! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Friday, 30 September 2016

मैत्री

मैञी हा असा हा शब्द आहे ज्य़ाचा अर्थ प्रेमा 
पेक्षा सुंदर अाहे ।।
मैञी हे अस नात आहे अाहे ज्याची जागा 
माझ्या हृद्याच्या अात अाहे ।।
मैञी ही जगन्याची वाट अाहे ज्यात तुझी
साथ अाहे ।।
मैञी ही मनाची भावना आहे जक्षी दिव्या मध्ये प्रकाश
देणारी वात  आहे ।।

Thursday, 22 September 2016

महाराज....

परवा एका IT क्षेत्रातली व्यक्ति मला म्हणाली तुला "अरे तुला शिवाजीत एवढा इंटरेस्ट का आहे ? जगात इतके पराक्रमी राजे आहेत ? सारख शिवाजी शिवाजी तो थोडीच जगातला सगळ्यात पराक्रमी राजा होता 😏😏"
तिला मी म्हणालो नीट ऐक
"मी जाणिवपूर्वक विधान करतो की शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते जगात तुलना नाही असे राजे होते..."
माझं बोलणं मध्येच तोडत ती व्यक्ती  म्हणाली "सिध्द करून दाखव" ठीक आहे म्हणलं
तसंही लायब्ररीतील बरीचशी जनता डोकावून पाहत होती...म्हटलं यापेक्षा चांगली संधी नाही
मी म्हटलं महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.बाकी सगळे परकीय होते त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.....शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु

ज्याची लाल महालात बोटं छाटली
तो  शाहिस्तेखान तो अबु-तालिबान चा नबाब, तुर्कस्तान चा नबाब आहे. तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो.  बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने..असा बलाढ्य  सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला पुन्हा नाही आला...

तो बहलोलखान पठाण सिकंदर चीड़रखान पठाण हे सगळे पठाण अफगानी आहेत अफ़गानिस्तान चे आहेत हे

तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा...महराजांनी त्याचा पराभव केला

सिद्धि जौहर सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला

आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जागातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला ( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावला न गमावता ) तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हण्जे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला महाराजांनी परत नाई आला

इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी माहाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तान नीट चेहरा  पाहता सुध्दा आला नसता...

सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्राकाशित होत होती त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नवता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख Shivaaji the king of india असा होता

व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं आपल्या पुणे जिल्ह्याएवढ पण नसेल या व्हियेतनाम चं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू आहे पण या युध्दात अजुन अमेरिकेला विजय मिळाला नाहीये का माहितीये कारण त्या व्हियेतनाम च्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे....त्या व्हियेतनाम चा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याच  त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळ येथे चीरविश्रांती घेतोय

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात "शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो

जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair(युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो

मी म्हाणालो आता तूच सांग सगळ जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात  किती शिवरायांचा उल्लेख आहे ?

तुम्ही इतिहास shikalaat त्या
CBSC मध्ये  1700 पानांचे पुस्तक काढलंय त्यात फक्त 4 ओळी आहेत
म्हणुन तुला ही माहिती नव्हती...म्हणुन तुम्ही असं म्हणालात चला येतो 👏

Friday, 16 September 2016

तेजस्वी राजा

संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लॉर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली.. त्यावेळी त्याने आपल्या डायरीत लिहिले कि
"मी हा सारा मुलुख फिरलोय ,एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ? आमची ती योग्यता कधीच नव्हती… कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा .. कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले…!
छत्रपति शिवराय सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते..!
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते..!!"
☀ ☀ ☀
असा आपला राजा …पसरु दे सर्वदूर ‘ शिव ‘नावाचा जयजयकार..!
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका..
☀ ☀ ☀
"जय शिवराय"

Thursday, 15 September 2016

आज इंजिनिअर दिवस..

इंजिनिअर दिवसा निमीत्त सर्व इंजिनिअर्सना व इंजिनिअर्सच्या संशोधनांमुळे व परिश्रमांनी म्हणजे थोडक्यात कृपेमुळेच आरामात जगत असलेल्या जगातील सर्वांनाच खुप खुप शुभेच्छा..

आजच्या दिवशी आठवण येतेय ती स्वराज्यातील बांधकाम इंजिनिअर मा.श्री. हिरोजी इंदळकर यांची. मा.श्री. हिरोजी इंदळकर हे छत्रपती शिवरायांनी शोधुन काढलेल्या अनेक हि-यांपैकी एक महत्वाचा व स्वराज्यनिष्ठ हिरा..

मा.श्री. हिरोजी इंदळकर हे छत्रपती शिवरायांचे स्थापत्त तज्ञ यांनी शेकडो गडकिल्ले, वाडे, गढ्या इ. बांधले व डागडुजी केली पण त्यांचे सर्वात मोठे व महत्वाचे काम म्हणजे स्वराज्याची राजधानी गडकिल्ल्यांचा राजा " किल्ले रायगड " ची बांधणी. या कामात एकवेळ पैसे कमी पडले तर मा.श्री. हिरोजी इंदळकर यांनी स्वत:चा राहता वाडा व शेतजमीन विकली व पैसा उभा केला व स्वत: कुटुंबासह रायगडाशेजारीच झोपडी घालुन राहिले. छत्रपती शिवरायांना हा त्याग कळाल्यास त्यांनी मा.श्री. हिरोजी इंदळकर यांना पाहिजे ते मागन्यास सांगीतले तर मा.श्री. हिरोजी इंदळकर यांनी श्री जगदीश्वराच्या एका पायरीवर नाव कोरायची परवानगी मागीतली जेनेकरुन छत्रपती शिवरायांची चरणधुळ कायम मस्तकी धरता यावी. धन्य धन्य ते मा.श्री. हिरोजी इंदळकर अन धन्य धन्य ती त्यांची स्वराज्य व स्वामी निष्ठा..

आजही किल्ले रायगड पाहताना डोके गरगरुन जाते, डोळे उघडे ते उघडेच राहतात, बुद्धी काम करत नाही. वाटते एवढा मोठा अवाका असलेला, अगदी बांधकामांचा नियमात बसवलेला, बलाढ्यपनात तसुभरही कमी नसलेला, विज्ञानाचा पुरेपुर वापर केलेला अन महत्वाच म्हणजे घनदाट अरण्यात व एवढ्या उंचीवर बांधला कसा असेल अन बांधायची कल्पना तर कशी सुचली असेल छत्रपती शिवरायांना अन मा.श्री. हिरोजी इंदळकर यांनी छत्रपती शिवरायांची हि कल्पना प्रत्यक्षात तरी कशी उतरवली असेल..

धन्य धन्य ते छत्रपती शिवराय..
धन्य धन्य ते त्यांचे रणवीर स्वामीनिष्ठ मावळे..

Wednesday, 14 September 2016

जय शिवराय...

#भवानी मातेचा लेक तो,
#मराठ्यांचा राजा होता
#झुकला नाही कोणासमोर,
#मुघलांचा तो बाप होता
#कोणी चुकत असेल तर,
#त्याला सत्याची वाट दाखवा
#आणि कोणी नडला तर,
#त्याला मराठ्याची जात दाखवा

#जय भवानी जय शिवाजी....

Tuesday, 13 September 2016

पाऊस

सरींसवे सरूनी गेले
भर्कन उडूनी गेले तास
नभी भरलेल्या काजळासवे
नव्याने दाटला मनी उल्हास

निळे, पोपटी, हिरवे, पिवळे
लख्खं मला दिसु लागले
तेच रंग त्या उन्हात
नव्याने भोवती फिरू लागले

चिंब भिजुनी चमकणारे
समोरच उभे बकुळ होते
त्याची रेखीव फुले वेचाया
नव्याने आज व्याकुळ होते

स्वतःस झोकुनी देती सरी
मातीच्या असीम प्रेमासाठी
मनात झिरपुनी अर्थ देतात
नव्याने त्याच रेशीमगाठी

झरझर सरसर कोसळणारे
क्षण कुणी मोजले का?
आज त्याच पावसामध्ये मी
नव्याने अशी भिजले का?

वादळ

Tuesday, 6 September 2016

मावळे

पातशहाच्या फौजेसोबत असणारा इतिहासकार भीमसेन सक्‍सेना लिहितो :
"कुठे हे मराठे, जे तळहातावर कांदा-भाकरी घेऊन घोड्यावरून चाळीस चाळीस मैल दौड करतात; ज्यांना दिवसाची विश्रांती माहीत नाही, जे जाता जाता वाटेतल्या माळावर चार भाले रोवतात, त्यावर घोंगडी टाकून तात्पुरता आडोसा करतात अन्‌ लगेच घोड्यावरून वाऱ्यासारखी झेप घेत मोहिमेवर आगेकूच करतात अन्‌ तेच दुसरीकडे कंदाहारी नायकिणीच्या आगेमागे लाळ घोटणारे आमचे पातशाही फौजेतील उल्लूचे पठ्ठे !''