! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 8 September 2017

किल्ले तोरणा

अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्‌ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्या पर्यंतचे अंतर ६० किमी आहे.

हा गाडा वरून राजगड वर जाण्यचा मार्ग आहे
इतिहास संपादन करा

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.

हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.

प्लस व्हॅली

.

पुण्यापासून कोकणात उतरणाऱ्या ताम्हिणी घाटात, ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव ‘प्लस व्हॅली’ दिले गेले.

Sunday, 27 August 2017

नाणेघाट

मुरबाड जवळ माळशेज घाटाच्या अलीकडील तमाम ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण म्हणजे नाणेघाट. याच मार्गावर नाणेघाटातून वरून जोरदार वाहत येणारे अनेक ओढे आणि त्याची झालेली नदीच्या परिसराचं अप्रतिम असं निसर्गसौंदर्य अनुभवता येतं.

Friday, 4 August 2017

रक्षाबंधन

नात हे प्रेमच तुझ आणि माझ 

हरवलेले ते गोड दिवस , त्यांच्या मधुर आठवणी 

आज सार सार आठवलाय 

हातातल्या राखी सोबतच .

भाव मनी दाटतोय ..

बंध हे प्रेमाचे नात आहे 

ताई  तुझ आणि माझ नात जन्मो जन्मीचे आहे

Thursday, 3 August 2017

भोग्वे बीच

भोग्वे बीच, साधारण 29 कि.मी. कुडाळ पासून आणि 36 कि.मी. वेंगुर्ला पासून, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे. भोगवे बीच गोवा आणि केरळांच्या समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे प्रसिद्ध नाही, परंतु हे त्या दुर्मिळ "अद्याप-अस्थापित" निर्मितींपैकी एक आहे.

Wednesday, 19 July 2017

🚩नाणेघाट :-

नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला.
प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल ते महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचेराज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते.
प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यानी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजाबी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळाच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत.
नाणेघाट चढून गेल्यावर प्रथमदर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्ये आगातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत.
हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो.
या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे. गुहेवर पाण्याची तीन ते चार टाकी आढळतात. गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते. यालाच ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात.
घाटमाथ्यावर पोहचल्यावर उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठ्यावर येऊन पोहोचतो येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते. समोर दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात.
घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. अशाप्रकारे मुंबईकरांना एका दिवसात जाऊन येता येईल असा नाणेघाटाचा ट्रेक हा एक सुरेख अनुभव ठरतो.

Sunday, 9 July 2017

कळसूबाई

कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्‍याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्‍या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.