! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 3 January 2017

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणिनारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.

गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई,पुणेकोल्हापूरनाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ(M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.

गणपतीपुळे

गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे मंदिराचे प्रवेशद्वार

गणपतीपुळे मंदिराची प्रदक्षिणा

गणपतीपुळे हे मुबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे आहे. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे.

गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवीकेशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे. गणपतीपुळेलगतच भंडारपुळे हे गाव आहे. जितका गणपतीपुळे इथला आहे तितकाच भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे.. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.

Wednesday, 28 December 2016

भगवा

चंद्राला_चांदनी_शिवाय_जमत_नाय . . .
# आन_आपल्याला आपल्या. .
# भगव्या🚩🚩🚩🚩🚩 शिवाय_करमत_नाय
💐💐 *शिव राञी*💐💐

सह्याद्रीचे वेड ...!!!

नभा नभातुनी
दऱ्या खोऱ्यांतुनि  
गर्जितो माझा सह्याद्री ...!!
दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री ...!!!
मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन  म्हणूनच  सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो . प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत.
तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने  नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज करतं  ...
महिपतगड _सुमारगड आणि रसाळगड हि अशीच आमची एक सुंदर, गर्द वनातलि त्रिकुट मोहीम ...चार मित्रांसमवेत, ३ दिवस  अनुभवलेली .
चला तर मग त्या अनुभवाची शिदोरी तुमच्या पुढे उघड करतो ...

Saturday, 19 November 2016

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी हवीहवीशी,

जुळती  नाती  नवी-नवीशी.

'गारवा' गाणे कुडकुडत गुणगुणणे,

फुटल्या ओठांचे हलकेच हसणे.

हात चोळणे खांदे उंचावून,

स्वेटर न घालणे थंडी लागून.

एकच कप चहा दोघांनी पिणे,

खूप थंडी आहे....पुन्हा पुन्हा सांगणे.

पतंग उडवण्यासाठी  धडपडने,

पतंगासोबतची  उंचच स्वप्ने.

कधी रुसणे ......कधी रागवणे,

बोलण्यासाठी पुन्हा कारण शोधणे.

गोड बोलूया ... एकमेकांना सांगायचे, 

तिळगुळ वाटत - घेत फिरायचे,

या वर्षीच्या गारव्यात  एकदा 

देईन  वचन अन करेन वादा.,

स्वप्नासाठी तुझ्या प्रार्थना  करीन 

हवे तुला ते सारे मागेन.

Thursday, 17 November 2016

दैवत

एकुण केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो लढाया केल्या व जिँकल्या. आजही जगभरातील सर्वच दोनशे राष्ट्रे लढायासाठी शिवरायांचे युद्धतंत्र अभ्यासतात. त्याचा अवलंब करतात ; परंतु त्याचवेळी शिवराय कशासाठी 'छत्रपती' झाले. कशासाठी 'लढले' . ते लोकराज्य स्थापन करुन लोकल्याण कसे करु शकले. याकडे मात्र कानाडोळा करतात.

शिवाजी हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे

शिखर शिंगणापूर ..महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत

महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे . मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत. सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर हे मंदिर प्राचीन काळा पासून प्रसिध्द आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येवून राहिला होता. त्यानेच शिंगणापुर गांव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. मालोजीराजे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करथिर्थ असे म्हणतात. पुर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचा जिर्णोध्दार झाला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.

या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.

Tuesday, 15 November 2016

☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆★


_______________________________
१) लखुजी जाधव (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा
२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे
३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी
४) शहाजीराजे - होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.
दावनगेरे (कर्नाटक)
५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)
६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर
७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड
८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड
९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू)
कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले
पुत्र)- वडू कोरेगाव
११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर
१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातील
मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी
१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता.
करमाळा, जि. सोलापूर
१५) शिवरायांचे सेनापती
नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड
१६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)
१७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी,
जि. नाशिक
१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप
(गाधवड, जि. पुणे)
१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -उमरळ
२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड
२१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता.
आटपाटी, जि. सांगली
२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ -
परळी (रायगडाजवळ)
२३) शिवा काशिद - पन्हाळगड
२४) कान्होजी जेधे आणि जिवा महा-
कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे
२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर
२६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता.
मुळशी, जि. पुणे
२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे
२८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)
२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड
३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू)
निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.
३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर
३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच
नावाने आहे) - बीड
३३) जगदेवराव जाधव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व
देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.
सोलापूर ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा ३५)
हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि.
उस्मानाबाद ३६) अन्नूबाई
(पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.
उस्मानाबाद

आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण
अवस्थेत आहेत.
काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत
त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील
पिढीला प्रेरणा  असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ
शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे
लवकर समजावे हे विशेष आहे.
⛳स्वराज्य⛳

छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द हिंदूच म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद. 
                                             कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

⛳विनंती: पुढे पाठवा