! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 21 September 2014

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ जिवा महाले " !

जिवा महाला

 "होता जिवा म्हणून वाचला शिवा"    प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजाँनी अफझलखानाचा कोथळा बाहेरकाढला. त्या वेळी सय्यद बंडा या अफझलखानाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजीमहाराजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; परंतु छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील शूर सरदार जिवा महाला यांनी मध्ये पडुन तो वारपरतवून लावत सय्यद बंडाचा हातच छाटला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणवाचवले. जिवा महालाच्या या शौयाने इतिहासात अजरामर ठरलेला "होता जिवाम्हणून वाचला शिवा" हा वाकृप्रचार रूढ झाला.

1 ) जिवा महाले यांची रोहिडा किल्लेयांवरिल समाधी

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे शिवा काशिद " !

शिवा काशिद

        शिवा काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर व आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिददी जोह‍रच्या वेढयातुन सुटुन आले व विशाळगडावरति पोहचले .शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हा शिवाजी नाही असे कळताच जोहर म्हणतो कसा 'शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो'.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला 'शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील आता मी सुखाने मरण्यास तयार आहे'.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे'. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले.अशा प्रकारे शिवा काशिदला वीर मरण आले.अशा या वीर मावळ्याचा पराक्रम अजुनही जनतेस माहीत नाही.इतिहास:(म‍राठयाचा)इतिहास हि त्याच्या पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु लागली.शिवा काशिद या मर्द मावळ्याची समाधि अजून हि पन्हाळगडाच्या पायथ्याशी विशाळगडाकडे जाणार्‍या वाटेतिल गावापाशी दुरावस्थेत आहे. शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ह...ीशिवाजी महराजांसारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजांचे कपडे घातले तरनवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या.एक महाराजांची आणी दुसरी शिवा काशिद. एक विशाळगडाकडे व दुसरी सिद्धीजोहरकडे.हे तर आपण जाणलच असेल की सिद्धी जोहरकडे गेलेला शिवाकाशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एकसामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचाराजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळेसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाहीपुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाईनिघाली एक फ़ोज मोठी विजापुरीमहराज होते त्यावेळी कोल्हापुरीवेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीनेउन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चारवेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पारकरुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारेफ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारेरात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेवगडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेवपाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाईगाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बातजणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघातअंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महारांजा सारखीकरुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखीशिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरणपण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरणप्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितोमरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो?"समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंतस्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंतगजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहासपण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास


1) शिवा काशिद यांचे स्मारक
2 ) शिवाकाशिद समाधी स्थळ

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ बाजी पासलकर " !

सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...

बाजी पासलकर

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.        बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळ॓ मूरारबाजी प्रभू " !

 मुरारबाजी देशपांडे

   १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
    सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तय�
[



यार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे विर तानाजी मालूसरे " !

तानाजी मालुसरे

  छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते.
मृत्यू:     फेब्रुवारी ४ , १६७०,
सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ:   हिंदवी स्वराज्य
धर्म:      हिंदू
अपत्ये:   रायबा

बालपण
    सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे.
कामगिरी
     छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
कोंढाणा किल्ला
          स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न �
[
लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."
  गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला".अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आह
तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.

किल्ले सिंहगढ येथील तानाजी मालूसरे यांची समाधी

! " शिवरायांचे पराक्रमी मावळे " ! ( बाजीप्रभू देशपांडे )

स्वामीनिष्ठ शूरवीर मावळे- बाजीप्रभू देशपांडे
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमेच्या दिवशी  आपल्या पराक्रमाने... रक्ताने घोड़खिंडला पावनखिंडीत बदलणारे...आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंशी झुंजणारे स्वामिनिष्ठ  शिवरायांचे शूरवीर मावळे बाजीप्रभू देशपांडे...

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बाजीप्रभू हे शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे दिवाण होते, परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला शिवा काशीद चे खरे रूप आणि राजे आपल्या हातून निसटल्याचे कळले तसेच त्यांनी त्यांचा सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले.
शिवरायांचे ६००मावळे पालखी घेऊन वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत विजेच्या वेगाने विशाळगडाकडे  पळत सुटले होते. बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने हातात नंग्या त�
[21:27, 21/09/2014] Fakt BJ: नंग्या तलवारी घेउन धावत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते. महाराज पांढरपाणीला येउन पोचले त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते.

धोका वाढत जातोय आणि  कुठल्याही क्षणी शत्रूंची धाड पडेल असे वाटत असतानाच  मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले, राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण स्वामीभक्त बाजींनी आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. जोपर्यंत तुम्ही छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले आणि बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.ए


क-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजीप्रभूंनी तलवारीच्या टप्यात येणाऱ्या प्रत्येकजणाला यमसदनी पाठवले. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली. बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत असतांना शत्रूने त्यांच्यावर डाव साधला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजीप्रभूंनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले आणि म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला."  फुलाजीप्रभुंची तलवार दुसऱ्या हाती घेऊन बाजीप्रभू अधिक त्वेषाने लढले. रक्ताचे अर्ह्य ओसंडत असतांनाही त्यांनी शत्रूंची वाट सोडली नाही. शत्रूंच्या पायदळ सैनिकामधून एकाने ठासणीच्या बंदूकीतून बाजीप्रभूंवर गोळी झाडली. ती गोळी बाजीप्रभूंच्या खांद्यात घुसली आणि त्यांचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी."

सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता.

विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने बाजीप्रभूंनी प्राण सोडले.  या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
.
बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही मोठा पराक्रम गाजविनाऱ्या बाजीप्रभू-फुलाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांना कोटी कोटी प्रणाम....!!!


! " तिसरे सरसेनापती हंबीरराव मोहिते " !


हंबीरराव मोहिते

सेनापतीपदी निवड

आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले.

बहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,'प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.

बहादूरखान,दिलेरखानादींना नजरेत धरले नाही

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लुट मारून आणिली.या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो,'राजियांनी आपले लष्करास हुकूम करून हंबीरराव सरनौबत फौज घेऊन मोंघलाईत शिरले. खानदेश, बागलाण, गुजराथ, अमदाबाद,बुर्‍हाणपूर,वर्‍हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला.मालमत्ता अगणित जमा करून चालिले.तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले.राजियाची फौज तोलदार गाठली.मोंघल ब�
[0   गाठली.मोंघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालिला.दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली.हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही.तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले.मालमत्ता राजियास दिली.
1) हंबीरराव मोहिते छायाचिञ
2 ) हंबीररावाचं स्मारक
3 ) हंबीररावांची तलवार