कर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर
आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील
सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हां
धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदरआहे.लहान मुलाना देखील निर्धोक पणे
पाण्यात डुंबण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो.सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे
एक उत्तम ठिकाण आहे.स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ
स्टेशन वरून दर पंधरा
मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे
येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज
पोहचता येते.त्या ठिकाणी गेल्या नंतर आणि तेथील
सृष्टि सौंदर्य पाहिल्या नंतर येथून परत फिरायला मनच होत नाही.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Friday, 9 June 2017
सोलानपाड़ा धबधबा
वसईचा किल्ला
हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातीलवसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
#VasaiFort #FortBassein #FaktaMarathi
Sunday, 4 June 2017
मुळशी धरण
मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. दुरवर पसरलेलं पाणी, त्यात पक्ष्यांची सदाबहार गाणी.. क्षणभर विश्रांती देणार मुळशी हे पुणेकरांच हक्काच पर्यटन स्थळ आहे..
#MukshiDam #FaktaMarathi
मार्लेश्वर
महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे शिवस्थान डोंगरावरील गुहेत आहे. ह्या गुहेत दोन शिवपिंडी आहेत, त्यातील एक मल्लिकार्जुन तर दुसरी मार्लेश्वर ह्या नावाने ओळखल्या जातात. असे सांगण्यात येते की, हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे स्थान निर्माण झाले तेव्हा येथे पार्वती नव्हती. आणि म्हणूनच ह्या देवस्थानाची अशी पद्धत आहे की येथे दर मकर संक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते. मार्लेश्वर हा वर तर साखरपा ह्या गावाची भवानी मंदिर (गिरिजादेवी) ही वधू समजून लग्न लावले जाते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. ह्या शिव पिंडी स्वयंभू आहेत.
गावापासून दूर असलेल्या छोट्याश्या गुहेत असलेले हे ठिकाण निसर्गरम्य व हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. ह्या स्थानाचे एक आकर्षण म्हणजे येथे वाहणारा धबधबा. सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा धारेश्वर ह्या नावाने ओळखला जातो. सह्याद्रीच्या कड्यावरून हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात ह्या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते.
मार्लेश्वरला जाण्यासाठी साखरपा, देवरुख तसेच रत्नागिरीहून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आहेत.
Saturday, 3 June 2017
आंबोली
आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे.
#AmboliGhat #FaktaMarathi
Sunday, 21 May 2017
Tuesday, 16 May 2017
जव्हार हिल स्टेशन
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात आहे. नितांत सुंदर दऱ्या-खोऱ्या, घनदाट समृद्ध जंगले आणि सुखद हवामानाची देणगी या ठिकाणी आहे. जव्हार हे वारली चित्रकलेसाठी सुप्रसिद्ध आहे. जव्हारला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर देखील म्हणतात. हे नाशिकपासून ८० किमी तर मुंबईपासून १८० किमीवर आहे. जव्हारच्या आसपास काही पर्यटन स्थळे म्हणजे जय विलास महाल, भूपतगड किल्ला, दादर-कोप्रा आणि पलुसा धबधबे, हनुमान आणि सनसेट पॉईंट्स आणि शिर्पामड. जव्हारच्या जवळचा विमानतळ मुंबई आणि नजिकचे रेल्वे स्थानक इगतपुरी मध्य रेल्वेवर ६१ किमीवर आहे परंतु नाशिक जास्त सोयीचे आहे.