: मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Wednesday, 4 January 2017
Tuesday, 3 January 2017
गणपतीपुळे
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणिनारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.
गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई,पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.
गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ(M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.
गणपतीपुळे
गणपतीपुळे मंदिर
गणपतीपुळे मंदिराचे प्रवेशद्वार
गणपतीपुळे मंदिराची प्रदक्षिणा
गणपतीपुळे हे मुबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे आहे. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे.
गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवीकेशवसुत ह्यांचे स्मारक आहे.
गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे. गणपतीपुळेलगतच भंडारपुळे हे गाव आहे. जितका गणपतीपुळे इथला आहे तितकाच भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे.. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.
Wednesday, 28 December 2016
भगवा
चंद्राला_चांदनी_शिवाय_जमत_नाय . . .
# आन_आपल्याला आपल्या. .
# भगव्या🚩🚩🚩🚩🚩 शिवाय_करमत_नाय
💐💐 *शिव राञी*💐💐
सह्याद्रीचे वेड ...!!!
नभा नभातुनी
दऱ्या खोऱ्यांतुनि
गर्जितो माझा सह्याद्री ...!!
दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री ...!!!
मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन म्हणूनच सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत.
तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं ...
महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड हि अशीच आमची एक सुंदर, गर्द वनातलि त्रिकुट मोहीम ...चार मित्रांसमवेत, ३ दिवस अनुभवलेली .
चला तर मग त्या अनुभवाची शिदोरी तुमच्या पुढे उघड करतो ...
Saturday, 19 November 2016
गुलाबी थंडी
गुलाबी थंडी हवीहवीशी,
जुळती नाती नवी-नवीशी.
'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,
फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.
हात चोळणे खांदे उंचावून,
स्वेटर न घालणे थंडी लागून.
एकच कप चहा दोघांनी पिणे,
खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.
पतंग उडवण्यासाठी धडपडने,
पतंगासोबतची उंचच स्वप्ने.
कधी रुसणे ......कधी रागवणे,
बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.
गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे,
तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,
या वर्षीच्या गारव्यात एकदा
देईन वचन अन करेन वादा.,
स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना करीन
हवे तुला ते सारे मागेन.
Thursday, 17 November 2016
दैवत
एकुण केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो लढाया केल्या व जिँकल्या. आजही जगभरातील सर्वच दोनशे राष्ट्रे लढायासाठी शिवरायांचे युद्धतंत्र अभ्यासतात. त्याचा अवलंब करतात ; परंतु त्याचवेळी शिवराय कशासाठी 'छत्रपती' झाले. कशासाठी 'लढले' . ते लोकराज्य स्थापन करुन लोकल्याण कसे करु शकले. याकडे मात्र कानाडोळा करतात.
शिवाजी हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे
शिखर शिंगणापूर ..महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे . मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत. सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर हे मंदिर प्राचीन काळा पासून प्रसिध्द आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येवून राहिला होता. त्यानेच शिंगणापुर गांव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. मालोजीराजे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करथिर्थ असे म्हणतात. पुर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचा जिर्णोध्दार झाला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.
या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.
