! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !

Tuesday, 5 January 2016

! " मिञहो जिवन जगण्यासाठी संघर्ष हा करावच लागतो " !

मिञहो तुम्हाला सांगतो जिवन
जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो

ऊगवत्या सूर्याला जसं ऊगवाव लागतं,
तसचं मावळावे ही लागते,
कारण सूर्यालाही ऊगवणयासाठी आणि अस्तासाठी संघर्ष करावा लागतोच.

लोकांना वाटते त्याचे जिवन किती सूंदर आहे,
पण एक दिवस त्याच्या जागी जावून बगा,
पण तो दिवस तूमचा दूद॔वी अनुभव असेल.

म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!

ज्या झाडांची पावसाळयात हिरवीगार पालवी पाहून मनात आनंद वाटतो,
त्याच झाडांना ऊन्हांळयांत जावून विचारा त्यांचे दुःख,
कारण झाडांना सुद्धा जिवन जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.

म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!

एका अपंगाला हात नसतात पाय नसतात ,
पण फरपटत आपले जिवन जगतो,
आणि आम्हाला सव॔ काही असून जीवन जगण्याची ईच्छाच नसते.

म्हणून सांगतो मित्रहो जिवनांत संघर्ष हा करावाच लागतो...!!!!

कवी :- आपलेच बीजे

Monday, 4 January 2016

! " मैत्री " !

 -

मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,एक
प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...कधी शिकवण कधी आठवण,तहानलेल्या चातकाला
जशी पावसाची वणवण...तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी,मैत्री असावी एक
वेगळं आयुष्य घडवणारीहसत राहणारी.., हसवत राहणारी...संकटकाळी हात
देणारी...आनंदी समयी साद घालणारी...मनाची कवाडे उघडून डोकावणारी...काहीं t
गुपितांचे राखण करणारी...मन मोकळे करुन सारं सांगणारी...सांगता सांगता मोहीत
करणारी...कधी कुणाला न लुटणारी...चांगल्याच कौतुक करणारी...तितकीच चूका
दाखविणारी...शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,मैत्री असावी अशी...
मैत्रीसारखी


Friday, 1 January 2016

! " जिजाऊंचा अखेरचा श्वास " !

राजमाता जिजाऊंचा पाचाड येथील राजवाडा अखेरची घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाच्या उदासिनतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या राजवाडय़ाची तात्काळ दुरुस्ती केली जावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याची चेतना जागवणाऱ्या जिजाऊंचे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे वास्तव्य होते. जिजाऊंच्या समाधिस्थळापासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर त्यांच्यासाठी सुसज्ज राजवाडय़ाची उभारणी करण्यात आली होती. याच राजवाडय़ात जिजाऊंचे अनेक वर्षे वास्तव्य होते. आपल्या जीवनाचा अखेरचा श्वासही त्यांनी याच वाडय़ात घेतला. महाराजांचे सन्यदलही या परिसरात वास्तव्यास होते. आज मात्र या ऐतिहासिक वाडय़ाची दुरवस्था झाली आहे. काळाच्या ओघात राजवाडय़ाचा बराचसा भाग नामशेष झाला आहे. राजवाडा परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे, तर या भागात गुरांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजवाडा परिसराला अवकळा आली आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाडय़ालगतच्या १४ एकरला परिसराला पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल आहे. तसे फलकही येथे लावण्यात आले आहेत. मात्र राजवाडय़ाची देखभाल करण्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिलेले नाही. देखभाल दुरुस्तीअभावी वाडय़ाची तटबंदीही अखेरची घटका मोजते आहे. इमारतीच्या पायाचे दगडही निखळू लागले आहेत. मात्र पुरातत्त्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकतानाही दिसत नाही. किल्ले रायगड आणि जिजाऊंची समाधी पाहायला येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांची पावले इकडे वळतात खरी, पण येथील परिस्थिती पाहून हताश होतात. पुरातत्त्व विभागाने हा परिसर अडगळीत टाकल्याची भावना शिवभक्त व्यक्त करताहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी शासन कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ राजवाडय़ासारखी ऐतिहासिक स्मारके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या स्मारकाची वेळीच देखभाल केली नाही तर इतिहासाच्या या पाऊलखुणा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक ग्रामस्थ या परिसराची देखभाल करायला तयार आहेत, परंतु त्याला पुरातत्त्व विभाग मान्यता देत नाही. रायगड जिल्हा परिषदेने पण यासाठी निधी देण्याची तयारी दाखवली होती, मात्र पुरातत्त्व विभाग त्यालाही तयार नाही. पुरातत्त्व खात्याच्या या अनास्थेबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात. शासनाने यात लक्ष घालून हा इतिहासाचा वारसा जतन करावा अशी मागणी करत आहेत.

Tuesday, 29 December 2015

! " मंगेश पाडगावकर " !

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी मंगेश पाडगावकर यांना बीजे कडून आखेरचा भगवा मुजरा....!!!!

Sunday, 27 December 2015

! " ऐतिहासिक विहिर " !

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,

या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.

ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.

अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.

या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.

इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!


Friday, 25 December 2015

! " शुभ सकाळ " !


पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र
जरूर बघतो…
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त
नाती
पण आहेत ती मनापासून
जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी
स्वत:पेक्षा जास्त प्रेम
करतो..
।। शुभ सकाळ ।।

Wednesday, 23 December 2015

! " बाजीराव पेशवे " !

 थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

बाळाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले[ संदर्भ हवा ]. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.
: बाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली[ संदर्भ हवा ]. 

[
: बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा यामागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले
[08:59, 24/12/2015] बीजे: बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
         बाजीरावाने पेशवे
बाजीराव पेशवे यांची समाधी स्थळ