हे धरण इतर धरणांपैकी विशेष बांधण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यात एकूण पाच धरणांपैकी असलेले हे चिल्हेवाडी धरण होय. दोन डोंररांगा आडवून यास एका खास पद्धतीने बांधण्यात आले असून या धरणातून एक पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेतकर्यांस थेट शेतात मीटरद्वारे या पाईपलाईने पाणीपुरवठा करण्याची एक आफलातुन योजना केली गेली आहे. फोफसंडीत आपले उगमस्थान असलेली मांडवी नदी वेडीवाकडी वळणे घेत तीने सह्याद्रीला जणू एका दोरातच बांधले आहे की काय असा भास होतो.
अलौकिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळणच येथे निसर्ग देवतेने अवतरत होऊन केली असावी असे नयनरम्य दृश्य आपणास पहावयास मिळते.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 21 September 2017
🎡 चिल्हेवाडी धरण 🎡
Friday, 8 September 2017
किल्ले तोरणा
अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्या पर्यंतचे अंतर ६० किमी आहे.
हा गाडा वरून राजगड वर जाण्यचा मार्ग आहे
इतिहास संपादन करा
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.
प्लस व्हॅली
.
पुण्यापासून कोकणात उतरणाऱ्या ताम्हिणी घाटात, ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव ‘प्लस व्हॅली’ दिले गेले.