छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराष्ट्राच्या मराठी तनामनात स्फूर्ती आणणा-या राजाला सारेच मानवंदना देत आहेत. महाराजांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आज जगाला दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले आज हिंदवी स्वराजाचा इतिहास सांगत आहेत. छत्रपतींचा इतिहास आपण ऐकतो. त्यांचे दर्शन घेतो, त्यांचे पोवाडे गातो. छत्रपतींना अनुभवण्याचा प्रयत्न करतो. यात सिंधुदुर्ग भाग्यवान आहे. या किल्ल्यावर इतिहासाचे सोनेरी पान न्याहाळायला मिळते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा अन् उजव्या हाताचा ठसा येथे पाहता येतो. खरं तर भक्कम उभा असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातला हिंदवी स्वराज्याचा शिलेदार. याच सिंधुदुर्गवर शिवस्मारक उभे केल्यास प्रत्यक्ष छत्रपतींचा हा लाडका किल्ला अधिकच प्रेरणा देईल!गडावर प्रचंड धावपळ सुरू होती. राजे कोणत्याही क्षणी दाखल होणार होते. ते मालवणमध्ये पोहोचल्याची वर्दी गडावर मिळाली होती. अरबी समुद्रही त्यांच्या स्वागतासाठी आतुर झाला होता. भरतीच्या लाटा किना-यावर आदळत होत्या. सा-यांचीच लगबग सुरू होती. नावाडी महाराजांच्या प्रतीक्षेत होते. नगारा वाजू लागला.. तोफांना बत्ती द्यायची बाकी होती आणि समुद्र उभा राहिला. भरतीच्या अत्युच्च टोकाला समुद्र स्थिर होतो. याच क्षणी महाराजांची पावले सिंधुदुर्गावर पोहोचली. तो दिवस होता श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा, म्हणजेच शुक्रवार, २६ मार्च १६६७!सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तुशांतीचा मुहूर्त साधला गेला होता. यासाठी किल्ला सर्व तयारीनिशी सज्ज झाला होता. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. एक नवा इतिहास अरबी समुद्रात घडला होता. जणू काही अरबी समुद्र शिवरायांच्या या धाडसाला कुर्निसात करत होता.सिंधुदुर्ग! मुद्दाम यत्नपूर्वक बांधलेले स्थळ, बखरकारांचं पुढील वाक्य शिवाजीराजांच्या हेतूवर उत्तम प्रकाश टाकते ‘अठरा टोपकरांच्या छातीवर हे प्रत्यक्ष शिवलंका निर्मिली’! अठरा हा आपला अर्थवाद. पण या सर्वच पाश्चात्त्यांच्या मनी धाक उपजावा, हा राजांचा हेतू सिंधुदुर्ग बांधण्यामागे होता. दक्षिणेकडे थेट गोव्यापर्यंतचा प्रदेश या जंजि-याच्या निर्मितीमुळे सुरक्षित झाला. पांच खंडी शिशाचा रस करून जंजि-याचा पाया भरला. पूर्ण झाल्याचं कळताच स्वत: राजे पाहावयास आले. बहुत संतुष्ट झाले. मनी आले असेल, ‘बारा बंदरी असा किल्ला नाही!’मावळ्यांनी छत्रपतींचे जल्लोषात स्वागत केले. राजदरबार भरला. या किल्ल्याच्या संपूर्ण कामाबाबत छत्रपतींनी बेहद् खुशी व्यक्त केली. पाथरवटांचे नायकांस वस्त्रे, सोनियाची कडी दिली. फिरगीयांस वस्त्रे, कडी, शर्करा वाटल्या. सर्वत्र ‘आनंदाच्या डोही, आनंद तरंग’ असेच वातावरण होते.‘यावे हिरोजी, आपणास काय हवे ते मागावे, हा सिंधुदुर्ग बनवून आपण स्वराज्यासाठी अजोड कामगिरी केला आहात. आता रायगडाचेही काम आपणच करायला हवे. चंद्र, सूर्य असेपर्यंत काहीही भंग पावू नये असे काम करा.’राजांच्या या आदेशाने हिरोजींना आकाशाला हात पोहोचल्याचा आनंद झाला. हिरोजी म्हणाले, ‘महाराज’ तुम्ही स्वराज्यासाठी एवढे करत आहात. दिवस-रात्र मेहनत घेत आहात. आम्ही आणखी काय मागायला हवे. या स्वराज्यासाठी आम्हाला संधी देत आहात हाच आपला मोठेपणा आहे.दरबार शांत होता. हिरोजींचे शब्द आणि महाराजांचा संवाद प्रत्येक जण कान टवकारून ऐकत होता. या शांततेचा हिरोजींनी भंग केला. ‘‘महाराज एक विनंती आहे. तुमचा चरणस्पर्श करण्याची संधी मिळावी, आम्हावर आपले आशीर्वाद कायम असावेत!’’‘‘हिरोजी आपल्यात अंतर आहेच कुठे?’’ छत्रपती वदले. सारेच भारावले. हिरोजींनी प्रसंगावधान जपत महाराजांना मुजरा केला आणि म्हणाले, ‘‘महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे. तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत.’’छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले.महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे! हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली. तोफांचे बार उडाले. पुन्हा चौघडा वाजू लागला.हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडीवर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. असंख्य लाटांना झेलत या किल्ल्यावर महाराजांचे चरणकमल आणि हस्तमुद्रेचा दस्तावेज जपत महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदवी स्वराज्याला एक नवी ऊर्जा बहाल केली आहे.१० नोव्हेंबर १६६४ रोजी दुर्ग बांधायला राजांनी प्रारंभ केला. बांधकाम मोठय़ा हौसेने, उमेदीने केले. पायाचे दगड शिशाच्या रसात बसविले! तीन हजार कामगार अहोरात्र खपत होते. मदतीला म्हणून काही पोर्तुगीज इंजिनीयरही मुद्दाम मागवून घेतले होते. खर्च किती आला? त्या दिवसात एक कोटी होन! एकूण अडीच वर्षे काम चालले होते.महाराजांचे या वास्तूवर भारी प्रेम. ही बावन्नबुरुजी वास्तू म्हणजे जणू स्वातंत्र्यदेवीच्या गळ्यातल्या कंठय़ातला झळाळणारा हिराच! तटाची रुंदी कुठे दहा फूट, तर कुठे त्याहूनही जास्त. नागमोडी वळणाच्या प्रचंड तटाला पहारेक-यांसाठी चाळीस शौचकूप! तटावर चढून जाण्यासाठी आतल्या बाजूस दिड-दोनशे हातांच्या अंतरावर पंचेचाळीस जिने बांधून काढलेले. प्रवेशद्वार मालवणच्या अंगास बांधलेले. उघडय़ा समुद्रावरून कल्पना येऊ नये, अशा जागी ती विख्यात सर्पाकृती रचना!चैत्र पौर्णिमेला महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला हिंदवी स्वराज्याला समर्पित केला. इतिहास साक्षी आहे. आजही हा इतिहास आपल्याला पाहता येतो, किल्ल्यावर पोहोचल्यावर छत्रपतींची ही मुद्रा आपले लक्ष वेधून घेते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भ्रमंतीत पावलापावलावर इतिहासाचे शिलेदार भेटतात.या दुर्गावर दोन घुमटय़ा लक्ष वेधून घेतात. पैकी एका घुमटीत हाताचा ठसा अदमासे छातीभर उंचीवर आहे. तो उतरता आहे. पाचही बोटे पसरलेली. बोटे चांगली लांबसडक आहेत. मात्र गेली तीन सव्वातीनशे वर्षे आल्यागेल्याने त्या ठशामध्ये आपापले हात ठेवून ठसा अगदी पुसट करून टाकला आहे. हा ठसा असाच येताजाता पुसट होत राहिला, तर मग इथे छत्रपतींनी आपलं हस्तचिन्ह उठविलं होते, हे आवर्जुन सांगावं लागेल. ही भीती शिवप्रेमी संघटनांनी जाणली आणि घुमटीला कुलूपबंद करावे लागले.पायाच्या ठशाचे मात्र तसे नाही. तो अगदी तळांत, तटावर आहे खरा, पण त्याची जी अदमासे तीन फूट उंचीची घुमटी आहे, तिचे प्रवेशद्वारच दहा इंच उंच आणि आठ इंच रुंद असे चिंचोळे आहे. इथेच पावलांचा ठसा आहे. राजा शिवछत्रपतीचे पाऊल! स्वत: त्यांचेच, दुस-या कुणाचेही नव्हे! केवढे आपले भाग्य, की तो ठसा आपण पाहू शकतो!हे चरणचिन्ह स्वत: राजा शिवछत्रपतींचेच, याविषयी शंकाच नाही. तशा अर्थाचे लिखित प्रमाण उपलब्ध नसले, तरीही नाही. परंपरागत माहिती, हे प्रमाण. किल्ला बांधला जात असतानाच ज्याच्या चरणचिन्हावर मुद्दाम एवढी आपुलकीने घुमटी बांधावी, असा हा राजा वगळता दुसरा कुणीही पुरुषोत्तम त्या काळी झालेला नाही!कोकणाला श्रद्धेची भूमी असेही म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना कोकण दैवत मानते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि परिसरात असलेले नावाडी शिवरायांना नियमित मानाचा मुजरा करत असतात. शिवरायांना दैवत मानणा-या या मावळ्यांना पाहून छत्रपती शिवरायांचे चिरंजीव राजाराम राजे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचे मंदिर उभे केले. शिवाजी महाराजांचे जगातले हे पहिले मंदिर.. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा नेहमीच वावर आहे, असे आजही येथील जनता मानते. यामुळे या किल्ल्यावर कुणीही दहन अथवा दफन करत नाही. किल्ल्यात नांगर फिरविला जात नाही. जमीन खोदायचीच तर कुदळ अथवा फावडय़ाने असा येथील रिवाज आहे.किल्ल्यावर १४ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्या कोणी लावल्या आहेत, याची माहिती मिळत नाही. परंतु सहय़ाद्रीतल्या बहुतांश गडकिल्ल्यांवर या आयुर्वेदिक वनस्पतींचे साधम्र्य आढळते. याचा अर्थ स्पष्ट आहे, गडकिल्ल्यांवर या वनस्पती जाणीवपूर्वक वाढविल्या गेल्या आहेत.चौ-याऐंशी बंदरी ऐसा जागा नाहीइ.स. १६६४ च्या सुमारास महाराज गोव्याची मोहीम आटपून दक्षिण कोकणात आले होते. नेरूरपार मार्गे ते मालवणात दाखल झाले. या वेळी महाराजांनी आपल्या समवेत असणा-या कृष्णकांत देसाई व भानजी प्रभुदेसाई यांना या बेटाचे नाव विचारले व लगोलग या बेटावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. कुरटे बेटाच्या आजूबाजूला छोटे-मोठे खडक होते. या खडकांतून होडय़ा नेणे अशक्यप्राय असल्याचे समजताच सर्पाकार होडय़ांतून महाराज त्या बेटावर गेले. या वेळी त्यांच्या समवेत बांधकामशास्त्रातील निपुण हिरोजी इंदुलकर, तानाजी, भानाजी, गंगाजी, सावजी आदी मंडळी होती. शिवराय कुरटे बेटाचे निरीक्षण करीत असता चौ-याऐंशी बंदरी ऐसा जागा नाही, हे शब्द त्यांच्या मुखातून उमटले.या बेटावर जलदुर्ग उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली. महाराजांच्या सर्व सहका-यांनीही या कल्पनेला संमती दिली. महाराजांसमवेत असणा-या पंडितराव आणि ज्योतिषींना या वेळी किल्ला बांधकामाचा मुहूर्त काढून देण्याच्या सूचना महाराजांनी केल्या. किल्ल्याचे बांधकाम चालू असते वेळी या ठिकाणी शत्रूचा हल्ला होऊ नये याकरिता पाच हजार मावळ्यांची फौज मालवणच्या किनारपट्टीवर रक्षणासाठी ठेवण्यात आली होती.सिंधुदुर्ग किल्ला ४८ एकर जागेत बांधण्यात आला असून किल्ल्याचा परिघ तीन कि.मी. एवढा आहे. किल्ला उभारण्यासाठी आवश्यक असलेला दगड फोंडा, आंबोली या घाटातून तर काही दगड मालवण शहरातील राजकोट भागातून आणण्यात आला. बांधकामासाठी वापरण्यात आलेला चुना शंख, शिंपल्यांपासून बनविण्यात आला असून कालावलीपासून निवतीपर्यंतच्या किनारपट्टीवर हे शंख, शिंपले गोळा करण्यात आले आहेत
! " मी शिवप्रेमी आणि निसर्ग प्रेमी बीजे " !
Thursday, 4 June 2015
!!! "भाग्य सिंधुदुर्गचे.. अभिमान पदचिन्हांचा

!!! " शिवरायांचा पायांचा आणि हाताचे ठसे यांचा ठसा " !!!
नक्की वाचा खास तुमच्यासाठी
छायाचित्रे : - शिव भक्त बीजे
: महाराष्ट्राच्या मराठी तनामनात स्फूर्ती आणणा-या राजाला सारेच मानवंदना देत आहेत. महाराजांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आज जगाला दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले आज हिंदवी स्वराजाचा इतिहास सांगत आहेत. छत्रपतींचा इतिहास आपण ऐकतो. त्यांचे दर्शन घेतो, त्यांचे पोवाडे गातो. छत्रपतींना अनुभवण्याचा प्रयत्न करतो. यात सिंधुदुर्ग भाग्यवान आहे. या किल्ल्यावर इतिहासाचे सोनेरी पान न्याहाळायला मिळते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा अन् उजव्या हाताचा ठसा येथे पाहता येतो. खरं तर भक्कम उभा असलेला सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातला हिंदवी स्वराज्याचा शिलेदार. याच सिंधुदुर्गवर शिवस्मारक उभे केल्यास प्रत्यक्ष छत्रपतींचा हा लाडका किल्ला अधिकच प्रेरणा देईल!
गडावर प्रचंड धावपळ सुरू होती. राजे कोणत्याही क्षणी दाखल होणार होते. ते मालवणमध्ये पोहोचल्याची वर्दी गडावर मिळाली होती. अरबी समुद्रही त्यांच्या स्वागतासाठी आतुर झाला होता. भरतीच्या लाटा किना-यावर आदळत होत्या. सा-यांचीच लगबग सुरू होती. नावाडी महाराजांच्या प्रतीक्षेत होते. नगारा वाजू लागला.. तोफांना बत्ती द्यायची बाकी होती आणि समुद्र उभा राहिला. भरतीच्या अत्युच्च टोकाला समुद्र स्थिर होतो. याच क्षणी महाराजांची पावले सिंधुदुर्गावर पोहोचली. तो दिवस होता श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा, म्हणजेच शुक्रवार, २६ मार्च १६६७!
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तुशांतीचा मुहूर्त साधला गेला होता. यासाठी किल्ला सर्व तयारीनिशी सज्ज झाला होता. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. एक नवा इतिहास अरबी समुद्रात घडला होता. जणू काही अरबी समुद्र शिवरायांच्या या धाडसाला कुर्निसात करत होता.
सिंधुदुर्ग! मुद
यावे हिरोजी, आपणास काय हवे ते मागावे, हा सिंधुदुर्ग बनवून आपण स्वराज्यासाठी अजोड कामगिरी केला आहात. आता रायगडाचेही काम आपणच करायला हवे. चंद्र, सूर्य असेपर्यंत काहीही भंग पावू नये असे काम करा.’
राजांच्या या आदेशाने हिरोजींना आकाशाला हात पोहोचल्याचा आनंद झाला. हिरोजी म्हणाले, ‘महाराज’ तुम्ही स्वराज्यासाठी एवढे करत आहात. दिवस-रात्र मेहनत घेत आहात. आम्ही आणखी काय मागायला हवे. या स्वराज्यासाठी आम्हाला संधी देत आहात हाच आपला मोठेपणा आहे.
दरबार शांत होता. हिरोजींचे शब्द आणि महाराजांचा संवाद प्रत्येक जण कान टवकारून ऐकत होता. या शांततेचा हिरोजींनी भंग केला. ‘‘महाराज एक विनंती आहे. तुमचा चरणस्पर्श करण्याची संधी मिळावी, आम्हावर आपले आशीर्वाद कायम असावेत!’’
‘‘हिरोजी आपल्यात अंतर आहेच कुठे?’’ छत्रपती वदले. सारेच भारावले. हिरोजींनी प्रसंगावधान जपत महाराजांना मुजरा केला आणि म्हणाले, ‘‘महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे. तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत.’’
छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले.
महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे! हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली. तोफांचे बार उडाले. पुन्हा चौघडा वाजू लागला.
हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडीवर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. असंख्य लाटांना झेलत या किल्ल्या�
किल्ल्यावर महाराजांचे चरणकमल आणि हस्तमुद्रेचा दस्तावेज जपत महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदवी स्वराज्याला एक नवी ऊर्जा बहाल केली आहे.
Wednesday, 3 June 2015
!!! "समुद्र के किनारे … " !!!
कितने सारे पेड़ चाहिएं नारियल के
इस प्रदेश को हरा-भरा दिखने के लिए
और बगल से, वेग से आगे बढ़ता पानी समुद्र का
जिस पर जलते हुए सूर्य की चिंगारी ठंडी होती हुई।
इस रेतीले तट पर निशान ही निशान लोगों के
जैसे सभी को पहचान दे सकती हो यह जगह।
हवा उठती है बार-बार लहरों की तरह
मेरे पंख हों तो मैं भी उड़ चलूं।
चारों तरफ यात्री ही यात्री
और सामने सूचना पट पर लिखा है
खतरा है पानी के भीतर जाने से
और एकाएक अनुशासन को टटोलता हूं
मैं अपने भीतर।
और यकीन करता हूं कि
खुशियों के साथ इनका भी कुछ संबंध है।
!!! " सफर मैञीची " !!!
काहीजण मैत्री कशी करतात?
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात गोष्टी

Thursday, 2 April 2015
!!! " 3 एप्रिल अत्यंत दु:ख चा दिवस " !!!
३ एप्रिल १६८०
चैत्र शुध्द पोर्णिमा शके १६०२
शौर्य, धैर्य, नितीमत्ता, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत
असलेले व गुलामगीरीच्या साखळदंडात अडकलेल्या
मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण
स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही तर ह्या
सकळ त्रिलौक्याचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य
राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी,
महाप्रतापी, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती
महाराज हे सर्व त्रिलौक्याला पोरके करुन अनंतात
विलीन झाले. ज्यांच्या उपकाराची परत पेढ
आपण आजन्म करु शकत नाही.
अशा या युगपुरुषाला मानाचा त्रीवार मुजरा.
बीजे एक. वादळ

Thursday, 26 February 2015
!! " मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा " !!
सुप्रभात
आज २७ फेब्रुवारी...
मराठी भाषा दिन...!!🚩🚩
प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी
भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’
साजरा करतात.
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर
ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे
औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’
पाळण्याची प्रथा सुरू झाली.
आपल्याला दोन गोष्टी लयं आवडतात
एक म्हणजे ढोल ताशा आणि
दुस़री म्हणजे मराठी भाषा...!!
🚩🚩...जय महाराष्ट्र ...🚩🚩

Subscribe to:
Posts (Atom)