! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Sunday, 14 June 2015

! " वीर बाजीप्रभु देशपांडे स्मारक किल्ले पन्हं ळा " !



              पुणे जिल्ह्यातील भोरतालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदारम्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजातदेशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्या बांदलांचेबाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हेपराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी,स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी नपडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातील२०-२२ तास काम करूनही न थकणार्या बाजींचा पूर्णमावळ पट्टयात मोठा दबदबा होता. त्यांचेप्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहूनछत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलूव्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले.बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठाशिवरायांच्या चरणी वाहिली.महाराजांपेक्षा वयानेमोठ्या असणार्या बाजीप्रभूंच्या मनातमहाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभावहोता आणि वडीलकीच्या नात्यानेकाळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूनेवेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातूनसुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंतपोहोचवण्याची व्यवस्था करणेया भूमिका निभावतांना बाजीप्रभूंनी आपले केवळशौर्यच नव्हे, तर प्राण पणाला लावले.ही घटना स्फुरण चढवणारी,स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही)आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे.बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षितराहण्यासाठी आपला देह अर्पण केला.त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातीलपुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातूनसुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडेनिघाले होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली हेलक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करतहोते. पुढचा धोका लक्षात घेऊनचवडीलकीच्या अधिकारानेबाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्याससांगितले. बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधूगजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत)सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले.सहस्रोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखलेहोते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीतअसतांनाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्याहिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली.पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील(पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते.सिद्धी मसूदचे सैन्य अडवतांना कामी आलेलेमराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी,जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भानबाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूपपोहोचलेयाचा इशारा देणार्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचेकान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हाताततलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारप्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावरकर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.(ही घटना दिनांक २३ जुलै, १६६०या दिवशी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानेआणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्ररक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नावपावनखिंड झाले. बाजी-फुलाजी बंधूंवर विशाळगडावर,महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.बाजीप्रभू आणि फुलाजी यांची समाधी विशाळगडावरआहे. तसेच पन्हाळगडावरबाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजसुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत:मृत्यूला सामोरेजायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजीदेशपांडेंसारख्या सरदारांमुळेस्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतुही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडूनगेलेली पाहतांना महाराजांना काय वाटत असेल हेसांगणे कठीणच.


Saturday, 13 June 2015

! " किल्ले पन्हाळा " !








पन्हाळातीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळानावपन्हाळाउंची४०४० फूटप्रकारगिरीदुर्गचढाईची श्रेणीसोपीठिकाणकोल्हापूर, महाराष्ट्रजवळचे गावकोल्हापूरडोंगररांगकोल्हापूरसध्याची अवस्थाव्यवस्थितस्थापना{{{स्थापना}}}पन्हाळगडपन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आ

!!! " रायगढावरिल शिवराज्यअभिषेक दिनाच्या काही अप्रतिम छबी " !!!











Friday, 12 June 2015

! " भारतातील दहा मोठे व आकष॔क धबधबे " !

1} दुधसागर धबधबा : गोव्यात असलेल्या दूधसागर धबधबा हा भारतातील एक शानदार धबधबा आहे. मांडवी नदीच्या उगमस्थळावर असलेला हा धबधबा सुरु होतो. या धबधब्याची उंची 1017 फूट असून जगातील उंच धबधब्यांमध्ये दूधसागरचा क्रमांक 227 वा आहे. या धबधब्याला सी ऑफ मिल्क म्हणजेच 'दुधाचा समुद्र'ही म्हटलं जातं. हा धबधबा जंगलाने वेढलेला आहे.
 जोग धबधबा : कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात आहे, जो शारवथी नदीपासून तयार होता. या धबधब्याची उंची 830 फूट असून तो भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे.

2] जोग धबधबा : कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात आहे, जो शारवथी नदीपासून तयार होता. या धबधब्याची उंची 830 फूट असून तो भारतातील दुसरा सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे.


.3] नोतहसंगिथिआंग धबधबा : नोहसंगिथिआंग धबधबा हा मेघालय फॉल सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल नावानेही ओळखला जातो. मेघालयच्या इस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या मौजमई गावात असलेल्या या धबधबल्या मौजमई धबधबाही म्हटलं जातं. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यातच धबधब्यातून पाणी पडतं. या धबधब्याची उंची 1013 फूट आहे.


4] ठोसेघर धबधबा: हा धबधबा महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यातील या धबधब्याची उंची 1150 फूट आहे. हा धबधबा पश्चिम घाटातील आकर्षणाचं केंद्र आहे.


5]  अथिराप्पिल्ली धबधबा : केरळमधील अथिराप्पिल्ली धबधबा अतिशय सुंदर आहे. इथे 80 फुटांवरुन पाणी खाली पडतं. हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंदबिंदू


6} तालकोना धबधबा: आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिह्यातील श्रीवेंकटेश्वर नॅशनल पार्कमध्ये हा धबधबा आहे. हा धबधबा तिरुमाला पर्वतरांगांच्या सुरुवातीलाच आहे. याची उंची 270 फूट आहे. तालकोना धबधबा पाणी चंदनाचं लाकूड आणि वनौषधीने वेढलेला आहे.


 7] खंडधार धबधबा: उडीसा राज्यातील सर्वात मोठा धबधबा सुंदरगड जिल्ह्यातील जंगलामध्येच आहे. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचा हा धबधबा 801 फूट उंचीचा आहे.


8]  चित्रकूट धबधबा: छत्तीसगडमध्ये असलेला चित्रकूट धबधबा अतिशय सुंदर आणि मोठा आहे. छत्तीसगडच्या इंद्रावतीमध्ये जगदलपूरजवळ हा धबधबा आहे. या मनमोहक धबधब्याची उंची 29 मीटर आहे. तर याची रुंदी हवामानानुसार बदलते.


9] धौंधर धबधबा: मध्य प्रदेश जबलपूर जिल्ह्यात हा धबधबा आहे. नर्मदा नदीपासून हा धबधबा बनला आहे. हा धबधबादेखील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
   

10] कोर्तल्लम धबधबा: हा धबधबा तमिळनाडूच्या तिरुलेनवेली जिल्ह्यामध्ये कोर्तल्लम शहरात आहे.

!!! " बीजे एक वादळ " !!!









Thursday, 11 June 2015

! " मी शिवभक्त बीजे " !

तसं पाहायला गेलं तर,
जरा निराळा आहे मी!
लिहिण्या घेतली लेखणी,
परतण्या इतका दुबळा नाही मी!
बाबासाहेबांचे विचार जपणारा,
शिवरायांचा मावळा आहे मी!

सह्याद्रीत हर हर महादेवचा,
घुमलेला नाद आहे मी!
फुलेंच्या पोवाड्यातील,
डफावरची थाप आहे मी!
राजे पोहोचता पन्हाळगडा,
त्याच पायाची धूळ आहे मी!

अशाच दोन ओळींचा कवी आहे मी,
शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब आहे मी!
शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर,
विचारांचा पाईक आहे मी!

फक्त आणि फक्त शिवरायांचा भक्त आहे मी!

Wednesday, 10 June 2015

! " दखनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान कोल्हापुर " !

ज्योतिबा - कोल्हापूर - मलकापूर - रत्नागिरी मार्गावर वाघबीळ खिंडीजवळ केर्ले गावी उतरुन उत्तरेला ज्योतिबाचा डोंगर (९५० मी.) आहे. माथ्यावर मंदिरात ज्योतिबाची डमरु, खड्ग, त्रिशूळ, अमृतकलश घेतलेली चतुर्भुज निळसर रंगाची मूर्ती आहे. जवळच त्याचे वाहन घोडा आहे. आधी काळभैरवाचे दर्शन घेऊन मगच ज्योतिबाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. श्रावण शुद्ध षष्ठी व चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची पालखी काढण्यात येऊन ती यमाई देवळापर्यंत जाते. राहण्यासाठी शासकीय विश्रामगृहात सोय होऊ शकते. कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदीर म्हणजे करवीरनगरीला सौदर्यांचा उत्कृष्ट नजराणा आहे. देवी भागवत, स्कंद पुराण मार्कंडेय पुराण, हरीवंश या धर्मग्रंथातून या शक्तिपीठाचा उल्लेख आहे. करवीरनिवासिनी म्हणजे वैभवसंपन्नतेची अधिदेवता होय. समृद्ध व संपूर्ण देवस्थान म्हणून हे प्रसिध्द आहे. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी पध्दतीचं असून प्राचीन शिल्पकलेचा, स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिरात अनेक छोट्या मंदिरांचा समावेश आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिम बाजूस असून त्यावर देवीचा नगारखाना आहे. तर दक्षिण, पूर्व, उत्तर तिन्ही बाजूंना दरवाजे आहेत. उत्तर दरवाजावर मूर्तीकडे जाण्यासाठी मोठी कमान असून तिथे दोन सभा मंडपांचा समावेश आहे. एकास गरुडमंडप म्हणतात. मंदिराला पाच शिखरं असून मुख्य शिखराखाली गाभाऱ्यात चमकदार हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची वजनदार व चमकदार मूर्ती आहे. उत्तरायण व दक्षिणायन, जून व डिसेंबरमध्ये तीन दिवस सूर्यकिरण देवीवर पडतात. किरणोत्सवाच्या वेळी मंगलमय, पवित्र उत्साहाने वातावरण फुलून जाते. हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. मंदिरात दगडी फरसबंदी असून आवाराभोवती दगडी भिंत आहे.



बीजे एक वादळ सव॔ छायाचित्रे



! ' महाराष्ट्र किल्ले दश॔न " !






!  " बीजे एक वादळ " !