! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 24 June 2016

(((( किल्ले )))))

किल्ले

शतकानुशतके आपल्या जबरदस्त पाषाणी सामर्थ्याने जमीन आणि समुद्रावर दरारा निर्माण करणारे किल्ले हे मराठी साम्राज्याचे फार मोठे आधारस्तंभ होते. महाराष्ट्राची ही भूमी जवळजवळ ३५० हून अधिक किल्ल्यांनी समृद्ध आहे.
भारताच्या कोणत्याही प्रांताला हे एवढे दुर्गवैभव लाभलेले नाही. याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची तेजाने तळपणारी तलवार अत्यंत दिमाखात अधिराज्य गाजवत होती. एकेकाळचे मराठी सैन्याचे संरक्षक असलेले हे किल्ले आज आपल्या उज्ज्वल इतिहासाची मूक साक्ष देत अभिमानाने उभे आहेत.
पंचमहाभुतांच्या सततच्या माऱ्यामुळे पडझड, फूट झालेले किल्ले. आज जरी त्यांच्या भिंती ढासळू लागल्या असल्या आणि छप्पर उडून गेले असले तरी हे किल्ले, सामर्थ्यशाली मराठी साम्राज्याचा दरारा आणि रुबाब या बद्दल सतत प्रेरणा देतात. हे किल्ले दूरदृष्टी आणि सामर्थ्य यावर नक्कीच भाष्य करतात. सागरी असोत किंवा एखाद्या डोंगरावर वसलेले असोत, महाराष्ट्रातले हे किल्ले कोणत्याही ऋतूमध्ये तुम्हाला साद घालत असतात.

Wednesday, 22 June 2016

(( दिवेआगर (Ratnagiri) ))

00

दिवेआगर (Ratnagiri)

शुभ्र पांढऱ्या पुळणीवर निवांतपणे पडून सागराच्या एकामागून एक रोरावत येणाऱ्या लाटांची मजा अनुभवायची असेल तर दिवेआगरला जाण्यावाचून पर्याय नाही. जवळजवळ ५ किलोमीटर लांब पसरलेला नितांत रमणीय सागरकिनारा, किनाऱ्यावर असलेली माडा-पोफळीची वाडी पर्यटकांची वाट पाहते आहे. कोकणातल्या अनेक सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेल्या दिवेआगरला समृद्ध कोकणी जीवन आणि कोकणी संस्कृतीची झलक अनुभवता येते.
दिवेआगरबद्दल एक दंतकथा प्रसिद्ध आहे. त्यानुसार कोणे एके काळी खोल समुद्रात एक जहाज वादळामध्ये दिशा भरकटले. अर्थातच त्या जहाजावरील खलाशी आणि इतर लोक भयभीत झाले आणि सुटकेसाठी देवाची प्रार्थना करू लागले. नेमका तेंव्हाच त्यांना दूरवर एक दिवा तेवताना दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्यांनी आपले जहाज हाकारले आणि ते सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले. ते ज्या ठिकाणी येऊन पो

(( हर्णै-मुरुड (Ratnagiri) ))

हर्णै-मुरुड (Ratnagiri)

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची एक सुरेख मालिकाच पाहायला मिळते. हर्णै मुरुड ह्या गावचा समुद्रकिनारा सुंदर आहेच परंतु या गावांना ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग आणि गोवा अशा सागरी किल्ल्यांचे अस्तित्व या गावांना आहे पण त्याच बरोबर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले दोन सुपुत्र या गावांनी देशाला दिलेले आहेत. 

हर्णै हे एक अरबी समुद्रावरील प्राचीन बंदर होय. हे एक लहानसे टुमदार खेडे असून इथून सुवर्णदुर्ग या जलदुर्गाला भेट देता येते. तसेच इथून पाज गावातील पूल ओलांडून आंजर्ले या निसर्गरम्य गावाला भेट देता येते. आंजर्ले इथला कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. कनकदुर्ग आणि गोवा हे समुद्री किल्ले इथे किनाऱ्यावर वसलेले आहेत.

(( महाराष्ट्र समुद्रकिनारे ))

समुद्रकिनारे

पाहताच क्षणी प्रेमात पडावा असा अत्यंत रमणीय समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राची ही पश्चिम किनारपट्टी ७०० किमी. इतकी लांब आहे. अरबी समुद्राच्या असंख्य मनोहारी छटांप्रमाणेच इथले समुद्रकिनारे ही असंख्य आहेत. पांढऱ्या पुळणीशी हळूच सलगी करणारे कोकणातले अनेक समुद्रकिनाऱ्यावरचे नितळ पाणी, साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असे श्रीवर्धनचे निळेशार पाणी अशी या समुद्राची अनेक मनमोहक रूपे आहेत. पावसाळ्यात प्रसंगी रौद्र रूप धारण करून विध्वंस करणारे मुंबईचे समुद्रकिनारे एरव्ही मात्र इथल्या जागांच्या किमती वधारण्यासाठी कारणीभूत ठरतात.

संस्कृती महाराष्ट्राची

संस्कृती महाराष्ट्राची
  • संस्कृत भाषेत
  •               संस्कृत भाषेत ज्याचा अर्थ “महान राष्ट्र” असा होतो आणि खरोखरच ह्या नावाला साजेल अशीच संस्कृती असणारा महाराष्ट्र म्हणजे,शूर-वीरांची भूमी.आपल्या मुशीतून त्याने वविधरंगी संस्कृती प्रवाहांना सामावून घेतले आहे.भारतीय स्त्रीवादी चळवळीचा उगम जिथे झाला,ती भूमी आजच्या आधुनिक लोकशाहीचे माहेरघर आणि जगातील सर्वात मोठी चित्रपट नगरी असा लौकिक बाळगून आहे. खरोखरीच,आत्मविश्वास आणि आत्मसंयमाने “महाराष्ट्र” आपले नाव सार्थ करणारे “महान राष्ट्र”आहे.
                  सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्राचा देशाच्या औद्योगिक उत्पादनात २५% वाट आहे.तर दरडोई उत्पनाच्या २३% वाट आहे.
    आधुनिकतेची कास धरलेल्या महाराष्ट्रातील लोकांची मने मात्र अजूनही आपल्या प्राचीन परंपरा, संस्कृती यांचा संपन्न वारसा जपत आपल्या मुळांशी घट्ट जोडलेली आहेत.
                  छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती हि उभ्या महाराष्ट्राची दैवतेही आणि नाजूक, हळवे कोपरेही; पण सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्राचा पिंड मात्र पुरोगामी,सहनशील आणि उत्साही असाच आहे.
                  ८०% हिंदू लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात वारसा स्थळांच्या रूपाने मौल्यवान खजिनाच दडलेला आहे.हि सर्व वारसास्थळे इथे नांदणाऱ्या जैन,बौद्ध,ख्रिश्चन परमपरांच्या मनोहर रंगछटांची जणू साक्षच देतात.मग ती कोकणपट्ट्यात असणारया अष्टविनायकाची यात्रा असो कि औरंगाबाद जवळील ख्रिस्तपूर्व काळातील अजिंठा वेरूळ असो.अथवा माहीमचे मदर मेरी चर्च असो किंवा हाजी अलीची मुंबई येथील मशीद असो. कलेविषयी उच्च अभिरुची आणि ओढ असणाऱ्या जाणकाराला खिळवून ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी इथे आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ल्यांचे असाधारण महत्त्व आहे.महाराष्ट्राच्या कठीण खडकाळ भूप्रदेशात शत्रूला रोखण्यासाठी आवश्यक असणारा भक्कम आधार ह्या किल्ल्यानीच दिला. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणारे आणि स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक-राजकीय स्थान जपणारे हे बरेचसे किल्ले साधारणत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळखंडात बांधले गेले.ह्यापैकी प्रत्येक किल्ला आपल्याला व्यूहरचना, युधाकौशाल्या आणि गुप्त खलबते यांच्या आधारे मिळवलेल्या वैभवशाली विजयगाथा सांगतो.त्यातून राज्यशास्त्र संरक्षणात्मक व्युह्तंत्र आणि व्यवस्थापन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे खूप काही आहे.
                  सर्वसामान्य जनतेच्या पाठींब्याने आणि आपल्या दूरदृष्टीने दख्खनच्या क्षितिजावर नवस्वराज्याची स्थापना करणारा हा भारतातील एक महान राजा कसा घडला, याची कहाणी आपल्याला प्रत्येक किल्ला सांगतो. शिवाजी महाराजांच्या विजयाच्या कथांमाधून विवध किल्ले आणि त्यांवरील लढायांमधून महाराजांनी दाखवलेल्या शौर्याची गाथा पोवाडयानधून ऐकायला मिळते.

महाराष्ट्र पर्यटन


महाराष्ट्रात आपले स्वागत. महाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत. इथले विविधरंगी सांस्कृतिक आविष्कार म्हणजे जणू बहुरंगी आकर्षक गालिचा. इथले उत्सव हजारो लाखो मरगळलेली मने उल्हसित करतात-गतिमान करतात. इथले मैलोन् मैल पसरलेले रुपेरी, शुभ्र वाळूचे मनाला भुरळ पाडणारे किनारे, अथांग सागर महाराष्ट्राचे सौंदर्य खुलवितात. चला, आता एका सर्वंकष सहलीद्वारे तुम्ही महाराष्ट्राच्या अस्सल, जिवंत आणि अलौकिक भूमीचे प्रत्यक्ष दर्शन घ्या. महाराष्ट्रात आपले स्वागत. एक अनाघ्रात, रमणीय, विस्तीर्ण भूमी...महाराष्ट्र!
पश्चिमेला अरबी समुद्र,वायव्येला(उत्तर-पश्चिम) गुजरात आणि दादरा नगर हवेली हा कें

Monday, 23 May 2016

{ शिवराज्याभिषेक }





पानाच्या समस्याविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेतछत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरीलप्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावरशिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारतीओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशीर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.शिवराज्याभिषेक

पानाच्या समस्याविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेतछत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिनेअगोदर सुरु झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११००० ब्राह्मण यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने त्यांना मिष्ठान्नाबरोबर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मण सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एक धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. पुन्हा चार दिवसांनी ते प्रतापगडावरीलप्रतिष्ठापणा केलेल्या भवानीमाता यांच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. (त्यावेळीही). यावेळी गागाभट्टाला७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळुन १७००० होन दक्षिणा दिली.दुसर्‍या दिवशी सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसं आणि लोखंड अशा सात धातूंची वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले. ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरु झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्र भेट देण्यात आले. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेक याचा अर्थ राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावरशिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडी बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर तर बालसंभाजी थोडासा मागे बसलेला होता. अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारतीओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोबर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. भव्य सिंहासन सभासदबखर म्हणते त्या प्रमाणे) ३२ मण सोन्याचे [१४ लाख रुपये मूल्य असलेले] सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्ण्यांनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. राजाला आशीर्वाद दिला. राजेंनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. प्रत्येग गडावर ठरल्याप्रमाणे तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभटांनी पुढे येऊन त्यांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. सोळा प्रकारचे महादान त्यांनी केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन त्यांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पद, नियुक्तीपत्रे, धन,घोडे,हत्ती,रत्न,वस्त्र,शस्त्र प्रदान केले. हे सर्व सकाळी आठ पर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे शिवाजी महाराज गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेनेचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिराचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.