कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालीनी राजे यांच्या प्रीत्यर्थ,
इ.
सन. १९३१-३४ दरम्यान आठ लक्ष रूपये खर्च करून शालीनी महाल बांधला. २.५ मैल
व्यासाच्या रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवर, तळयाच्या पश्चिम काठावर सुंदर
बागा, उंचच उंच ताडाची झाडे व हिरवाईने हा महाल सुशोभित झाला आहे.
महालाच्या बांधकामात काळया दगडामधे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे. इटालियन
संगमरवराचा नक्षीकामामरिता केलेला उपयोग वाखाणण्यासारखा आहे. महालाचे
दरवाजे लाकडाचें असून, त्यात भारी बेल्जियमची काच वापरून, त्या काचेच्या
दरवाज्यावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे. या सा-यामुळे महालाचे
राज-वैभव डोळयात भरते. महालातील भव्य कमानी व सज्जा हया चकाकणा-या काळया
उंची प्रतीच्या दगडात बनविल्या आहेत. त्यामुळे महालाची एकंदर ऐट व भव्यता
पाहाणा-याचे भान हरपून घेते. काचेचे नक्षीकाम व मनो-यावरचे घडयाळ आपले
पारंपरिक वैभव दिमाखाने मिरवत आहेत. पौर्णिमेच्या रात्री महालाचे प्रतिबिंब
रंकाळयाच्या संथ व शांत पाण्यात, संध्यामठाच्या बाजूने पाहणे हा एक
मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Sunday, 23 November 2014
" माथेरान "
माथेरान
मुंबईहून कर्जतला जाताना नेरळ स्टेशनला उतरून माथेरान गाठता येते. नेरळ हे गाव माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. माथेरानला जाणारी ट्रेन नेरळहून सुटते आणि २१ कि.मी.चे अंतर दोन तासात पार करते. या गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे, हे माथेरान भेटीतील एक प्रमुख आकर्षण असते. ही ट्रेन पेब आणि माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून पॅनोरमा पॉईंटला वळसा घालून माथेरानमध्ये प्रवेश करते. इथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही त्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. जिथून पुढे वाहनांना प्रवेश नाही त्या दस्तुरी नाक्यावरून २०-२५ मिनीटे चालल्यानंतर मध्यभागी असलेल्या मार्केटमध्ये येतो. बहुतेक हॉटेल्सही याच भागात आहेत.
माथेरानमधील विविध पॉईंटस् -
शार्लोट लेक - मार्केटपासून १ कि.मी. अंतरावर हे तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे
पॅनोरमा पॉईंट -
उत्तर टोकावरील या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.
सन सेट पॉईंट -
ह्या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. मार्केटपासून अंतर साधारण साडेतीन कि.मी. आहे. सन सेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.
चौक पॉईंट -
हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो. इथे जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईंट.
गार्बट पॉईंट -
येथील सर्वात दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुस-या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. इथे येण्यात खरी मजा पावसाळयात आहे. धुक्यांनी वेढलेल्या जंगलातून पावसाळयात भटकण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी पावसाळाही इथे भेट देण्यासाठीचा उत्तम मोसम आहे. पावसाच्या मा-यामुळे कुठल्याही पॉईंटला जाणे शक्य होत नाही. पण धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळयातही जरूर यावे. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये ब-याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. सांबराच्या कातडयाच्या वहाणा व बूट, तसेच वेताची काठी, छोटया छोटया चपलांचे सेट अशा ब-याच वस्तू इथे स्थानिक विक्रेते विकताना दिसतात. इथे माकडांचे प्रमाण जास्त आहे. आपण खात असताना हातातील खाद्यपदार्थांचा पुडा पळवून नेऊ शकतात, इतकी ती माणसाळलेली आहेत.
माथेरानमध्ये राहण्याच्या ब-याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. इतरही बरीच लहान-मोठी हॉटेल्स आहेत. नेरळ-माथेरान गाडीच्याही मोजक्याच चकरा असल्याने त्या वेळेवर पाळाव्या लागतात. जे स्वतःची गाडी घेऊन येतात, त्यांना गाडया दस्तुरी पॉईंटजवळ लावाव्या लागतात. याशिवाय नेरळ-माथेरान टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
' आंबोली "
इथले आरक्षण मुंबईच्या एम.टी.डी.सी.च्या ऑफिसमध्ये होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगाव इथून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
" महाबळेश्वर "
महाबळेश्वर
मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.
येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.
पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते.
! "" बीजे एक वादळ "" !
" सिंधुदूर्गाची सफर - देवगड किनारा "
| समुद्रच्या काठावर वसलेला देवगड किल्ला. |
दोन टेकडयांमधील देवगडच्या किना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात.
| देवगड किना-यावरील पवनचक्क्या. सध्या बहुतेक सगळया बंद अवस्थेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या पवनचक्क्या उभारल्या आहेत. |
देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे.
मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर.
वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
| विजयदुर्ग किल्ला. जेटीवरून |
सन ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. सन १२१८ मध्ये देवगिरीच्या यादवांनी तो ताब्यात घेतला. सन १३५४ मध्ये विजयनगरच्या राजानी यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. त्यानंतर १२५ वर्षे हा किल्ला विजापूरकरांच्याकडे होता. सन १६५३ मध्ये शिवराजानी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
| किल्ल्यामधील पक्की बांधलेली विहिर. |
दक्षिणेकडील रेड्डी गावापासून सुरू झालेली सिंधुदुर्गच्या समुद्रकिना-याची सफर विजयदुर्ग किल्ल्यावर येऊन संपते. अत्यंत रमणीय पण दुर्लक्षित असा हा भाग सहलीसाठी अत्यंत सुरक्षित, कमी खर्चाचा आणि साहसाचा अनुभव देणारा असा आहे. इथला माणूस थोडासा चौकस आहे. पण शहरात दुर्मिळ झालेली माणूसकी तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन केले तर कोणतीही अडचण न येता सहलीचा आनंद उपभोगता येईल.
| विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज. |
! "" बीजे एक वादळ "" !
" सिंधुदूर्गाची सफर - आचरा किनारा "
मालवणहून आच-याला निघाल्यानंतर आडारी नदीचा पूल ओलांडल्यावर सर्जेकोट
लागतो. मालवणपासून हे ठिकाण ८-९ किलोमीटर अंतरावर आहे. मासेमारीच्या असंख्य
बोटी इथे नांगरलेल्या दिसतात. समुद्राच्या काठाला नारळी पोफळीच्या बागा
आणि त्यामध्ये विखुरलेली घरे हे नेहमीचे कोकणचे दृष्य इथेही पाहायला मिळते.
गड नदीवर कालावल येथे मोठा खाडी पूल आहे. दोन्ही बाजूला पाण्याच्या
काठाने नारळी पोफळीची झाडे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि अधून
मधून दिसणारी घरे... पुलावर हे पाहायला तुम्ही थांबला की पुढच्या प्रवासाला
जाण्याची इच्छाच होत नाही. कालावल नंतर नारळी पोफळीची झाडे कमी कमी होत
जातात, आणि आंब्याच्या बागा सुरू होतात. लाल कातळामध्ये खड्डे काढून हापूस
आंब्याची झाडे लावून त्यांना कावडीने लांबून पाणी आणून हा आंबा कोकणी
माणसाने परदेशी पाठवला आहे. हे प्रचंड श्रम मागे असल्यानेच हापूस आंबा इतका
गोड लागतो.
आचरा बंदर या नावातच फक्त आता बंदर उरले आहे. एके काळी हेही एक
चांगल्यापैकी बंदर होते. सध्या मात्र त्याचे अस्तित्वच हरवले आहे. आच-याचे
ग्रामदैवत रामेश्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. दर तीन
किंवा पाच वर्षांनी या देवाची यात्रा होते. त्यावेळी सतत तीन रात्री सर्व
सजीव प्राणी आणि ग्रामवासीय गावाच्या सीमेबाहेर राहतात. मालवणपासून आचरा
साधारण १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे. येथून मालवण कणकवली आणि देवगडलाही जाता
येते. समुद्राच्या काठाला खाजगी रित्या राहण्याची व जेवणाची सोय होते.
ट्रेकिंग करणारे अनेक लोक इथे राहतात आणि समुद्र काठाने चालत जाऊन येतात.
सिंधुदूर्गाची सफर - कुणकेश्वर किनारा
कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. मोठया
प्रमाणावर मासेमारी चालते. संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी न चुकता
थांबावे. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण अशा दोन्ही महत्त्वामुळे कुणकेश्वर
चांगलेच प्रगत झाले आहे. इथे घरोघरी राहण्याची आणि जेवणाची सोय करतात.
तुमच्याजवळ जर गाडी असेल तर ती पुढे देवगडला पाठवावी आणि किना-याने चालत
देवगडला जावे. साधारण दीड ते दोन तासात रमत गमत देवगडला पोहोचता. चालण्याचे
श्रमही जाणवणार नाहीत असा हा प्रवास आहे. देवगड कुणकेश्वर रस्त्याने १७-१८
किलोमीटर आहे. ३-४ किलोमीटरवर मिठबाव हे आणखी एक रमणीय ठिकाण आहे.
कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. सध्याचा नवीन पूल बांधल्याने हे अंतर निम्म्याहून कमी झालेले आहे. मिठबावला पांढ-याशुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला त्या ताज्या माश्यावर ताव मारावा. बस्स! संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा. पाण्यात मनसोक्त डुंबावे. किना-यावर लहान मुलांच्या बरोबर खूप खेळावे. यापरता दुसरा आनंद कोणता? आंब्याच्या मोसमात रस्त्याच्या दुतर्फा फळांनी लगडलेली आंब्याची झाडे मन मोहून घेतात. आंबे उतरण्याचे काम सुरू असते. मोठमोठया राशी पॅकिंग करून लांब लांब आंबे पाठवण्याचे काम चालू असते. पण तुम्हाला शेतक-याकडून आंबा मिळणार नाही. बिचा-याला स्वत:लाच तो मिळत नाही. कारण बाग अगोदरच विकलेली असते. मात्र जामसांडे, देवगड येथे व्यापा-यांचेकडे आंबा विकत मिळतो.
| कालावल खाडीच्या किनारी झाडीत वसलेले गाव. |
आचरा बंदर किनारा. |
सिंधुदूर्गाची सफर - कुणकेश्वर किनारा
| कुणकेश्वर मंदिर. देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या काठावर हे शंकराचे मंदिर बांधलेले आहे. याचा कालावधी इसवी सन 11 वे शतक समजला जातो. महाशिवरात्रीला येथे प्रचंड यात्रा भरते. |
कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. सध्याचा नवीन पूल बांधल्याने हे अंतर निम्म्याहून कमी झालेले आहे. मिठबावला पांढ-याशुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला त्या ताज्या माश्यावर ताव मारावा. बस्स! संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा. पाण्यात मनसोक्त डुंबावे. किना-यावर लहान मुलांच्या बरोबर खूप खेळावे. यापरता दुसरा आनंद कोणता? आंब्याच्या मोसमात रस्त्याच्या दुतर्फा फळांनी लगडलेली आंब्याची झाडे मन मोहून घेतात. आंबे उतरण्याचे काम सुरू असते. मोठमोठया राशी पॅकिंग करून लांब लांब आंबे पाठवण्याचे काम चालू असते. पण तुम्हाला शेतक-याकडून आंबा मिळणार नाही. बिचा-याला स्वत:लाच तो मिळत नाही. कारण बाग अगोदरच विकलेली असते. मात्र जामसांडे, देवगड येथे व्यापा-यांचेकडे आंबा विकत मिळतो.
| सूर्यास्त. कुणकेश्वर किना-यावरून. |
" श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग "
या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले
त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :
१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.
त्र्यंबकेश्वरला कसे जाल?
हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.
! "" बीजे एक वादळ "" !
" काळाराम मंदीर "
काळाराम मंदीर
" सिंधुदूर्गाची सफर - मालवणचा किनारा "
| धामापूर- तलावाच्या काठाला बांधलेले भगवती देवीचे मंदिर. |
| धामापूर- तलाव |
| सिंधुदुर्ग किल्ला - होडीतून. शिवराजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक |
किल्ल्यावरील शिवाजी राजांचे मंदिर |
| नेरूरपार खाडी, पुलावरून खाडीचे चित्र |
तालुक्याचे मुख्यालय असलेले हे मालवण माश्याच्या जेवणासाठी महाराष्ट्राबाहेरही प्रसिध्द आहे. आरसे महाल हे शासकीय विश्रामगृह समुद्राच्या काठालाच आहे. मालवण जवळ ओझर येथे ब्रह्मानंद स्वामींचे सुंदर मंदिर आहे. जवळच्या अंगणेवाडीची जत्रा हा साऱ्या कोकणचा कौतुकाचा विषय असतो. मुंबई मालवण अंतर ५२० किलोमीटर असून मुंबई-गोवा महा मार्गावरील कसाल गावापासून मालवण ३२ किलोमीटर आहे.
| सर्जेकोट. झाडीत लपलेले गाव. जेटीवरून घेतलेले चित्र. |
सर्जेकोट बंदरामध्ये थांबलेल्या मासेमारीच्या होडया. होडीतून खाडीपलिकडे पसरलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर जाता येते. पलिकडे दिसतो तो तोंडवळीचा किनारा.
! "" बीजे एक वादळ "" !
" ताडोबा अभयारण्य "
प्राणीसंपदा
ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. सध्याच्या आकडेवारीनुसार येथे 80 वाघ आहेत. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे 195 विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.
या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घोषित झाल्यानंतरही आज इतक्या वर्षांनंतर जंगलाच्या आतील भागात सुमारे 60 लहान-सहान गावे आणि पाडे वसलेले असून विविध भटक्या विमुक्त जमातींचे लोक या ठिकाणी राहत आहेत. या सर्व गावांतील लोकांची संख्या आजघडीला 41 हजार पेक्षाही जास्त आहे. त्यांच्यासाठी चंद्रपूर जल्ह्यातून अनेक ठिकाणांहून ताडोबामध्ये येण्यासाठी एसटी महामंडळातर्फे बससेवा उपलब्ध आहे. जंगलाच्या कोर आणि बफर झोन मध्ये केवळ पारंपरिक शेती करणा-यांनाच राहण्यास परवानगी आहे. आधुनिक पद्धतींच्या वापराने जंगल धोक्यात यायला नको हाच यामागे उद्देश आहे. येथील स्थानिक लोक मोहाच्या फुलापासून दारु बनवण्याचा धंदा करतात. त्यासाठी मोहाची फुले गोळा करताना तोडण्यात येणारी झाडे आणि उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे दरवर्षी 2 ते 15 टक्के जंगल जळून जाते.
ताडोबा सफरीचा अनुभव खास वाचकांसाठी
ताडोबा अभयारण्यात पहाटे साडेपाच वाजताच प्रवेश मिळते. एप्रिल महिना असल्याने पहाटेसच उजाडले होते. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे एप्रिलमध्ये उकाडा सुरू झालेला असतो. पण तरीही ती सकाळ मात्र प्रसन्न होती. मग भल्या पहाटे उठून आम्ही निघालो जंगल सफारीला. सुरुवातीलाच दिसला बहिरी ससाणा आणि मेन गेटजवळच्या तळ्यातील सुंदर बदके. त्यानंतर मग अनेक विविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, बारहसिंगे, नीलगायी, हत्ती असे अनेक प्राणी दिसत होते. मात्र ज्या साठी आमची नजर आसुसली होती तो जंगलचा राजा वाघोबा काही दिसेना. तशातच जंगलाचे दोन प्रमुख भाग पालथे घालून झाले आमची सकाळची पहिली राईड संपत आली होती, मात्र वाघाचे किंवा बिबट्याचेही दर्शन न झाल्याने आम्ही थोडे हिरमुसलेले होतो.
मग सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही रिसॉर्टवर परतलो. चहा-नाश्ता करुन मग दुपारी थोडा निवांत वेळ होता. कारण त्या मधल्या वेळेत जंगलच्या नियमांनुसार कोणाही पर्यटकाला जंगलात प्रवेश करता येत नाही. दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपयर्यंत अशी आणखी एक जंगल सफारी आम्ही बूक केली. पुन्हा एकदा देवाचे नाव घेतले आणि निघालो वाघाचे दर्शन घ्यायला.
त्या राईडमध्येही सुरुवातीचा एक तास खूप भटकलो. पण वाघाची काही चिन्हे दिसेनात. एकदा आम्हाला हुलकावणी देऊन तो जवळूनच निघून गेला असे कळले. त्यामुळे तर आणखीनच दु:ख झाले. तरीही आमचा विश्वास होता, की आम्हाला दर्शन होणारच. मात्र बाकी बरेचसे प्राणी दिसत होते. अगदी कोल्हा, रानडुक्कर, एका तळ्याकाळी छान पहुडलेल्या मगरी, सुसरी, विविध पक्षी, साप सारे काही. पण वाघ मात्र दिसण्याचे नाव नाही. अखेर सायंकाळी 5 वाजता एका सफारीच्याच जीपवाल्याने कळवले की, जंगलच्या मध्यावर असलेल्या तळ्यात दोन वाघ बसले आहेत. ते कळले मात्र तातडीने आम्ही आमच्या गाड्या तिकडे वळवल्या. कारण तिथे पोहोचायला आणखी 10 मिनिटे, म्हणजे तेवढ्यात ते निघून गेले तर.. पण यावेळी आमचे सुदैवच. अगोदरच त्या ठिकाणी गाड्या पोहोचलेल्या होत्या. लोकांची गर्दी झाली होती. पण आम्ही पोहोचलो आणि काय वर्णावे त्या राजबिंड्या रुपाचे वर्णन.. पहिले काही मिनिटे तर आम्ही आ.. वासून पाहात राहिलो. आजवर केवळ चित्रात किंवा टीव्हीत पाहिलेल्या वाघाला प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि तेही अगदी 15 फुटांवरुन पाहतानाचा आनंद तो काय वर्णावा.. केवळ अप्रतिम.. पुढे मग त्याच्या सर्व लीला आम्ही हरखल्यागत पाहात होतो. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. ते ऐटीत उठणे, ती डौलदार चाल, शिकारीसाठी धरलेला दबा, मनसोक्त फोडलेली डरकाळी.. सर्व काही अगदी लाजवाब.
ब-याच वेळानंतर मग भानावर आलो. कारण आता निघावेच लागणार होते. अर्थातच जंगलचा कायदा. तेथे आपण पाहुणे. त्या दोन्ही वाघांना अगदी डोळे भरुन पाहून घेत हळूहळू आमच्या जीप गाड्या मागे वळवल्या. पार दिसेनासे होईपयर्यंत सतत त्या तळ्याकाठी नजर जात होती. मग परतताना सुनिताबाई देशपांडे यांचा दर्शनमात्रे आठवला. चार दिवसांच्या ताडोबा सहलिचे सार्थक झाल्याचे भाव सर्वांच्या डोळ्यात होते. शेवटच्या दिवशी का होईना पण जंगलच्या राजाने आपल्याला निराश केले नाही याचाच काय तो आनंद.
पर्यटकांसाठी महत्त्वाचे
ताडोबाला कसे जाल ?
रस्त्याने - धुळे-जळगाव-अकोला-यवतमाळ-चंद्रपूर- ताडोबा
रेल्वेमार्ग - वर्धा स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, किंवा मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसने थेट चंद्रपूर गाठावे. तेथून महामंडळाची बस किंवा कारने थेट ताडोबात प्रवेश करता येतो.
रहावे कुठे - ताडोबात एमटीडीसीचे लॉज आहेत. तसेच प्रायव्हेट रिसॉर्टही अनेक आहेत.
! "" बीजे एक वादळ "" !
Friday, 21 November 2014
" समर्थ स्थापीत ११ मारुती "
समर्थ स्थापीत ११ मारुती
समर्थाची मारूती स्थापना : प्रेरणा व स्वरूपज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,तुकाराम आणि रामदास हे संत म्हणजे मराठी भक्तिपरंपरेच्या पंचगंगाच मानल्या जातात. परंतु रामदासांच्या भक्तिगंगेच्या प्रवाहाचे इतर संतांच्या भक्तिप्रवाहापेक्षा असलेले वेगळेपण जाणकल्याशिवाय राहात नाही.
समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ह्यामुळे तात्कालीन समाजस्थितीचे दर्शन त्यांना घडले. सर्वत्र हिंदूंची दैन्यावस्था त्यांनी पाहिली. राम हे त्यांचे कुलदैवत असल्यामुळे आणि राम हा सामर्थ्यसंपन्न असुमारक आणि देवतातरक असल्यामुळे तसेच तो रामराज्य प्रदान करणारा असल्यामुळे त्याची भक्ती करण्याकडे हिंदू जनतेचे मन वळवावे म्हणजेच तिची सद्यस्थितीतून सुटका होईल असा विचार त्यांनी केला. तपश्चर्या करतांना आणि त्यानंतर तीर्थाटन करतांना, रामभक्ती आणि हनुमानभक्ती यांच्या योगाने स्वत:चा उध्दार करून घ्यावा हाच त्यांचा प्रधान हेतू होता. परंतु तपश्चर्या चालू असतांना श्रीराम आणि हनुमान यांनी दर्शन देऊन कृष्णातीरी जगदुध्दार कर कर असा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे, तीर्थाटन करून आल्यानंतर त्यांनी असे ठरविले की आपल्या ओजस्वी वाणीचा, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दीचा उपयोग हिंदू जनतेची मने रामभक्तीकडे वळवून तिला तिच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करावा. 'संसार क्षणभंगूर आहे, मरण केव्हातर येणारच', म्हणून आपले जीवन लोकसेवेत घालविल्यास जन्मसाफल्य होते व तीच रामाची सेवा होय
अशी शिकवण लोकांना द्यायला त्यांनी सुरवात केली. त्याचबरोबर, रामाचा संदेश पोहचवणारा सर्वश्रेष्ठ दास जो मारूती त्यांच्या ठिकाणी असलेल्या बलाची उपासना देखील लोकांना शिकवावी असेही त्यांनी ठरविले. हयासाठी लोकसंग्रह आणि लोकजागृती करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगाव भ्रमण केले आणि कित्येक ठिकाणी मारूतींची स्थापना केली. लोकांना मारूतीच्या उपासनेला लावून धैर्य, वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली.
समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये उत्तर भारतातही मारूतीमंदिरे स्थापन केली. त्यापैकी हनुमंत घाटावरील हनुमान मंदिर, तेलंगणातील हनुमानाचे मंदिर, ही मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतुबंधाजवळील हनुमान मंदिरही प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी कित्येक ठिकाणी मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या. समर्थ रामदास आणि मारूती हया दोन गोष्टीचे साहचर्य लोकांच्या मनात इतके ठसले आहे की एखाद्या ठिकाणची मारूतीची मूर्ती कोणी केव्हा स्थापन केली हे माहित नसेल तर ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली असणार असे गृहीत धरले जाते. तसेच समर्थांनी स्थापन केलेली मूर्ती कोठेही असो, ती ओळखण्याची खूण म्हणजे, रातापुढे मारूतीराय असले की ते हीत जोडूनच उभे असणार आणि एकटे मारूतीराय असले की त्यांचे हात प्रहार करण्याच्या भूमिकेत असणार व पायाखाली राक्षस तुडविलेला असणार!
समर्थांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारूतीची स्थापना केली असली तरी 'समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारूती' म्हणून जे प्रसिध्द आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :
- शहापूर येथे १ (स्थापना शके १५६६)
- मसूर येथे १ (स्थापना शके १५६७)
- चाफळ येथे २ (स्थापना शके १५७०)
- शिंगणवाडी येथे १ (स्थापना शके १५७१)
- उंब्रज येथे १ (स्थापना शके १५७१)
- माजगाव येथे १ (स्थापना शके १५७१)
- बहे-बोरगाव येथे १ (स्थापना शके १५७३)
- मनपाडळे येथे १ (स्थापना शके १५७३)
- पारगाव येथे १ (स्थापना शके १५७४)
- शिरोळे येथे १ (स्थापना शके १५७६)
वास्तविक समर्थांनी सर्वात प्रथम स्थापिलेली मारूतीची मूर्ती गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथील गोमयाची मूर्ती ही होय. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही मूर्ती आपला शिष्य उध्दव याच्या मारूती उपासनेसाठी स्थापिली. परंतू हया मूर्तीचा समावेश 'अकरा मारूतीत' नाही. तसेच, सज्जनगड येथील मारूती, शिवथर घळींतील मारूती, मिरज, महाबळेश्वर, वाई, तंजावर, टेंभू, शिरगाव येथील मारूती, हयांचाही अकरा मारूतीत समावेश नाही. असे का हयाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. रामदासांच्या विशिष्ट अकरा मारूतींपैकी काहीना कदाचित राजकीय दृष्टया मोक्याच्या स्थानामुळे महत्व दिले गेले असेल, कदाचित समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांतील काहीची स्थापना केली गेली म्हणून त्यांना महत्व दिले गेले असेल, किंवा काहींना अन्य कारणास्तव महत्व दिले गेले असेल; परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अकरा मारूतींना विशेष महत्व दिले गेले आहे ते सर्व मारूती कृष्णेच्या परिसरातील आहेत. 'कृष्णातीरी जगदुध्दार कर' हया दैवी दृष्टान्तामुळे हया कृष्णातीरीच्या मारूतींना विशेष महत्व दिले गेले असावे असाही तर्क काढता येण्यासारखा आहे.
समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-
चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥
पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥
समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
संदर्भग्रंथ - समर्थ स्थापित अकरा मारुती
! "" बीजे एक वादळ "" !
" सुंदरनारायण मंदीर "
सुंदरनारायण मंदीर
नाशिकचे वैशिष्टय असणारे सुंदरनारायण मंदीर हे गोदावरीकाठी अहिल्याबाई होळकर पुलाजवळ आहे.विष्णू जालंदाचे रूप धारण करून वृंदा देवी बरोबर राहू लागले. अश्या त-हेने वृंदादेवीचे पवित्र्य धोक्यात आहे व तिची पुण्याई संपुष्टात आली. त्यामुळे जालंदरला मारण्यात विष्णूला यश आले. वृंदादेवीला विष्णूची चलाखी लक्षात येताच ती अतिशय संतापली. तिने विष्णूला शाप दिला त्यामुळे भगवान विष्णू पूर्ण काळे पडले. विष्णूंनी गोदावरीत स्नान करून आपली काया परत मिळावली व पूर्वी इतकेच सुंदर ते दिसू लागले. म्हणूनच भगवान विष्णूंना नाव प्राप्त झाले सुंदरनारायण.
नाशिकचे सुंदरनारायण मंदीर १७५६ साली गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी बांधले.
देवाळाजवळ नदीच्या दिशेने बद्रीका संगम नावाचे कुंभ आहे असे म्हणतात की, देवगिरी राजाने ह्या कुंभात आंघोळ करून सर्व विधी पार पाडले. ह्या कुंभाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सुध्दा आपल्याला आढळतो. असे हे पुरातन मंदीर निश्चितच भेट देण्याजोगे आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
" करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर "
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर
कर्णदेवाने आजूबाजूचे जंगल तोडले वे हे मंदिर उजेडात आणले. १७ व्या शतकानंतर, अनेक रथी-महारथींनी या मंदिरास भेट दिली व त्यानंतर हया मंदिरास प्रसिध्दी लाभली. श्री. महालाक्ष्मी ही अखिल महाराष्ट्राची देवता बनली. कोल्हापूरास देवस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. या परिसरामधे जवळपास ३५ लहानमोठी देवळे असून, एकंदर २० दुकाने आहेत. हेमाडपंती शैलीने बांधलेल्या या मंदिराचे ५ कळस आहेत. 'गरूड मंडप' हा या मंदिराला लागूनच जोडलेला मंडप आहे.
रात्रौ ठीक १० वाजता देवीची शेजारती होते, त्यावेळी देवीला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. देवीच्या शयनगृहात आरती होते, व त्यावेळी 'निद्राविध'
मंदिरातील हया नित्याच्या आरत्यांव्यतिरिक्त, त्रयंबूली जत्रा, रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळ अष्टमी, किरणोत्सव इ. उत्सव प्रसंगी आणखी एक आरती करतात. श्री. शंकराचार्य, आणि श्रीमान् छत्रपती ज्यावेळी देवळास भेट देतात, त्यावेळी खास आरती करण्याची प्रथा आहे. कार्तिक महिन्यात दिवाळीपासून तो, पौर्णिमेपर्यंत उत्सव करतात. हजारोंनी पुरूष व महिला ज्यास भेट देतात, तो हा उत्सव पाहण्यासारखा आहे.
संपर्क : महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा,
कपिलतीर्थ मार्केटजवळ, ताराबाई मार्ग,
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत,
दूरभाष : ९१-२३१-६२६३७७
kolhapurdistrict.org च्या सौजन्याने
! "" बीजे एक वादळ "" !
" जोतिबा "
जोतिबा
कोल्हापूरच्या उत्तरेस, उंचच उंच सुळके आणि हिरव्यागार पर्वतराजींच्या सान्निध्यात, जोतिबाचे देऊळ वसले आहे. इ. सन १७३० मधे, नवाजिसायाने मूळ मंदिर बांधले. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ३३० फूट आहे. आतील मूर्ती चतुर्भुज असून सजावट प्राचीन आहे. त्या परिसरामधे इतर काही मंदिरे व दीपमाळा आहेत. चैत्री पौर्णिमेस इथे भरणाऱ्या जत्रेला अनेक भाविक गर्दी करतात. या यात्रेकरूंच्या हातात, उंच काठया (शासन) असतात. उधळलेल्या गुलालाच्या रंगाने जोतिबाचा अवघा डोंगर गुलाबी झाला आहे. याचा शुभवार रविवार आहे. हया देवस्थानामधे भाविकांकडून तसेच सरकारी पातळीवरूनदेखील बरीच सुधारणा झाली आहे. इथेच एक नवी योजना हाती घेऊन, 'प्लाझा गार्डन' विकसित केली आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
" चांदवड "
चांदवड
रंगमहाल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा महाल स्वत:साठी बनवला होता. या महालात वास्तव्यास असतांना अहिल्याबाई रेणुका मातेच्या दर्शनास जात असत तसेच विंचूरजवळ असलेल्या विहिरीवरही भेट देत असत. तिथे शत्रूंपासून बचावासाठी सुरक्षित जागा केलेली होती.
रेणुका माता मंदिर : ऋषी परशुरामांनी वडिलांच्या आदेशावरुन आई रेणूका मातेचा वध केला. रेणूका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूर गावाजवळ पडले. त्यामुळेच चांदवडला रेणूका मातेचे मंदिर बांधण्यात आले.
केद्राई माता मंदिर :
कसे जाल?
नाशिक पासून चांदवड ६४ किमी लांब असून खाजगी वाहनांनी दिड तासात पोहोचता येते. येथे जाण्यासाठी नाशिकहून बस तसेच छोटया गाडयांची सोयही उपलब्ध आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
" सप्तश्रृंगी देवी वणी "
सप्तश्रृंगी देवी वणी
प्रचंड शीतकडा
तीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. एका सवाष्णीने 'मला पूत्र होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन' असा नवस देवीस केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर पाहता येतात. हा प्रसिध्द शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पाय-या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पाय-या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.
देवीची मूर्ती
सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मुर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. ४७० पाय-या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणा-या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्या वर भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला 'महिषासूरमर्दिनी' असेही म्हणतात.
ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहनी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला सांकडे घालतात.
नवीन सुविधा गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पाय-यांवर छप्पर आले आहे तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लकेटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने काली आहे. सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.
! "" बीजे एक वादळ "" !
" तुळजाभवानी "
तुळजाभवानी देवी - तुळजापूर
स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.
देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.
तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होते. तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. या विधीस मोठे महत्त्व आहे. तसेच नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री भवानी मातेचा जागर होतो. प्रशाळपूजेनंतर देवीला विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटस्थापन करण्यात येते. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
तुळजापूरस्थित भवानी मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. भवानी मातेचे मंदिर खोलगट भागात आहे. मंदिराकडे जाण्यासाठी उताराचा रस्ता आहे. या मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताला तीर्थकुंडे आहेत. एकशे आठ झ-यांचे उगमस्थान असणारी ही तीर्थकुंडं कल्लोळतीर्थ व अमृतकुंड या नावांनी ओळखली जातात. मंदिराच्या उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. भाविक मंदिरात प्रवेश केल्यावर या सर्व देवतांचे दर्शन घेत दत्तपादुकांजवळ येऊन पोहोचतात. गाभा-याजवळील गणेश मूर्तीचे दर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर गाभा-या समोरील पाच पाय-या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती पध्दतीचे आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
" भीमाशंकर मंदिर "
भीमाशंकर मंदिर, ता. खेड, जि. पूणे
हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
गुप्त भीमाशंकर - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिलिंर्गात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूवेर्ला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
कोकण कडा - भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
सीतारामबाबा आश्रम - कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
नागफणी - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
! "" बीजे एक वादळ "" !
" भंडारदरा धबधबा "
डारदरा हे नाशिकपासून ७० कि.मी. वर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे.
भंडारद-याचे खरे सौंदर्य हे पावसाळयानंतर अधिक खुलते, नाहीतर इतर वेळेला हा
भाग अगदी रखरखीत असतो. १९२६ साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील
सर्वात जुने धरण आहे. इथला 'छत्री' (umbrella) धबधबा हा अतिशय सुंदर व
मनोहर आहे. भंडारद-यापासून ११ कि.मी. वर रंधा धबधबा आहे.
हा
धबधबा ४५ मीटर उंचीवरून खाली कोसळतो. त्यामुळे हे दृश्य सुंदर असून सुध्दा
भीतीदायक वाटते. हा धबधबा पाहण्याकरिता पर्यटकांसाठी सुरक्षित सोय केली
आहे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना भंडारद-यापासून कळसूबाई शिखर खूपच जवळ
आहे. महाराष्ट्रातले उंच असणारे हे शिखर समुद्रसपाटी पासून १,६४६ मीटर उंच
आहे. हा भाग दाट जंगल-झाडींनी वेढलेला आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी व
पक्षी येथे सहजपणे आढळतात. रस्ता घनदाट जंगलातून जात असल्यामुळे
गिर्यारोहकांनी स्थानिक वाटाडयांची अथवा पुस्तकांची मदत घेतलेली अधिक
चांगली. जवळ अमृतेश्वर देऊळ आहे. येथे शंकराची पुरातन पिंड आहे.
अमृतेश्वरला बोटीने जावे लागते. येथूनच पुढे रतनगड किल्ला आहे. हा किल्ला
फारसा वैशिष्टयपूर्ण नसला तरी पर्यटकांसाठी भेट देण्याजोगा आहे.
भंडारदऱ्यापासून २२ कि.मी. असणारे 'घाटघर' ठिकाण थरारक ड्रायव्हींगची आवड
असणा-यासाठी योग्य आहे. पावसाळयात ह्या भागात संपूर्णत: धुके असते. तसेच
घाटघर कडे जाणारा रस्ता खाचखळग्यातून जाणारा निमूळता रस्ता आहे. त्यामुळे
चालक रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे. भंडारदरा येथे महाराष्ट्र पर्यटक
मंडळाने राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय केली आहे. मंडळाची रहाण्याची
सोय तळयाकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. राहण्याची सोय दूरध्वनी
(६२८१६९, ६२६८६७) वरून होऊ शकते. आता काही खाजगी हॉटेल्सची सोय सुध्दा
उपलब्ध आहे. भंडारदारा येथे तुम्हाला उच्चप्रतीची राहण्याखाण्याची सोय
कदाचित मिळणार नाही पण निसर्गाचा आनंद मात्र मनमुराद लुटता येईल.
"" बीजे एक वादळ "" !
" बारा ज्योतिर्लिंगे "
उज्जयिन्याम् महाकालम् मोंकालममलेश्वरम् |
परल्यां वैजनाथं च डाकिंन्यां भीमशंकरम्
सेतुबंधे तु रामेशं, नागेशं दारुकावने |
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे
हिमालये तु केदारम् घृशुणेशं शिवालये
एतानि द्वादश ज्योतिर्लिंगानी सायंप्रात: पठेन्नर:
सप्तजन्मकृतपापं स्मरणेन विनश्यति | ||
१) सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
२) मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
३) महाकाळेश्वर - उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.
४) अमलेश्वर - ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
५) वैद्यनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
६) भीमाशंकर - भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.
७) रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
८) नागेश्वर - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
९) काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.
१०) केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
११) घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
१२) त्र्यंबकेश्वर - नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।
॥शाहू राजवाडा ॥
नवा राजवाडा (शाहू म्यूझियम) : दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला. त्याकाळी त्याची किंमत सुमारे सात लाख रुपये होती. याची दर्शनीय बाजू दक्षिणेला असून राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या उंच मनोऱ्यावर एक भलं मोठं घड्याळ चारही दिशेने वाढत असलेल्या करवीर नगरीची शान पाहत आहे. या मनोऱ्याची उंची १३५ फूट आहे. राजवाड्याच्या एका बाजूला दरबारगृह व बिलिअर्ड खेळण्याची खोली असून दूसऱ्या बाजूला दोन मोठ्या खोल्या स्वागत प्रतिक्षेसाठी आहेत. मागील बाजूस मोठा खुला चौक असून त्याच्या मध्यभागी एक कारंजा आहे. मुख्य राजवाडा दुमजली असून त्याच्यावर लहान मोठे मनोरे व घुमट आहेत. मिश्र शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट व तितकाच सुंदर नमुना आहे. हा राजवाडा, त्या समोरील छोटा तलाव, तलावाकाठी छोटे राखीव जंगल आणि त्यातून हिंडणारी हरणे व इतर प्राणी, वाड्याभोवतालचा रम्य परिसर मनाला मोहविणारा आहे.श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान. राजवाड्याच्या काही भागात सध्या शाहू महाराजांच्या काळच्या ऐतिहासिक वस्तू व शिल्प यांचे संग्रहालय करून स्मारक म्हणून राखून ठेवले आहे. छत्रपती शाहूंची मौल्यवान छायाचित्रे व पेंटिग्ज, त्यांनी शिकारीसाठी व लढाईमध्ये वापरलेल्या बंदुका व अन्य शस्त्रे, शिकारीत मिळालेली जनावरे आकर्षक पध्दतीने मांडलेली आहेत. या राजवाड्यातील भव्य दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने चितारलेले आहेत. पूर्वी दरबार भरत असताना ज्या पध्दतीने सजवला जात असे त्याच पध्दतीने सजवून तो प्रेक्षकांपुढे मांडलेला आहे, हे दरबार हॉलचे वैशिष्ट्य. राजवाड्याचा परिसरही उद्याने व हिरवळीने नटलेला आहे. हे म्युझिअम सोमवारी बंद असते. इतर दिवशी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत खुले असते.जुना राजवाडा (भवानी मंडप) :शहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याचा पुढील भाग तर संपूर्णपणे बऱ्याच कालातंराने बांधला गेला आहे. हा राजवाडा दुमजली असून मध्यभागी मोठा हॉल आहे. येथे श्री. महालक्ष्मी (तुळजा भवानी) च्या प्रतिमेची स्थापना केली आहे. या हॉलचा उपयोग दरबारगृह व खाजगी धार्मिक विधीकरता होत असे. राजवाड्याखेरीज इतर विस्तारित भागांचा उपयोग संस्थान काळात निरनिराळया संस्थानी कार्यालयासाठी म्हणून होत असे. सध्या या विस्तारित इमारती पोलिस स्टेशन, कोर्ट, एन. सी. सी. ऑफिस, शेतकरी बझार, राजाराम हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल वगैरे करिता वापरल्या जातात. राजवाड्यासमोर एक मोठा मंडप असून त्याला भवानी मंडप असे म्हणतात. भवानी मंडप हे सध्या सिटी बसेसचे एक केंद्र आहे. या राजवाड्याच्या उत्तरेला जुन्या पध्दतीची पाच मजली वास्तू आहे. याचा वापर नगारखान्याच्या वास्तूला तीन मोठ्या कमानी आहेत. मधल्या हॉलमध्ये जो पूर्वी दरबारी थाट होता तो अलिकडच्या काही वर्षात पहावयास मिळत नाही व इथून पुढे मिळणारही नाही. सध्या तेथे एक गवा रेडा आणि वाघ, सांबर आदि कांही प्राणी भुसा करुन उभे केलेले आहेत. रान- रेडा सध्याच्या छत्रपतींनी सुमारे ३० - ३५ वर्षापूर्वी मारला होता. ही एकच काय ती निशाणी राहिलेली आहे. बाकीचा सर्व वैभवी थाट लोप पावलेला आहे. शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान :कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले. हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान क्वचितच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या केल्या जातात. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.केशवराव भोसले नाट्यगृह :सध्या कोल्हापुरात असलेले हे नाट्यगृह सुमारे ९० वर्षापासून उभे आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात जुने नाट्यगृह होय. या नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली. पूर्वी यास पॅलेस थिएटर या नावाने ओळखत असत. याच्या बांधकामास ९-१०-१९१३ रोजी सुरवात झाली. १४-१०-१९१५ रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले. नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते ७२० फूट आकाराचे आहे. रंगमंचाखाली १० फूट खड्डा असून त्यात पाणी आहे. पूर्वी ही विहीर होती असे म्हणतात. रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा हा आहे. हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. पाणी खेळविण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. रंगमंचाच्या पूर्वेकडील बाजूस दोन रंगपटगृहे आहेत. भक्कम फळया घालून रंगमंच बांधले आहे. नाट्यगृहात कोठेही खांब नाहीत त्याकाळी बांधलेल्या बहुतेक नाट्यगृहात खांब फार असत व त्यामुळे काही प्रेक्षकांना रंगमंचावरील पूर्ण भाग पाहता येत नसे. कलाकार, प्रेक्षक व आवाजाचा अंदाज घेऊन हे नाट्यगृह बांधले असल्यामुळे कोठूनही पूर्ण रंगमंच दिसतो व संभाषण चांगले ऐकू येते. पीटाच्या पहिल्या रांगेतील प्रेक्षक व रंगमंच यामध्ये सुमारे ८० फूट अंतर आहे. माडी प्रशस्त व खानदानी वाटते. बसण्याची जागा चांगली रुंद आहे. पूर्वी माडीवर दोन्ही बाजूस राज घराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी दोन चष्मे (बंदिस्त खोल्या) ठेवण्यात आले होते. गोषातील स्त्रिया येथून नाटके पाहत. अलिकडे नाट्यगृहात अंतर्बाह्य खूपच सुधारणा झाल्या आहेत.नाट्यगृहाच्या सभोवताली प्रशस्त मोकळी जागा असलेने त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. या आवारात कोल्हापूरचे सुप्रसिध्द अभिनेते कै. अरुण सरनाईक यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. एका कारंज्याचीही रचना केलेली होती, पण हे कारंजे सद्यस्थितीत बंद आहे. नाट्यगृह रस्त्यापासून थोडे बाजूला व रस्त्याच्या पातळीपासून खाली असल्याने बाहेरच्या गलबलाटाचा नाटकावर परिणाम होत नाही. एकंदरीत नाट्यगृहाची रचना व सोयी या दृष्टीने ज्या काळात नाट्यगृह बांधले त्याचा विचार केला तर तर अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही.हे नाट्यगृह बांधण्यापूर्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. राजश्री शाहू छ. महाराज हे कलांचे रसिक भोक्ते व उदार आश्रयदाते होते. कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात नाट्य व संगीत कला यांच्या वाढीस शाहू महाराजांचे सहाय्य कारणीभूत झाले. १९०२ मध्ये शाहू महाराज विलायतीला गेले. तिकडील विशेषत: रोममधील कुस्त्यांची मैदाने व पॅलेस थिएटर यांच्या रुपाने प्रगट झाले. पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे हस्ते झाले. थिएटरचे अनावरण १९१५ साली दसऱ्यास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींच्या मानापमान या नाटकाचा प्रयोग होऊन झाले. किर्लोस्कर नाटक कंपनीबरोबर राम गणेश गडकरीही आले होते.स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचे पूर्वीचे नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले. कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नामवंत नटाचे नाव या नाट्यगृहास देऊन त्यांचा गौरव केला गेला. त्यांची दोन तैलचित्रे रंगमंचावर लावण्यात आली आहेत.
Thursday, 20 November 2014
॥ कोकणकन्या म्हणजे कोकण रेल्वेचे अप्रतिम सौंदर्य ॥
निसर्गावर असंख्य जणानी कविता लिहिल्या असतील...अगदी पाला पाचोळ्या एवढ्याबेसुमार...त्यातलेच हे एक छोटे पान...फरक एवढाच की ही कविता कोकण रेल्वेत बसून , निसर्गाला साक्षठेवून - रेल्वे तिकिटाच्या मागच्या बाजूवर लिहिलेली...
हिरवळिच्या चौकोनात उमटले वर्तुळ पाण्याचे
ओले सप्तसुर निनादले जल-धारांच्या गाण्याचे
आभाळाला लटकती उंच नारळाच्या पेंडया
ढग खाली वाकून ओढती डोंगराच्या शेंड्या
गवताच्या तलवारीवर जडले पाण्याचे मोती
झाडे रांगती न्हाउनी, धरणीची पिल्ले छोटी
वारयाची शर्यत वेळेशी, प्रकाशाला धुक्याचे कोंदण
नदीची वळणे नागमोडी, कातळाला झरयाचे गोंदण
लाल तांबड्या मातीत, निळे थेंब झिरपले
हिरव्या रंगात हरवूनी, मन वेडे हरपले.
हिरवळिच्या चौकोनात उमटले वर्तुळ पाण्याचे
ओले सप्तसुर निनादले जल-धारांच्या गाण्याचे
आभाळाला लटकती उंच नारळाच्या पेंडया
ढग खाली वाकून ओढती डोंगराच्या शेंड्या
गवताच्या तलवारीवर जडले पाण्याचे मोती
झाडे रांगती न्हाउनी, धरणीची पिल्ले छोटी
वारयाची शर्यत वेळेशी, प्रकाशाला धुक्याचे कोंदण
नदीची वळणे नागमोडी, कातळाला झरयाचे गोंदण
लाल तांबड्या मातीत, निळे थेंब झिरपले
हिरव्या रंगात हरवूनी, मन वेडे हरपले.
Subscribe to:
Comments (Atom)





