! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 23 October 2015
Thursday, 22 October 2015
!! " विजयादशमीच्या शुभेच्छ " !!
💥✨🍃🍂🌿🍃✨💥
आपट्याची पाने, ✨
झेंडुची फुले, ✨
घेऊन आली अश्विनातली
विजयादशमी, ✨
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..! ✨
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ✨💥💥💥
पुन्हा एक नवी पहाट, 🌿
पुन्हा एक नवी आशा, 🍂
तुमच्या कर्तुत्वाला, 🍃
पुन्हा एक नवी दिशा..🍁
नवे स्वप्न ,
नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा
🌿🍁🍃🍂✨💥
🌼दारी झेंडूची फुले,
🍀हाती आपट्याची पाने,
🌷या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
💐🌼🍀🌷🌺🌹💐
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐🌹🌺🌷🍀🌼💐
Saturday, 10 October 2015
! " इतिहास राजगढाचा " !
इतिहास[संपादन]
राजगड किल्ला साधारण २००० वर्षापूर्वीचा आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. सन १६४५ मध्ये शिवरायांनी किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व राजगड असे नामकरण केले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
मावळभागात राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.
तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते.
एवढी सुरक्षितता होती म्हणुन राजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
मावळभागात राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.
तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते.
एवढी सुरक्षितता होती म्हणुन राजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
Thursday, 8 October 2015
! " बालेकिला राजगढ " !
बालेकिल्ला[संपादन]
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.
गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
Wednesday, 7 October 2015
! " पदमावती तलाव "!
पद्मावती तलाव[संपादन]
गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंदिरःपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
! " सुवेळा माची " !
सुवेळा माची[संपादन]
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.

! " राजगढाला भेटा " !
किल्ले राजगड: हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड! हिंदवी स्वराज्याची राजधानीगडांचा राजा, राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.
Subscribe to:
Posts (Atom)