी गुणगुणावी .
प्रसन्न ,संपन्न आयुष्याची
प्रार्थना करावी .
एक सकाळ ....
अशीही अनुभवावी
!!सुप्रभात!!
No comments:
Post a Comment