! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Thursday, 25 December 2014

॥ जेऊर ते तिरूमला एक प्रवास ॥

प्रथम आम्ही जेऊर येथूण चेन्नई एक्सप्रेस या रेल्वेने तिरूपतीसांठी निगालो ...!!!

आंध्रप्रदेश आणि कन॔टक राजांच्या सिमाभागांवर असणारी तूःगभद्रा नदीचे रेल्वे मधून काढलेले कांही अप्रतिम फोटोग्राफी...!!!




आणखी काही आंध्रप्रदेश मधल्या सह्याद्री चे रेल्वेमधून काढलेले फोटो...!!!


तिरूमला येथे मूंडण केल्यानंतर कांही सहकार्यासोबत एकदम झक्कास फेलफी ...!!!



श्री बालाजी मंदिरासमोर काढलेले छायाचित्रे...!!!


तिरूमला येथे पाक॔ मध्ये खूप आनंद घेताना मी आणि माझा मिञ. वाघमोडे ...!!!


बालाजी पादूका दश॔न ठिकाणी सव॔ मिञ ...!!!




पहिल्या छायाचित्रात दिसणारा भला मोठा दगड , दुसर्या छायाचिञात. दिसणारा अच॔ जगात दोन नंबरचा अप्रतिम अच॔ आहे , आणि तिसर्या छायाचिञात मंञमूगध होऊन नाचणारा मोर हे सगळे पाहून तिरूपतो गेल्याचा आनंद काही ओरच वाटत होता 





आकाशगंगा आणि पाताळगंगा हेही ठिकाणे तिरूमदावरिल खूप पहाण्यासारखे आहेत...!!!

अशा प्रकारे 5 दिवस खूप फिरून आणि भगवान श्रीबालाजीची दश॔न घेवून आम्ही मंञमूगध झालो 
धन्यवाद .....!!!!!

बीजे एक वादळ

॥ जेऊर ते तिरूमला एक प्रवास ॥

प्रथम आम्ही जेऊर येथूण चेन्नई एक्सप्रेस या रेल्वेने तिरूपतीसांठी निगालो ...!!!

Wednesday, 10 December 2014

॥ शेकरू (महाराष्ट्राचा राज्य प्राणी)



शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारूताई. हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात आढळतो. याचे वास्तव्य आपल्याकडे (अकोले तालुका ) कोथळा परिसरातील देवराया, तोलार्खिंड, कुमशेत, जानेवाडी, येथे शेकरूचे घरटे आढळतात. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून उपयोग करते.

उंच झाडावर शेकरू घ्रर बांधते. झाडाच्या काटक्या मऊ पान यांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घर बांधतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो शेकरू एकावेळेस 1 ते  2 पिलांना जन्म देते.

शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो . सुर्योदय झाल्या शेकरू घराबाहेर पडते ठरलेल्या झाडावर अन्न खाते सकाळी ११ ते ३ आराम करते. पुन्हा सूर्यास्त पर्यंत खाद्य खून अंधारापुर्वी घरट्यात परततो.

असा हा सर्वात सुंदर पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ... चला तर मग करा  शेअर अन सगळ्यांना कळू दया...

Sunday, 23 November 2014

" शालीनी महाल "


कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालीनी राजे यांच्या प्रीत्यर्थ, इ. सन. १९३१-३४ दरम्यान आठ लक्ष रूपये खर्च करून शालीनी महाल बांधला. २.५ मैल व्यासाच्या रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवर, तळयाच्या पश्चिम काठावर सुंदर बागा, उंचच उंच ताडाची झाडे व हिरवाईने हा महाल सुशोभित झाला आहे. महालाच्या बांधकामात काळया दगडामधे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे. इटालियन संगमरवराचा नक्षीकामामरिता केलेला उपयोग वाखाणण्यासारखा आहे. महालाचे दरवाजे लाकडाचें असून, त्यात भारी बेल्जियमची काच वापरून, त्या काचेच्या दरवाज्यावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे. या सा-यामुळे महालाचे राज-वैभव डोळयात भरते. महालातील भव्य कमानी व सज्जा हया चकाकणा-या काळया उंची प्रतीच्या दगडात बनविल्या आहेत. त्यामुळे महालाची एकंदर ऐट व भव्यता पाहाणा-याचे भान हरपून घेते. काचेचे नक्षीकाम व मनो-यावरचे घडयाळ आपले पारंपरिक वैभव दिमाखाने मिरवत आहेत. पौर्णिमेच्या रात्री महालाचे प्रतिबिंब रंकाळयाच्या संथ व शांत पाण्यात, संध्यामठाच्या बाजूने पाहणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.

! "" बीजे एक वादळ "" !


" माथेरान "

माथेरान

मुंबई आणि पुणे इथून सर्वात जवळचे आणि तरीही निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे ठिकाण आहे. २,६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेले आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी पडलेली माथेरानची ही डोंगररांग हाजीमलंगपासून सुरू होते. १८५० मध्ये ह्युज मॅलेट या ठाण्याच्या कलेक्टरने हे ठिकाण शोधून काढले.
मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. या गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे, हे माथेरान भेटीतील एक प्रमुख आकर्षण असते. ही ट्रेन पेब आणि माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून पॅनोरमा पॉईंटला वळसा घालून माथेरानमध्ये प्रवेश करते. इथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. जिथून पुढे वाहनांना प्रवेश नाही त्या दस्तुरी नाक्यावरून २०-२५ मिनीटे चालल्यानंतर मध्यभागी असलेल्या मार्केटमध्ये येतो. बहुतेक हॉटेल्सही याच भागात आहेत.
माथेरानमधील विविध पॉईंटस् - 
शार्लोट लेक - मार्केटपासून १ कि.मी. अंतरावर हे तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे
पॅनोरमा पॉईंट -
उत्तर टोकावरील या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.
सन सेट पॉईंट -
ह्या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. मार्केटपासून अंतर साधारण साडेतीन कि.मी. आहे. सन सेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.
चौक पॉईंट -
हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो. इथे जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईंट.
गार्बट पॉईंट -
येथील सर्वात दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुस-या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. इथे येण्यात खरी मजा पावसाळयात आहे. धुक्यांनी वेढलेल्या जंगलातून पावसाळयात भटकण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी पावसाळाही इथे भेट देण्यासाठीचा उत्तम मोसम आहे. पावसाच्या मा-यामुळे कुठल्याही पॉईंटला जाणे शक्य होत नाही. पण धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळयातही जरूर यावे. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये ब-याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. सांबराच्या कातडयाच्या वहाणा व बूट, तसेच वेताची काठी, छोटया छोटया चपलांचे सेट अशा ब-याच वस्तू इथे स्थानिक विक्रेते विकताना दिसतात. इथे माकडांचे प्रमाण जास्त आहे. आपण खात असताना हातातील खाद्यपदार्थांचा पुडा पळवून नेऊ शकतात, इतकी ती माणसाळलेली आहेत.
माथेरानमध्ये राहण्याच्या ब-याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. इतरही बरीच लहान-मोठी हॉटेल्स आहेत. नेरळ-माथेरान गाडीच्याही मोजक्याच चकरा असल्याने त्या वेळेवर पाळाव्या लागतात. जे स्वतःची गाडी घेऊन येतात, त्यांना गाडया दस्तुरी पॉईंटजवळ लावाव्या लागतात. याशिवाय नेरळ-माथेरान टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे.

! "" बीजे एक वादळ "" !

' आंबोली "


ब्रिटीश अधिकारी कर्नल वेस्ट्रूप याने आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसीत केले आहे. सावंतवाडीहून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण दोन दिवस निसर्गसान्निध्यात घालवण्याच्या दृष्टीने हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान इथे जवळजवळ ७५० सेमी. एवढा पाऊस पडतो. यादरम्यान हा पूर्ण परिसर धुक्याने वेढलेला असतो.
सावंतवाडी ते आंबोली घाटात सावंतवाडी संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. इथे देवीच्या मंदिराजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व साधूचा आश्रम आहे. हिरण्यकेशी मंदिरामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. आंबोलीची उंची ६६४ मीटर्स आहे. या परिसरामध्ये सदाहरित, समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णी अरण्य आणि घनदाट जंगले पसरलेली आहेत. आंबोलीपासून १० किलोमीटरवर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे. इथे एम.टी.डी.सी.चे रेस्टहाऊस आहे. त्याच्या मागच्या उद्यानात सांबर, चितळ, भेकर, साळिंदर असे प्राणी ठेवलेले आहेत. याच्या पश्चिमेला महादेवगड, तर उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत.
इथले आरक्षण मुंबईच्या एम.टी.डी.सी.च्या ऑफिसमध्ये होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगाव इथून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे. 

! "" बीजे एक वादळ "" !


" महाबळेश्वर "

महाबळेश्वर

मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.
चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.
महाबळेश्वरची उंची ४,७१८ फूट आहे, त्यामुळे इथून सह्याद्रीतील द-या, कडे-कपारींचे होणारे दर्शन हे निश्चितच वेगळे आहे.ब्रिटीशांच्या नावांनी ओळखले जाणारे इथले विविध पॉईंटस् पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. यापैकी काही पॉईंटस् बाजारपेठेच्या जवळ तर काही १०-१३ किलोमीटरच्या परिघात आहेत. यामध्ये सर्वात प्रसिध्द आर्थर सीट पॉईंट आहे, जिथून महाबळेश्वरच्या सगळया द-याखो-यांचे दर्शन होते. याच पॉईंटपासून खाली असलेल्या विंडो पॉईंटपासून ढवळया घाटाने ट्रेकर्सना कोकणात उतरता येते. महाबळेश्वरपासून पुण्याला जाण्याच्या रस्त्यावर केटस् पॉईंट आहे. इथून कृष्णा नदीवर बांधलेल्या धोम धरणाचा परिसर, डावीकडे घंटेच्या आकाराचा कमळगड आणि समोर दिसणारे पाचगणीचे टेबलटॉप यांचे दर्शन होते. महाबळेश्वरचे पश्चिम म्हणजे लॉडविग पॉईंट. ज्याने १८२४ मध्ये मुंबईच्या उष्ण वातावरणापासून काही दिवस दूर जाता यावे म्हणून महाबळेश्वरचा आणि या पॉईंटचा शोध लावला, त्या जनरल लॉडविगच्या नावावरून या पॉईंटला लॉडविग पॉईंट असे नाव देण्यात आले. इथून पश्चिमेचा प्रतापगड आणि त्या खालचे जावळीच्या खो-याचे निसर्गदृश्य दिसते.
येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.
पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते.

! "" बीजे एक वादळ "" !


" महाराष्ट्र नकाशा "

 





! "" बीजे एक वादळ "" !

" सिंधुदूर्गाची सफर - देवगड किनारा "



समुद्रच्या काठावर वसलेला देवगड किल्ला.
हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्रच्या काठाला देवगड किल्लयाचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्रकिना-याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठया बोटी थेट किना-यापर्यंत येऊन लागत. देवगड किल्ला आनंदवाडी बंदराच्या मागील डोंगरावर वसला आहे. तटबंदी अजूनही ब-यापैकी शाबूत असून आत दीपगृह आहे. किल्ल्यामध्ये वाहन जाऊ शकेल अशी सोय आहे. सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात हा भाग आहे.
दोन टेकडयांमधील देवगडच्या किना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात.
देवगड किना-यावरील पवनचक्क्या. सध्या बहुतेक सगळया बंद अवस्थेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या पवनचक्क्या उभारल्या आहेत.
 
देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.
देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे.
मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर.
वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
विजयदुर्ग किल्ला. जेटीवरून
विजयदुर्ग देवगडपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावरचे देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडचे शेवटचे टोक. मुंबई-गोवा महामार्गावर नरळे येथे उतरून थेट विजयदुर्गला जाता येते. हे अंतर ५५ किलोमीटर आहे. विजयदुर्गच्या रस्त्यावर आजूबाजूला सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. खाडीच्या पलिकडे रत्नागिरी जिल्हा सुरू होतो.
सन ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. सन १२१८ मध्ये देवगिरीच्या यादवांनी तो ताब्यात घेतला. सन १३५४ मध्ये विजयनगरच्या राजानी यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. त्यानंतर १२५ वर्षे हा किल्ला विजापूरकरांच्याकडे होता. सन १६५३ मध्ये शिवराजानी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
किल्ल्यामधील पक्की बांधलेली विहिर.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटर असून बाजूने ४० किलोमीटर लांबीची विजयदुर्ग खाडी आहे. हे एक उत्कृष्ट बंदर आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर आहे. ५ तटबंधामुळे किल्ला मजबूत व अभेद्य झाला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात मारूतीचे मंदिर असून आत शंकराच्या व भवानी मातेच्या मंदिराचे अवशेष सापडतात. किल्ल्याला एकूण २० बुरूज असून आत हत्ती, घोडयांच्या पागा आहेत. पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबतखाना, साहेबाचे ओटे, दोन भुयारी मार्ग इत्यादि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठयांचा अंमल होता. सुमारे ७०० वर्षांहून अधिक स्वबळावर प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभे असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगिज, डच या परकियांनी गिब्राल्टर म्हणून उल्लेख केलेला हा किल्ला मराठेशाहीच्या अपूर्व शौर्याचा वारसा आहे.
दक्षिणेकडील रेड्डी गावापासून सुरू झालेली सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-याची सफर विजयदुर्ग किल्ल्यावर येऊन संपते. अत्यंत रमणीय पण दुर्लक्षित असा हा भाग सहलीसाठी अत्यंत सुरक्षित, कमी खर्चाचा आणि साहसाचा अनुभव देणारा असा आहे. इथला माणूस थोडासा चौकस आहे. पण शहरात दुर्मिळ झालेली माणूसकी तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन केले तर कोणतीही अडचण न येता सहलीचा आनंद उपभोगता येईल.
विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज.
टिप - महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तंबू निवास, पर्यटन निवास उभारलेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही राहण्या-जेवण्याची अडचण भासणार नाही.

! "" बीजे एक वादळ "" !


" सिंधुदूर्गाची सफर - आचरा किनारा "

मालवणहून आच-याला निघाल्यानंतर आडारी नदीचा पूल ओलांडल्यावर सर्जेकोट लागतो. मालवणपासून हे ठिकाण ८-९ किलोमीटर अंतरावर आहे. मासेमारीच्या असंख्य बोटी इथे नांगरलेल्या दिसतात. समुद्राच्या काठाला नारळी पोफळीच्या बागा आणि त्यामध्ये विखुरलेली घरे हे नेहमीचे कोकणचे दृष्य इथेही पाहायला मिळते.
कालावल खाडीच्या किनारी झाडीत वसलेले गाव.
गड नदीवर कालावल येथे मोठा खाडी पूल आहे. दोन्ही बाजूला पाण्याच्या काठाने नारळी पोफळीची झाडे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि अधून मधून दिसणारी घरे... पुलावर हे पाहायला तुम्ही थांबला की पुढच्या प्रवासाला जाण्याची इच्छाच होत नाही. कालावल नंतर नारळी पोफळीची झाडे कमी कमी होत जातात, आणि आंब्याच्या बागा सुरू होतात. लाल कातळामध्ये खड्डे काढून हापूस आंब्याची झाडे लावून त्यांना कावडीने लांबून पाणी आणून हा आंबा कोकणी माणसाने परदेशी पाठवला आहे. हे प्रचंड श्रम मागे असल्यानेच हापूस आंबा इतका गोड लागतो.

आचरा बंदर किनारा.
आचरा बंदर या नावातच फक्त आता बंदर उरले आहे. एके काळी हेही एक चांगल्यापैकी बंदर होते. सध्या मात्र त्याचे अस्तित्वच हरवले आहे. आच-याचे ग्रामदैवत रामेश्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. दर तीन किंवा पाच वर्षांनी या देवाची यात्रा होते. त्यावेळी सतत तीन रात्री सर्व सजीव प्राणी आणि ग्रामवासीय गावाच्या सीमेबाहेर राहतात. मालवणपासून आचरा साधारण १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे. येथून मालवण कणकवली आणि देवगडलाही जाता येते. समुद्राच्या काठाला खाजगी रित्या राहण्याची व जेवणाची सोय होते. ट्रेकिंग करणारे अनेक लोक इथे राहतात आणि समुद्र काठाने चालत जाऊन येतात.
सिंधुदूर्गाची सफर - कुणकेश्वर किनारा
कुणकेश्वर मंदिर. देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या काठावर हे शंकराचे मंदिर बांधलेले आहे. याचा कालावधी इसवी सन 11 वे शतक समजला जातो. महाशिवरात्रीला येथे प्रचंड यात्रा भरते.
कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. मोठया प्रमाणावर मासेमारी चालते. संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी न चुकता थांबावे. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण अशा दोन्ही महत्त्वामुळे कुणकेश्वर चांगलेच प्रगत झाले आहे. इथे घरोघरी राहण्याची आणि जेवणाची सोय करतात. तुमच्याजवळ जर गाडी असेल तर ती पुढे देवगडला पाठवावी आणि किना-याने चालत देवगडला जावे. साधारण दीड ते दोन तासात रमत गमत देवगडला पोहोचता. चालण्याचे श्रमही जाणवणार नाहीत असा हा प्रवास आहे. देवगड कुणकेश्वर रस्त्याने १७-१८ किलोमीटर आहे. ३-४ किलोमीटरवर मिठबाव हे आणखी एक रमणीय ठिकाण आहे.
कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. सध्याचा नवीन पूल बांधल्याने हे अंतर निम्म्याहून कमी झालेले आहे. मिठबावला पांढ-याशुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला त्या ताज्या माश्यावर ताव मारावा. बस्स! संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा. पाण्यात मनसोक्त डुंबावे. किना-यावर लहान मुलांच्या बरोबर खूप खेळावे. यापरता दुसरा आनंद कोणता? आंब्याच्या मोसमात रस्त्याच्या दुतर्फा फळांनी लगडलेली आंब्याची झाडे मन मोहून घेतात. आंबे उतरण्याचे काम सुरू असते. मोठमोठया राशी पॅकिंग करून लांब लांब आंबे पाठवण्याचे काम चालू असते. पण तुम्हाला शेतक-याकडून आंबा मिळणार नाही. बिचा-याला स्वत:लाच तो मिळत नाही. कारण बाग अगोदरच विकलेली असते. मात्र जामसांडे, देवगड येथे व्यापा-यांचेकडे आंबा विकत मिळतो.


सूर्यास्त. कुणकेश्वर किना-यावरून.

" श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग "


सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.
या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.

त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :
१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.
त्र्यंबकेश्वरला कसे जाल?
हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग  - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.

! "" बीजे एक वादळ "" !

" काळाराम मंदीर "

काळाराम मंदीर

नाशिकमधील पंचवटीतील हे एक मुख्य मंदीर. या मंदिराला चारही दिशांनी दरवाजे आहेत. सभोवती १७ फूट उंचीचा दगडी कोट आहे. मंदिरात पाय-या चढून गेल्यावर राम, लक्ष्मण, सीता यांच्या काळया पाषाणाच्या सुमारे २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या सभोवती सर्व बाजूंनी ओव-या आहेत. मधील पटांगण २४५ फूट लांब व १०५ फूट रूंद आहे. मंदिरापुढे मोठा सभामंडप आहे. त्यात १२ फूट उंचीचे ४० खांब आहेत. त्यात पश्चिमाभिमुखी मारूतीची काळया पाषाणाची मूर्ती आहे. इ. स. १७७८ साली सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदीर बांधण्यास सुरुवात केली असे कागदपत्रावरून कळते. काळयारामाचे हे वैभवशाली मंदीर ओढेकर जहागिरदारांनी बांधले आहे. १७८२ साली त्याच्यावर कळस चढला. येथे चैत्र शु. १ पासून चैत्र शु. ९ रामनवमीपर्यंत उत्सव साजरा होतो. चैत्र शु. ११ ला एका रथातून रामाची स्वारी व दुस-या रथातून मारूतीची स्वारी निघते. हा रथाचा सोहळा पहाण्यासारखा असतो.
रथ यात्रा - लक्ष्मण आणि सीता समवेत श्रीराम असलेले - 'काळाराम मंदीर' पंचवटीच्या परिसरामधे, चैत्र प्रतिपदेपासून तो चैत्र पौर्णिमेपर्यंत असा १५ दिवस श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करतात. दुपारी ठीक १२ वाजता जन्मोत्सव सुरू होतो. हजारो यात्रेकरू या मंगलसमयी हजर राहतात. पंचवटी येथील श्री. काळाराम मंदीर संस्थानामार्फत हा जन्मोत्सव साजरा होतो. नवमीनंतरच्या दुस-या दिवशी देवळाच्या पूर्व दरवाजामधून निघणारी भव्य रथयात्रा हे जन्मोत्सवातील आकर्षण. सा-या नाशिक गावामधून ही यात्रा भ्रमण करते. साधारणपणे दुपारी ४ वाजून ३० मिनीटांनी निघणा-या या मिरवणुकीमधे 'श्रीराम रथ', तसेच 'गरूड रथ' देखील असतात. श्रीमंत पेशवे यांनी इसवी सन १७८५ मधे, श्रीराम रथ करविला. हा रथ बराच वजनदार असून त्या काळी तो श्रीमंतांनी सरदार रास्ते यांच्याकडे सोपविला. यात्रेच्या आधीची रोषणाई, तसेच रथाची डागडुजी यांच्या पोटी दरवर्षी दोनशे रूपयांचा निर्वाह खर्च त्या काळी दिला जात असे. काळाच्या ओघात हा निर्वाह खर्च देखील आज कितीतरी पटींनी वाढला आहे. 'राम रथा'ची व्यवस्था ही पंचवटी येथील रास्ते आखाडयावर सोपविली आहे. या आखाडयातील स्वयंसेवक या रथाची संपूर्ण जबाबदारी घेतात. दुसरा रथ म्हणजे, 'गरूड रथ', हा श्री काळाराम मंदीर संस्थानच्या मालकीचा आहे. उंची व वजनाने देखील हा रथ रामरथापेक्षा जरा लहानखुरा आहे. यात्रेच्या दिवशी श्री. अहिल्या राम व्यायामशाळेमार्फत, 'गरूड रथा'ची सर्व काळजी घेतली जाते. अहिल्या राम व्यायाम शाळेतील विद्यार्थी व स्वयंसेवक आपणहून या दिवशी पुढे येतात व यात्रेमधे नेटाने झटतात. कै. श्री. दिगंबर दिक्षित यांच्याकडे 'गरूड रथा'चे नेतृत्व इ. सन १९४० पर्यंत होते. फक्त एकदाच एका यात्रेकरूला प्राण संकटातून वाचवण्याचा प्रकार वगळल्यास, एरवी कुठलाही अनुचित प्रकार न घडता, श्री. दिगंबर दिक्षितांच्या समर्थ नेतृत्त्वाखाली, शिस्तबध्द रितीने रथ यात्रेचे आयोजन होत असे. या दुर्घटनेत रथाचे चाक त्यांच्या मांडीमधे घुसले, आणि ५ दिवसांनंतर त्यांचा अंत झाला. त्यानंतर रथाचे नेतृत्त्व इ. सन. १९४१ मधे, त्यांच्या मोठया मुलाकडे, श्री. बाबूरावजी दिक्षितांकडे गेले. श्री. बाबूरावजी दिक्षित यांच्या समर्थ नेतृत्त्वामुळे, रथ यात्रेमधे नेटकेपणा आला, शिस्त आली. त्यांच्या निधनानंतर इ. सन. १९९९ मधे श्री. गोविंदराव दिक्षित यांनी रथाचे नेतृत्व आपल्याकडे घेतले. एकूण ५ कडयांनी मिळून ही रथयात्रा सजते. सनई, चौघडा वाहून नेणारी बैलगाडी, दुस-या कडयामधे प्रभु रामचंद्रांची पालखी, मग त्यामागून येणारे पूजाधिकारी, मग गरूड रथ आणि सरते शेवटी श्रीराम रथ या यात्रेमधे असतो. रथाभिमुख उभे राहून, दोन्ही हातांनी वंदन करून, संपूर्ण दिवसभर पूजाधिकारी हा, या रथ यात्रेबरोबर चालत जातो. चैत्र प्रतिपदेपासून रथयात्रेच्या दिवसापर्यंत तो उपवास करतो. निरनिराळया संस्थांमधून आलेले रथ सेवक हे, एका मजबूत दोरखंडाच्या साहाय्याने दोन्हीही रथ ओढतात. या रथांना 'धुरी' म्हणजे, एक मोठा गोलाकार लाकडी दंड जोडलेला असतो. ज्या यात्रेकरूंची देवळातला जन्मोत्सव पाहण्याची संधी हुकली आहे, त्यांना सारा दिमाखदार सोहळा पाहता यावा, हा या रथ यात्रेमागील हेतू आहे. या रथ यात्रेस दरवर्षी हजारोंनी भाविकांची गर्दी उसळते. श्रीरामांच्या प्रतिमेस गंगा स्नान घालतात. 'अवभृत स्नाना'करिता गोदावरीच्या काठावर ही रथ यात्रा २ तासांकरिता थांबते. पावन राम-घाटापाशी हा स्नान-समारंभ पार पडत असताना फटाक्यांची आतषबाजी, आणि रंगीबेरंगी भुईनळया यांनी सारे वातावरण दुमदुमून जाते. या यात्रेची सांगता, जिथून सुरू झाली तिथेच म्हणजे, 'काळाराम मंदिरा'पाशी खूप उशीरा म्हणजे रात्री २ वाजता होते.

" सिंधुदूर्गाची सफर - मालवणचा किनारा "

धामापूर- तलावाच्या काठाला बांधलेले भगवती देवीचे मंदिर.

धामापूर- तलाव
गोडया पाण्याचा प्रचंड जलाशय. या तलावाच्या किनाऱ्याला शासनाची रोपवाटिका असून हिवाळयात जलाशयाच्या दलदलीच्या भागात अनेक पक्षी स्थलांतर करून येतात. हे पाणी धामापूर काळसे गावास वापरण्यासाठी पुरविले जाते. कुडाळ-मालवण रस्त्यावर कुडाळपासून १३-१४ किलोमीटरवर नेरूरपार खाडीच्या पुढे हा तलाव आहे.

सिंधुदुर्ग किल्ला - होडीतून. शिवराजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक


किल्ल्यावरील शिवाजी राजांचे मंदिर
मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला हे या जिल्ह्याचे वैभव. मालवणपासून एक ते दीड किलोमीटरवर समुदात हा किल्ला वसलेला असून बोटीने किल्ल्यावर जाण्याची सोय आहे. शिवाजी राजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यात असून महाराष्ट्रात इतर कोठेही शिवाजी राजांची मूर्ती देवळात बसवण्यात आलेली नाही. या मंदिराचा मंडप छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे. किल्ल्याच्या चारी बाजूंनी अद्यापही बऱ्यापैकी तटबंदी शिल्लक आहे. किल्ल्यावर गोडया पाण्याच्या विहिरी आहेत. १६६४ मध्ये शिवाजी राजांनी 'कुरटे' बेटावर हा किल्ला उभारला. ४४ एकर क्षेत्रावर हा किल्ला बांधायला ३ वर्षे लागली.

नेरूरपार खाडी, पुलावरून खाडीचे चित्र
कुडाळ-मालवण रस्त्यावर ८-९ किलोमीटरवर कर्ली नदीच्या खाडीवर हा पूल बांधल्याने कुडाळ ते मालवण अंतर निम्म्याने कमी झाले आहे. मालवण हे एके काळी गजबजलेले बंदर होते. आता तेथे मासेमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. मालवणी जेवण तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथे जेवण्याची व राहण्याची चांगली सोय आहे. मालवणी 'खाजे' हा एक वेगळा खाद्यपदार्थ पर्यटक येथून न्यायला विसरत नाहीत.
तालुक्याचे मुख्यालय असलेले हे मालवण माश्याच्या जेवणासाठी महाराष्ट्राबाहेरही प्रसिध्द आहे. आरसे महाल हे शासकीय विश्रामगृह समुद्राच्या काठालाच आहे. मालवण जवळ ओझर येथे ब्रह्मानंद स्वामींचे सुंदर मंदिर आहे. जवळच्या अंगणेवाडीची जत्रा हा साऱ्या कोकणचा कौतुकाचा विषय असतो. मुंबई मालवण अंतर ५२० किलोमीटर असून मुंबई-गोवा महा मार्गावरील कसाल गावापासून मालवण ३२ किलोमीटर आहे.

सर्जेकोट. झाडीत लपलेले गाव. जेटीवरून घेतलेले चित्र.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी त्याच्या भोवती पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, भरतगड, भगवंतगड असे छोटे छोटे गड वसवले होते.
सर्जेकोट बंदरामध्ये थांबलेल्या मासेमारीच्या होडया. होडीतून खाडीपलिकडे पसरलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर जाता येते. पलिकडे दिसतो तो तोंडवळीचा किनारा.


! "" बीजे एक वादळ "" !