: ।।सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजे।।
श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनो लेखा,वर्तते कस्य नोपरि ||
छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे.तिचे अंकसेवन करणाऱ्यांचा(आधार घेणाऱ्यांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.
छत्रपती संभाजीराजे,ज्यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते.आठ भाषांचा जाणकार असणारा हा महाराजा, ज्यांनी 'बुधभूषणम्' हा संस्कृत तर 'नायिकाभेद', 'नखशिख', 'सातसतक' हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ लिहिले.हा थोर राजा जसा लेखणीतही श्रेष्ठ होता तसा तो रणांगणात श्रेष्ठ होता.बुध्दिमत्ता आणि शौर्य श्रीशंभूराजामध्ये भरले होते.आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला,स्वराज्यातील एकही किल्ला गमावला नाही.मराठ्यांचे आरमार शक्तीशाली केले.कर्नाटकातील मराठी राज्य वाढविले,पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले,औरंगजेबच्या सैन्याची दाणादाण उडविली,असा हा छावा. छत्रपती संभाजीराजे एकाच वेळी मोघल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दीशी लढत होते.
श्री शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी,शंभूराजांनी लिहिलेला खालील श्लोक पुरेसा आहे.(बुधभूषण,अध्याय दोन,श्लोक ४२२).यात त्यांनी राजाचे सात दोष वर्णिलेले आहेत.
व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||४२२||
हे सात दोष पुढीलप्रमाणे आहेत,वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत.शंभूराजेंनी राजांना या सात दोषापासून दूर राहावयास सांगितले आहे.
श्रीशंभूराजांनी बुधभूषण या आपल्या संस्कृत ग्रंथात पानापानावर असे विचार मांडलेत.त्याकाळी राजाकडे जनानखाना असणे प्रतिष्ठेचे असताना शंभूराजांनी त्याचा निषेध केला तसेच बहूपत्नीव नाकारले.महाराणी येसूबाईंना स्वतंत्र राज-
[10:17, 21/09/2014] Fakt BJ: स्वतंत्र राज-मुद्रा देऊन राज्यकारभारामध्ये सामील करून घेतले.अशा थोर सेनानीचे कर्तुत्व झाकण्याचा प्रयत्न पेशवेकालीन बखरकारांनी केला.संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करणारी मल्हार रामराव चिटणीसाची बखर,संभाजी राजांच्या मृत्युनंतर १२२ वर्षांनी,सन १८११ साली लिहिली गेली.मल्हार रामराव चिटणीसाचे खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांस संभाजीराजेंनी स्वराज्यद्रोहाच्या आरोपामुळे हत्तीच्या पायी दिले होते,त्यामुळे मनात अढी ठेवून मल्हार रामराव याने बखर लिहिली.आजच्या युगातील काही तथाकथित विद्वान लेखक,नाटककार,इतिहासकारसुध्दा संभाजी राजांच्या कर्तुत्वाचे विकृतीकरण करण्यात आघाडीवर आहेत.संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी आपण सविस्तरपणे पुढे चर्चा करणार आहोत.
छत्रपती संभाजीराजेंचा जन्म इ.स.१४ मे,१६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या 'मातोश्री सईबाईंचे'निधन,संभाजीराजांच्या लहान वयात झाले. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या जवळ असलेल्या कापूरहोळ गावातील 'धाराऊ'राजेंच्या दुधाई बनल्या.लहानपणापासूनच बुध्दिमान असलेल्या संभाजीराजेंनी युध्दाचे डावपेच,राजकारण लवकर आत्मसात केले.
No comments:
Post a Comment